indian former navy chief jayant nadkarni passaway

 1. भारताचे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे 2 जुलै रोजी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.
 2. जयंत नाडकर्णी भारताचे 14वे नौदल प्रमुख होते.
 3. डिसेंबर 1987 ते नोव्हेंबर 1990 पर्यंत त्यांनी नौदलप्रमुख म्हणून धुरा संभाळली. कुलाब्यातील नौदलाच्या आयएनएचएस अश्वनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 4. जयंत नाडकर्णी यांना दोन मुले असून त्यांचा एक मुलगा भारतीय नौदलात रियर अॅडमिरल पदावर कार्यरत आहे.
 5. नौदल सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जयंत नाडकर्णी पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्या पत्नी विमल नाडकर्णी यांचे 2016 मध्ये निधन झाले.


journalist rajat sharma DDCA CHIEF

 1. वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे नवे अध्यक्ष असतील. त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारताचे माजी वेगवान गोलंदाज मदनलाल यांचा 517 मतांनी पराभव केला.
 2. रजत शर्मा यांच्या पॅनेलचे निवडणुकीत वर्चस्व राहिले. त्यांनी सर्वच्या सर्व 12 जागा जिंकल्या. रजत शर्मा यांनी 1521 मते पडली. मदनलाल यांना 1004 मते मिळाली. अध्यक्षपदाच्या शर्यतीमधील तिसरे उमेदवार विकास सिंग यांना 232 मते मिळाली.
 3. ‘बीसीसीआय’चे हंगामी अध्यक्ष सी.के. खन्ना यांच्या अस्तित्वाला या निवडणुकीत धक्का बसला आहे. त्यांची पत्नी शशी या निवडणुकीत उपाध्यक्षपदाची निवडणूक हरल्या आहेत. त्यांना राकेश बन्सल यांनी हरवले.
 4. रजत शर्मा यांच्या पॅनेलला अनपेक्षित यश मिळाले असले, तरी यामुळे त्यांना मोकळेपणाने संघटनेचे कामकाज चालवता येईल, अशी चर्चा दिल्ली क्रिकेट वर्तुळात सुरू होती.


According to national speaking language marathi at third position

 

 1. देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीने तेलुगू भाषेला मागे टाकले असून, या यादीत मराठी भाषा आता तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे.
 2. २०११मधील जनगणनेच्या आधारे देशातील कोणती भाषा किती बोलली जाते याची यादी तयार करण्यात आली आहे.
 3. या यादीमध्ये हिंदी भाषा पहिल्या स्थानी असून, हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण २००१ सालच्या ४१.०३ टक्क्यांवरुन ४३.६३ टक्क्यांवर पोहोचले आहे.
 4. तर बंगाली भाषा ही दुसऱ्या स्थानी आहे. बंगाली मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ८.१ टक्क्यांवरुन ८.३ टक्क्यांवर पोहोचले आहे.
 5. मराठी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण २००१च्या तुलनेत ६.९९ टक्क्यांवरुन २०११मध्ये ७.०९ टक्क्यांवर पोहोचले आहे.
 6. मराठीने याबाबतीत तेलुगूला मागे टाकले आहे. तेलुगू भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण २००१च्य तुलनेत ७.१९ टक्क्यांवरुन ६.९३ टक्क्यांवर घसरले आहे.
 7. मातृभाषेच्या यादीत उर्दू सातव्या स्थानी असून २००१मध्ये उर्दू भाषा सहाव्या स्थानी होती. आता गुजराती भाषा सहाव्या स्थानी आहे.
 8. देशातील २.६ लाख लोकांनी इंग्रजी ही मातृभाषा असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून राज्यातील १.०६ लाख लोकांची इंग्रजी मातृभाषा आहे.
 9. देशात फक्त २४,८२१ लोकांनी संस्कृत ही मातृभाषा असल्याचे म्हटले आहे. भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार संस्कृत भाषा बोडो, मणिपुरी, कोकणी भाषेच्याही खाली आहे.
 10. कोकणीलाही असाच अनुभव आला आहे. देशात २२.५६ लाख लोकांनी आपली मातृभाषा कोकणी असल्याची नोंद केली आहे. पण २००१च्या आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या २.३२ लाखांनी घटली आहे.
 11. गोव्यातील मराठी भाषकांची सख्या २००१च्या तुलनेत २०११मध्ये १.४५ लाखांनी घटली आहे. 


