India's new guide to face severe acute malnutrition

 1. राष्ट्रीय पोषण तंत्रात्मक मंडळाने (NTBN) देशातल्या गंभीर तीव्र कुपोषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गदर्शकांना त्यांची मंजुरी दिली आहे.
 2. प्रस्तावित शिफारसी पुढीलप्रमाणे:- 
  1. गंभीरपणे कुपोषित बालकांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले धान्य, डाळी आणि भाज्यांमधून तयार केलेले ताजे शिजवलेले अन्न अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून वितरित करणे.
  2. जीवनाविषयक वैद्यकीय गुंतागुंत विकसित झालेल्या अत्यंत कुपोषित बालकांना रुग्णालयात दाखल करणे. (हे एकमेव निर्देश 2011 सालापासून पाळले जात आहे)
  3.   गंभीर कुपोषित बालकांची ओळख पटविणे आणि त्यांना एडीमा (सूज) किंवा वैद्यकीय गुंतागुंत असलेल्यांपासून वेगळे करणे.
  4. त्यांना जवळच्या आरोग्य सुविधा किंवा पोषण पुनर्वसन केंद्राकडे पाठवणे, अश्या कार्यांच्या बाबतीत अंगणवाडी कामगार आणि ऑक्झिल्लरी नर्स मिडव्हाइव्ह्ज (ANM) यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
  5. अंगणवाडी कर्मचारी 3-6 वर्षे वयोगटातल्या सर्व बालकांना सकाळची सुधारित न्याहारी, गरम शिजविलेले अन्न पुरविणार तसेच गंभीर तीव्र कुपोषित बालकांसाठी घरासाठी अन्नधान्य पुरविणार आहे.


The statue of Nelson Mandela, UN headquarters headquarters, was raised

 1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
 2. 18 जुलै 1918 रोजी जन्मलेल्या मंडेला यांची या वर्षी 100वी जयंती साजरी केली गेली आहे आणि त्यानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाने सन ‘2019-2028’ हा काळ "नेल्सन मंडेला शांती दशक” म्हणून घोषित केला आहे.
 3. नेल्सन मंडेला सन 1994-1999 या काळात दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्रपती होते.
 4. ते देशाचे प्रथम कृष्ण-वंशीय राष्ट्रपती तसेच राष्ट्रवादी लोकशाही निवडणुकीतून निवडून आलेले प्रथम राष्ट्रपती आहेत.
 5. मंडेला त्यांच्या शांती, क्षमा, करुणा आणि मानवी प्रतिष्ठेच्या सर्वोच्च मूल्यांसाठी ओळखले जातात.
 6. आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली.
 7. सध्या या संघटनेचे 193 सदस्य देश आहेत.
 8. UN चे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. 
 9. संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.


"Right Livelihood Award 2018" for three human rights activists in Saudi Arabia

 1. सौदी अरबमध्ये कारावास भोगत असलेल्या तीन मानवाधिकार कार्यकर्त्यांना तसेच दोन लॅटिन-अमेरिकन भ्रष्टाचारविरोधी लढणार्‍यांना “राइट लाइव्हलीहुड अवॉर्ड 2018” देण्यात आले आहे. ते विजेते म्हणजे –
 2. अब्दुल्लाह अल-हामिद, मोहम्मद फहाद अल-कहतानी आणि वालीद अबू अल-खैर (संयुक्तपणे) (सौदी अरब)
 3. 2018 मानद पुरस्कार - थेलमा अल्डाना (ग्वाटेमाला) आणि इवान वेलास्कूज (कोलंबिया)
 4. वार्षिक “राइट लाइव्हलीहुड अवॉर्ड” हा सन्मान नोबेल पुरस्काराला पर्यायी पुरस्कार म्हणून ओळखला जातो.
 5. या पुरस्काराची स्थापना 1980 साली स्वीडिश-जर्मन जॅकोब वॉन उएक्सकल यांनी केली.
 6. पुरस्काराच्या स्वरुपात 1 दशलक्ष क्रोनर (सुमारे $1,13,400) इतकी रोख रक्कम दिली जाते.


Ministry of Finance and Corporate Welfare 'Economic Coordination Index'

 1. केंद्रीय वित्त व कॉर्पोरेट कल्याण मंत्रालयाकडून ‘आर्थिक समावेशन निर्देशांक’ (Financial Inclusion Index –FII 2018) तयार करण्यात आला आहे.
 2. हा जानेवारी 2019 मध्ये प्रसिद्ध केला जाणार आहे.
 3. बचत, प्रेषण, पत, विमा आणि निवृत्तीवेतन उत्पादने अश्या औपचारिक वित्तीय उत्पादने आणि सेवा मिळविण्यास त्यांची उपलब्धता आणि वापर यांचे एक मोजमाप ठरू शकते.
 4. हा निर्देशांक तीन घटकांवर आधारित आहे, ते म्हणजे - (1) वित्तीय सेवांची उपलब्धता (2) वित्तीय सेवांचा वापर आणि (3) गुणवत्ता.
 5. हा निर्देशांक विकासासंबंधी निर्देशकांमध्ये संयुक्त उपाययोजना म्हणून थेट वापरला जाऊ शकतो.
 6. यामुळे संशोधकांना वित्तीय समावेशन आणि इतर मॅक्रो-इकॉनॉमिक घटकांच्या परिणामाचा अभ्यास करण्यास मदत होणार आहे.


Rajni Kant Mishra appointed as Director General of Border Security Force (BSF)

 1. IPS अधिकारी रजनी कांत मिश्रा यांची सीमा सुरक्षा दलाचे (BSF) महानिदेशक पदी नेमणूक करण्यात आली आहे.
 2. मिश्रा सध्या सशस्त्र सीमा दलाचे महानिदेशक आहेत.
 3. ते 30 सप्टेंबरला के. के. शर्मा यांच्या जागी पदभार स्वीकारतील.
 4. शिवाय, एस. एस. देसवाल यांची सशस्त्र सीमा दल (SSF) याचे महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 5. देसवाल हे सध्या BSFच्या विशेष महानिदेशक पदावर कार्यरत आहेत.


Top

Whoops, looks like something went wrong.