
1360 23-Nov-2018, Fri
- आशिया खंडात सीमेलगत पर्यावरण-विषयक गुन्ह्यांविरुद्ध लढा देण्यामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी भारत सरकारच्या वन्यजीवन गुन्हे नियंत्रण विभाग (WCCB) याला संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) कडून ‘आशिया पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार-2018’ (Asia Environment Enforcement Award) याने सन्मानित करण्यात आले आहे.
- वन्यजीवन गुन्हे नियंत्रण विभाग (WCCB) हे भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.
- विभागाला हा पुरस्कार ‘नवकल्पना’ गटात मिळाला आहे.
- विभागाने गुन्हेगारीचा कल ओळखण्यासाठी आणि गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि प्रभावी उपाययोजना शोधण्यासाठी वास्तविक वेळेत माहिती मिळविण्यासाठी ऑनलाइन ‘वन्यजीवन गुन्हे माहिती व्यवस्थापन प्रणाली’ विकसित केली आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) हा दिनांक 5 जून 1972 रोजी स्थापना करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाचा एक विभाग आहे.
- जे पर्यावरणविषयक धोरणे आणि पद्धती यांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करते.
- याचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.