
2284 14-Jan-2018, Sun
- जेष्ठ वकील इंदू मल्होत्रा या वकिलांच्या मंडळाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी थेट नियुक्त करण्यास शिफारस करण्यात आलेल्या प्रथम महिला न्यायाधीश ठरल्या आहेत.
- सोबतच उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसफ यांची देखील शिफारस करण्यात आली.
- इंदू मल्होत्रा स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनणारी सातवी महिला आहे.
- यापूर्वी आर. भानुमती (सध्या एकमात्र कार्यरत महिला न्यायाधीश), एम. फातिमा बीवी (1989 साली सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश), सुजाता व्ही. मनोहर, रुमा पाल, ज्ञान सुधा मिश्रा आणि रंजना प्रकाश देसाई या महिलांची नियुक्ती झालेली होती.
- भारतीय घटनेच्या परिच्छेद 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयांच्या स्थापनेसंबंधी तरतूद आहे.
- वर्तमानात न्यायालयात एक भारतीय सरन्यायाधीश (CJI) आणि कमाल 30 अन्य न्यायाधीश पदांची तरतूद आहे.
- याचे मुख्यपीठ नवी दिल्लीत आहे.
- भारतीय सरन्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपतींकडून (परीच्छेद 124) केली जाते.