India ranked first in ICC ODI rankings

 1. भारताने पोर्ट एलिजाबेथमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या मालिकेत विजय मिळवून ICC एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रमवारीत प्रथम स्थान प्राप्त केले.
 2. ICC च्या ताज्या ODI क्रमवारीत भारतानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक आणि इंग्लंड तिसर्‍या स्थानी आहे.
 3. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे.
 4. सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती
 5. सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले.
 6. ICC मध्ये 105 सदस्य आहेत, त्यात 12 पूर्ण सदस्य जे कसोटी सामने खेळतात, 37 सहयोगी सदस्य आणि 56 संलग्न सदस्य आहेत.
 7. याचे मुख्यालय संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दुबईमध्ये आहे.


ISS succeeded in reaching Russia's 'progress MS-08' cargo spacecraft

 1. रशियाच्या रॉसकॉस्मस या अंतराळ संस्थेने यशस्वीरीत्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) साठी ‘प्रोग्रेस MS-08’ नामक मानवरहित कार्गो अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.
 2. याला कजाकस्तानच्या बॅकोनूर प्रक्षेपण केंद्रावरून सोयुझ 2-1A अग्निबाणाने सोडण्यात आले.
 3. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS):-
  1. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे पृथ्वीच्या खालच्या अंतराळ कक्षेत 400 किलोमीटर वर तरंगणारे एक अंतराळ स्थानक आहे. या कृत्रिम उपग्रहावर मानवाचा अधिवास शक्य झाला आहे.
  2. 1998 साली या बहू-राष्ट्रीय प्रकल्पाचा पहिला भाग अंतराळात पाठवण्यात आला.
  3. ISS वर सध्या अमेरिकेचे तीन, रशियाचे दोन आणि जपानचा एक असे सहा अंतराळवीर कार्यरत आहेत.

ठळक बाबी

 1. प्रोसेस-क्लास कॅप्सूल, 2.7 टन अन्न, इंधन आणि अन्य आवश्यक सामुग्री पाठविण्यात आली. रोबोटिक कार्गो कॅप्सूल ISS च्या ज्वेड्झा सर्विस मॉड्यूलसोबत आहे.
 2. जर्मन-रशिया ICARUS संशोधन प्रकल्पासाठी उपकरण देखील पाठविण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून वन्यजीवांच्या स्थलांतरणाच्या पद्धतींचा अभ्यास केला जाणार आहे.
 3. कॅप्सूल 1,390 किलोग्रामचे उपकरण, वैज्ञानिक उपकरणे, अन्न आणि प्रयोगशाळेच्या सहा व्यक्तींच्या चालक दलाच्या भ्रमणासाठी आवश्यक समानासह आहे.
 4. सोबतच ISS साठी 890 किलोग्राम प्रोपेलंट, 420 किलोग्राम पेयजल, 24 किलोग्राम संकीर्ण हवा आणि 22 किलोग्राम ऑक्सीजन घेऊन गेला आहे.


Sumita Mitra's 'US National Inventors Hall of Fame' included

 1. भारतीय वंशाच्या कल्पक वैज्ञानिक सुमिता मित्रा यांचा अमेरिकेत ‘यूएस नॅशनल इनव्हेन्टर्स हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
 2. एकंदर ९८ पेटंट सुमिता मित्रा यांच्या नावावर आहेत. अमेरिकन केमिकल सोसायटीत त्या विज्ञान प्रशिक्षक होत्या.
 3. गेली तीन दशके रसायनशास्त्रातील ज्ञानाचा वापर त्यांनी मानवी कल्याणासाठी केला आहे. दातांचे आरोग्य व सौंदर्य टिकवण्यासाठी त्यांनी नॅनोकणांवर आधारित दंतभरण (नॅनो डेंटल फिलर्स) पदार्थ तयार केले.
 4. त्यांनी जे दंतभरण तयार केले आहे त्याचे नाव फिलटेक असून, त्याचे रीतसर व्यापारचिन्हही घेण्यात आले आहे.
 5. थ्री एम ओरल केअरमध्ये काम करताना त्यांनी हे दंतभरण तयार करण्यात यश मिळवले.
 6. त्यांनी अनेक दंत उत्पादने तयार केली असून, त्यांनी तयार केलेली दंतभरणे भक्कम असल्याने दंतरोगतज्ज्ञांकडे वारंवार जाण्याची वेळ येत नाही.
 7. त्यांच्या या संशोधनाने थ्री एम कंपनीला दोन अब्ज डॉलर्सचा फायदा झाला हेही एक व्यावसायिक यश आहे.
सुमिता मित्रा
 1. मित्रा या मूळ पश्चिम बंगालच्या असून, कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी रसायनशास्त्रात बीएस्सी पदवी घेतली. कार्बनी रसायनशास्त्रात त्यांनी कोलकाता विद्यापीठातून एमएस्सी पदवी घेतली.
 2. उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. तेथे त्यांनी मिशिगन विद्यापीठातून कार्बनी व बहुवारिक रसायनशास्त्रात पीएचडी केली.
 3. थ्री एम कंपनीतील ३० वर्षांच्या सेवेनंतर २०१०मध्ये त्या निवृत्त झाल्या, आता त्या मित्रा केमिकल कन्सलटन्सी ही कंपनी त्यांच्या पतीसह चालवतात.
 4. सुमिता यांनी एकूण १२० शोधनिबंध लिहिले आहेत. २००९मध्ये त्यांना हिरोज ऑफ केमिस्ट्री पुरस्काराने गौरवण्यात आले.


