ISRO's new "Youth Scientific Program"

 1. शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन क्षेत्रात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) या वर्षापासून "युवा वैज्ञानिक कार्यक्रम" (YUva VIgyani KAryakram - युविका) नावाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा दिनांक 4 मार्च 2019 रोजी आरंभ केला.
 2. अंतराळात शालेय विद्यार्थ्यांचे स्वारस्य जागृत करण्यासाठी अंतराळ क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञान, शास्त्र आणि अनुप्रयोगांबाबतचे मूलभूत ज्ञान देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
 3. भारत सरकारच्या "जय विज्ञान, जय अनुसंधान" या दृष्टीकोनाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेला हा दोन आठवडे चालणारा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आहे, ज्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
 4. दरवर्षी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून CBSE, ICSE आणि राज्य अभ्यासक्रमांमध्ये शिकणार्‍या प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची निवड करण्याचे प्रस्तावित आहे.
 5. इयत्ता आठवी पूर्ण करणार्‍या आणि सध्या नववीत असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
 6. ISRO चा प्रवास:-
  1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे.
  2. दिनांक 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना करण्यात आलेल्या ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेला बदलले.
  3. ISRO ने 1999 सालापासून व्यावसायिक शाखेच्या मदतीने परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरू केला.
 7. ISRO ने साधलेल्या प्रशंसनीय यशाचा आढावा पुढीलप्रमाणे आहे -
  1. 19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.
  2. 1980 साली पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या SLV-3 प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.
  3. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली.
  4. या मोहिमेमधून चंद्राच्या ध्रुव क्षेत्रात पाणी असण्याची पुष्टी केली.
  5. ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
  6. फेब्रुवारी 2017 मध्ये एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा 37 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला.
  7. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (GSLV) विकसित केले.
  8. सॅटलाइट सुचालन प्रणाली ‘गगन’ आणि क्षेत्रीय सुचालन उपग्रह प्रणाली ‘IRNSS’ विकसित केले.
  9. यानाला पुढे नेणारे अत्यावश्यक असलेले स्वदेशी ‘क्रायोजेनिक इंजन’ तयार केले.


National Common Mobility Card -NCMC

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वदेशी विकसित केलेल्या राष्ट्रीय सर्वसाधारण गतिशीलता कार्डचे (National Common Mobility Card -NCMC) अनावरण करण्यात आले आहे.
 2. हे कार्ड रूपे कार्डद्वारे समर्थित आहे. तसेच बँकद्वारे डेबिट/क्रेडिट/प्री-पेड कार्ड उत्पादनांच्या व्यासपीठावर सादर केलेले कार्ड आहे.
 3. याला ‘एक राष्ट्र एक कार्ड’ हे नाव देण्यात आले आहे.
 4. हे कार्ड लोकांना विविध प्रकारचे वाहतूक शुल्क देण्यास सक्षमता प्रदान करते.
 5. ज्याद्वारे प्रवासादरम्यान देशभ रात कुठेही कार्डधारक बसचे तिकीट, टोल, पार्किंग शुल्क, खरेदारी तसेच पैसेदेखील काढू शकणार.


Top

Whoops, looks like something went wrong.