sangali turmaric got GI Status

 1. जागतिक बाजारात हळदीचे दर निश्चित करणाऱ्या सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
 2. सांगलीच्या हळदीमध्ये असलेले विविध औषधी गुणधर्म, हळदीची इथे असलेली वैशिष्टय़पूर्ण बाजारपेठ, साठवणुकीसाठी नैसर्गिक पेवाचा वापर, रंग, गुणधर्म यामुळे हे भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
 3. सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन (जिऑग्राफिकल इंडिकेशन : जीआय) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी प्रथम २०१३मध्ये मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडे केली होती.
 4. त्याचवेळी वर्धा जिल्ह्यतील वायगाव येथील शेतकऱ्यांनी वायगावी हळदीला जीआय मानांकन मिळविण्यासाठीही प्रस्ताव सादर केला होता.
 5. वायगाव हे गाव ८० टक्के हळदीचे उत्पादन घेत आहे. त्या हळदीत करक्युमिनचे (औषधी गुणधर्म असलेला घटक) प्रमाण ६ ते ८ टक्के आहे. याच हळदीने इतर वाणांच्या हळदीला मागे टाकून जीआय मानांकन मिळविले होते.
 6. भारतातील ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो. देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो.
 7. केशरी रंग, पेवातील साठवणूक या सांगलीच्या हळदीच्या खास वैशिष्ट्यांमुळे तिला भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी पुन्हा केली होती.
 8. या प्रस्तावाचा स्वीकार करत मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाने सांगलीच्या हळदीला जीआय मानांकन जाहीर केले.
 9. हळदीला भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सांगलीची हळद म्हणून मान्यता मिळाली आहे.
 • ही मान्यता केंद्र सरकारकडून मिळाल्यामुळे हा सांगलीचा ब्रँड म्हणून कायमस्वरूपी बाजारात विकला जाणार आहे.                                                     भौगोलिक मानांकन (जीआय) म्हणजे काय? 
 • जीआय म्हणजे जिऑग्राफिकल इंडिकेशन अर्थात भौगोलिक मानांकन. हा बौद्धिक संपदा विशेष अधिकार म्हणून ओळखला जातो.

उत्पादनास स्वामित्व म्हणजेच कायदेशीर हक्क प्राप्त करून देण्यासाठी शासनातर्फे वैयक्तिक उत्पादनासाठी पेटंटची, तर सामूहिक उत्पादनासाठी भौगोलिक उपदर्शन (जीआय)ची मान्यता दिली जाते.

 • एखादी संस्था, जात, जमात किंवा समूह काही विशिष्ट पदार्थांच्या निर्मितीसाठी जोडलेला असेल तर त्या समूहाला हा बौद्धिक संपदा भौगोलिक मानांकन या नावाने मिळतो.
 • या माध्यमातून या सलग्नित समूहाला आपला पदार्थ अथवा वस्तू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याची संधी मिळते.
 • भौगोलिक उपदर्शन नोंदणीचा कायदा भारतात प्रस्तावित केला गेला आणि प्रत्यक्षात २००१साली आला. विशिष्ट भागातून तयार होणाऱ्या विशेष पदार्थाला भौगोलिक उपदर्शन कायद्याअंतर्गत नोंद करता येते.
 • जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) बौद्धिक संपदा विषयक करारातून भारतात आलेल्या अनेक कायद्यांपैकी सदर भौगोलिक उपदर्शन नोंदणी कायदा हा एक आहे.
 • आजवर जगातील १६० देशांनी जीआयला मान्यता दिली आहे. हे मानांकन मिळाल्यानंतर त्या त्या परिसरातील पिकांच्या गुणवैशिष्ट्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते.
 • एकूण २४ जीआयसह महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीआय मिळविणारे राज्यआहे. 
 • मानांकनाचे फायदे
 • जागतिक बाजारात मुल्यवर्धी.
 • देशातील ब्रॅंड म्हणनू ओळख.
 • देशांतर्गत बाजारातही योग्य भाव.


kanya van samrudhi yojana got permission by state gov

 1. महिला सक्षमीकरण व सबलीकरणासोबत वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कन्या वन समृद्धी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली.
 2. पर्यावरण संवर्धनासोबतच महिला सक्षमीकरणही साधले जावे, यासाठी वन विभागातर्फे ही विशेष योजना तयार करण्यात आली आहे.
 3. या योजनेंतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबास वृक्ष लागवडीसाठी सरकारकडून मदत केली जाणार आहे. या योजनेचा लाभ दरवर्षी दोन लक्ष शेतकरी कुटुंबांना होईल, असा अंदाज आहे.
 4. त्याअंतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबाला सरकारकडून साग, आंबा, फणस, जांभूळ व चिंच अशी झाडांची १० रोपे विनामूल्य देण्यात येणार आहेत. 
 5. या झाडांपासून मिळणारे उत्पन्न मुलींचे भवितव्य घडविण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच दिला जाईल. 
 6. या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा संदेश देण्यासह मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
 7. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत जन्म झालेल्या मुलींच्या पालकांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर त्यांना वन विभागाकडून १० रोपे उपलब्ध करून देण्यात येतील.


Top