Kumaraswamy sworn in as Karnataka chief minister

 1. जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दोनच नेत्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.
 2. विधानसभेत बहुमत चाचणी होईल त्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना शपथ दिली.
 3. कर्नाटकमधील एकूण ३४ खात्यांपैकी २२ खाती काँग्रेसला तर मुख्यमंत्रीपदासह १२ खाती जेडीएसला देण्यात येणार आहेत. तसेच विधानसभेत बहुमत चाचणी होणार असून त्यानंतर मंत्र्यांना खाते वाटप केले जाईल, असे काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.
 4. जेडीएसने निवडणुकीपूर्वी बसपाशी तर निवडणुकीनंतर काँग्रेससोबत युती केली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला ७८ तर जेडीएसला ३८ जागांवर विजय मिळाला. तर भाजपा १०४ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. तसेच २ जागा अपक्षांना मिळाल्या. मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. 


Polish writer Olga Tökerkzuke receives the Man Booker International Award

 1. पोलंडची लेखिका ओल्गा टोकरकझ्यूक ह्यांना फिक्शन श्रेणीत प्रतिष्ठित मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार 2018 देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
 2. टोकरकझ्यूक ह्यांना हा सन्मान त्यांच्या 'फ्लाइट्स' शीर्षकाच्या कादंबरीसाठी देण्यात आला आहे.
 3. यासोबतच, ओल्गा टोकरकझ्यूक ह्या 50 वर्षांच्या इतिहासात मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त करणारी पोलंडची पहिली लेखिका ठरली आहे. 50,000 पाउंडची बक्षि‍साची रक्कम लेखिका आणि त्यांचे अनुवादक जेनिफर क्रॉफ्ट यांच्यामध्ये विभाजित केली जाणार.
 4. मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार (Man Booker International Prize) हा ब्रिटनकडून दिला जाणारा आंतरराष्ट्रीय साहित्यिक पुरस्कार आहे आणि जून 2004 मध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
 5. हा सन्मान इंग्रजी भाषेतील कादंबरीसाठी मॅन बुकर पुरस्काराच्या समकक्ष आहे आणि इंग्रजीमध्ये भाषांतरित कोणत्याही भाषेतील पुस्तकांसाठी देखील दिला जातो.
 6. विजेत्याला 50,000 पाउंडची बक्षि‍साची रक्कम दिली जाते.
मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार

मॅन बुकर पुरस्कार हा राष्ट्रकुल परिषदेच्या सदस्य देशातील लेखकांना त्यांनी लिहलेल्या इंग्रजी भाषेतील कादंबरीला देण्यात येणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.

आतापर्यंत ३ भारतीयांना मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला आहै

 1. १९९७ - अरुंधती रॉय - द गॉड ऑफ स्मॉल थिंग्जकादंबरी
 2. २००६ - किरण देसाई - द इनहेरिटन्स ऑफ लॉस
 3. २००८ - अरविंद अडिगा - द व्हाइट टायगर

 


Top

Whoops, looks like something went wrong.