Celebrates the first 'Radio Festival' in the country in Delhi

 1. दिल्लीमध्ये 15 फेब्रुवारी 2018 रोजी भारतातला पहिला ‘रेडियो महोत्सव’ साजरा करण्यात आला.
 2. UNESCO च्या सहकार्याने हा महोत्सव ‘इंटरनॅशनल ऑफ विमेन इन रेडियो अँड टेलिव्हिजन’ तर्फे आयोजित केला गेला.
 3. याप्रसंगी थेट कलाप्रदर्शन, प्रदर्शनी आणि चर्चासत्रे अश्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.
 4. इंटरनॅशनल ऑफ विमेन इन रेडियो अँड टेलिव्हिजन (IAWRT) ही प्रसारण उद्योगातील महिलांची एक संघटना आहे.
 5. 1949 साली IAWRT ची स्थापना करण्यात आली.
 6. याचे अँस्टरडॅममध्ये मुख्यालय आहे.
 7. ही इलेक्ट्रॉनिक आणि संबंधित प्रसार माध्यमांच्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यावसायिक महिलांची संघटना आहे.
 8. IAWRT ला संयुक्त राष्ट्रसंघ वित्तीय व सामाजिक परिषद (ECOSOC) सह सल्लागार दर्जा प्राप्त आहे.


Famous Kathakali dancer, Madavoor Vasudevan Nair passed away

 1. केरळचे प्रसिद्ध कथकली नर्तक मदावूर वासुदेवन नायर यांचे आंचल येथील अगस्त्यकोड महादेव मंदिरात कथकली नृत्य सादर करीत असताना निधन झाले.
 2. कथकली नृत्याची अजोड समर्पणाने आराधना केलेल्या नायर यांना आपल्या आवडत्या कलेची आराधना करीत असतानाच मृत्यू आला.
 3. तिरुअनंतपुरम येथे ७ एप्रिल १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामा कुरूप हे लोकनर्तक होते तर आई शास्त्रीय गायिका.
 4. सुरुवातीला त्यांचा ओढा कर्नाटकी शास्त्रीय संगीत व भक्तिगीतांकडे होता. पण नंतर ते नृत्याकडे वळले.
 5. त्यांना कंबडीकाली व कुथीयोत्तम या लोकनृत्यप्रकारात विशेष प्रावीण्य होते. वयाच्या तेराव्या वर्षी नायर यांनी कथकलीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
 6. मदावूर परमेश्वरन पिल्ले हे त्यांचे कथकलीतील पहिले गुरू. नंतर ते कुरिची कुंजन पणिक्कर यांनी सुरू केलेल्या कथकली कलारी या संस्थेत दाखल झाले. नंतर ते पद्मश्री चेंगानूर रामन पिल्ले यांचे शिष्य बनले.
 7. ते काठी, पाचा, वेलाथाडी, मिनुकू पात्रांच्या आविष्करणात तरबेज होते. तसेच त्यांनी हनुमान, हंसम, रावण, दुर्योधन, कीचक, जरासंध, हिरण्यकश्यपू, नरकासुर हीपौराणिकपात्रेही साकारली.
 8. भारताशिवाय सिंगापूर, हाँगकाँग, फिजी, इंडोनेशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका या देशात त्यांचे कार्यक्रम झाले होते.
 9. थुलासीवनम पुरस्कार, अल्लापुझा क्लब पुरस्कार, केरळीय कलाक्षेत्र पुरस्कार, तपस्या अभिनंदन पत्र, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण (२०११) असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.


Jhulan Goswami is the first woman bowler to take 200 wickets

 1. भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी गोलंदाजझुलन गोस्वामी महिला वन-डे क्रिकेटमध्ये २०० बळी मिळवणारी पहिली महिला गोलंदाज ठरली आहे.
 2. दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्टला झेलबाद करत झुलनने वन-डे क्रिकेटमधला आपला २०० वा बळी टिपला.
 3. २०११ साली न्यूझीलंडविरुद्ध खेळताना झुलनने ३२ धावांत ६ बळी घेतले होते. ही तिच्या कारकिर्दीतली आतापर्यंची सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे.
 4. सध्या सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत झुलन गोस्वामी २०० बळींसह आघाडीवरआहे.
 5. यानंतर ऑस्ट्रेलियाची कॅथरिन फिट्झपॅट्रीक दुसऱ्या (१८० बळी) आणि ऑस्ट्रेलियाचीच लिसा स्थळेकर (१४६ बळी) तिसऱ्या स्थानावर आहे.
 6. त्याखालोखाल चौथा स्थानी वेस्ट इंडिजची अनिसा मोहम्मद (१४५ बळी) आणि पाचव्या स्थानी भारताची नितू डेव्हीड (१४१ बळी) आहेत.


Top

Whoops, looks like something went wrong.