
2165 26-Jul-2018, Thu
- मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कायगाव टोका (ता. गंगापूर जि.औरंगाबाद) येथे गोदावरी नदीच्या पुलावरून काकासाहेब शिंदे यांनी उडी घेत जलसमाधी घेतली होती.
- त्या पुलाचे ‘स्मृतिशेष काकासाहेब शिंदे पूल‘ असे नामकरण संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आले.
- 25 जुलै रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, कोषाध्यक्ष संतोष गाजरे तसेच काही मान्यवरांनीही काकासाहेब शिंदे यांच्या कुटुबियांची भेट घेऊन सांत्वन केले.