india first internet telefoni service started

 1. सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने देशात पहिल्यांदाच इंटरनेट टेलीफोनी सेवेची सुरूवात केली आहे.
 2. या सेवेअंतर्गत बीएसएनएलचे ग्राहक मोबाइल अॅपद्वारे देशभरात कोणत्याही फोन क्रमांकावर कॉल करु शकतात. यासाठी बीएसएनएल ग्राहकांनी केवळ मोबाइल अॅप Wings डाउनलोड करण्याची गरज आहे. 
 3. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी ही सेवा लॉन्च केली.
 4. यापूर्वी, जर समोरच्या व्यक्तीकडे तुम्ही वापरत असलेले अॅप असेल तरच अॅपद्वारे फोन कॉल करणे शक्य व्हायचे. पण बीएसएनएलच्या Wings अॅपद्वारे देशातील कोणत्याही फोन नंबरवर कॉल करता येणार आहे. याद्वारे कॉल करण्यासाठी सिमकार्डची गरज लागत नाही. या आठवड्यापासूनच या सेवेसाठी नोंदणी सुरू होत असून 25 जुलैपासून ही सेवा सुरू होईल.
 5. Wings अॅपद्वारे बीएसएनएलचे ग्राहक देशातील कोणत्याही नेटवर्कच्या क्रमांकावर बीएसएनएल वाय-फाय किंवा अन्य कोणत्याही सर्विस प्रोवायडरद्वारे कॉल करु शकतात. अॅपद्वारे कॉलिंगला यापूर्वीच मान्यता मिळालेली आहे.
 6. मात्र, बीएसएनएलची ही सेवा मोफत नसेल, सामान्य कॉलचे नियम याला लागू असतील. कारण, ज्या टेलिकॉम कंपन्या इंटरनेट टेलीफोनी सेवा पुरवतात त्यांनी कॉल इंटरसेप्शन आणि मॉनिटरिंगचीही व्यवस्था करावी, असे स्पष्ट निर्देश टेलिकॉम आयोगाने दिले आहेत.


Gov has approved net nutrality

 1. केंद्र सरकारने नेट न्यूट्रॅलिटीच्या तत्वांना मंजुरी दिली त्यामुळे भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युझर्सबरोबर कोणताही भेदभाव केला जाणार नाही तसेच इंटरनेटच्या वापरावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
 2. बऱ्याच काळापासून भारतामध्ये नेट न्यूट्रॅलिटीचा मुद्दा चर्चेमध्ये होता. दूरसंचार आयोगाने ट्रायच्या नेट न्यूट्रॅलिटी संबंधींच्या शिफारशींना मंजुरी दिली. यामुळे इंटरनेट सेवा पुरवठादारांना यापुढे इंटरनेटचा स्पीड आणि कंटेट यामध्ये कोणताही भेदभाव करता येणार नाही.
 3. इंटरनेट वापरण्याच्या समानतेच्या तत्वावर अतिक्रमण होऊ नये अशी ट्रायने नोव्हेंबर 2017 मध्ये शिफारस केली होती. इंटरनेट हे मुक्त माध्यम असून त्यात कुठलाही भेदभाव होता कामा नये अशी ट्रायची भूमिका होती.
 4. ट्रायने आपल्या शिफारशी माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडे पाठवल्या होत्या. फक्त टेलिमेडिसीन सारख्या काही सेवांना ट्रायने आपल्या निर्णयातून वगळले आहे. हे नवीन क्षेत्र असून तिथे इंटरनेट स्पीड गरजेचा असल्याचे सरकारचे मत आहे.
 5. इंटरनेटचा वापर करण्यासाठी शुल्क देणाऱ्या कुठल्याही व्यक्ती, संस्था किंवा कंपनीला पक्षपात करून प्राधान्य न देता सर्वच उपभोक्त्यांना समान वागणूक दिली जाईल, हे नेट न्यूट्रॅलिटीचे तत्त्व आहे.


kharip jwari indian first biological variaty develop

 1. कुपोषण दूर करण्यासह बहुपयोगी असलेले खरीप ज्वारीचे जैवसमृद्ध वाण ‘परभणी शक्ती’ (पीव्हीके १००९) या नावाने विकसित करण्यात आले आहे.
 2. लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक असलेले हे देशातील पहिलेच वाण असून, ५ जुलै रोजी हैदराबाद येथे त्याचे प्रसारण करण्यात आले.
 3. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) व आंतरराष्ट्रीय अर्ध कोरवाडवाहू उष्णकटीबंधीय पीक संशोधन संस्था (इक्रीसॅट) (हैदराबाद) यांच्या संशोधनातून हे वाण विकसित करण्यात आले आहे.
 4. या संशोधित जैवसमृद्ध वाणामध्ये लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक असल्याने मानवी जीवनावर व आरोग्यावर चांगला परिणाम होणार आहे. हे वाण महिला व लहान मुलांमधील कुपोषण दूर करण्यास उपयुक्त ठरेल.
 5. रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होण्याचे प्रमाण देशात अधिक आहे. त्यामुळे या आजारासाठी हे वाण उपयुक्त ठरणार आहे.
 6. या संशोधित वाणामध्ये लोह प्रतिकिलो ४४ ते ४६ मिलीग्रॅम आणि जस्त प्रतिकिलो ३२ ते ३३ मिलीग्रॅम असून, भाकरीची प्रत चांगली आहे.
 7. या वाणाचा कडबाही उच्चप्रतीचा असून, उत्पादन क्षमता प्रती हेक्टरी ३६ ते ३८ क्विंटल व कडब्याचे उत्पादन १०५ ते ११० क्विंटल आहे. खोडमाशी, खोडकिड व काळ्या बुरशी या रोगास हा वाण प्रतिकारकक्षम आहे.
 8. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बिजोत्पादन करून लवकरच हे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे.


ravindra dahiya

 1. भारतीय वंशाचे वैज्ञानिक प्रा. रवींदर दहिया यांच्या अतिसंवेदनशील कृत्रिम त्वचा तयार करण्याच्या ‘ब्रेनी स्किन’ या प्रकल्पाला १५ लाख पौंडांचे अर्थसहाय्य मिळाले आहे.
 2. इलेक्ट्रॉनिक्स व नॅनोइंजिनीअरिंग विषयात प्राविण्य असलेले दहिया हे लवचीक इलेक्ट्रॉनिक उपकरणे व संवेदनशीलता तंत्रज्ञानातील तज्ञ आहेत.
 3. ते सध्या ग्लासगो विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्राध्यापक असून, त्यांनी भविष्यवेधी त्वचा तयार करण्याची संकल्पना प्रथम मांडली.
 4. त्यात खऱ्या त्वचेतील घटकांची नक्कल करून अतिशय लवचीक, अतिसंवेदनशील त्वचातयार करण्यात त्यांनी मोठी प्रगती साधली आहे.
 5. अनेकदा काही कारणांनी अवयव तोडावे लागलेल्यांना नैसर्गिक त्वचेमुळे असणारी संवेदना लाभत नाही, त्यांना ही त्वचा वरदान ठरणार आहे.
 6. त्याशिवाय संवेदनशीलता असलेली त्वचा धारण करणारे रोबोटही त्यातून तयार करता येणार आहेत.
 7. ब्रेनी स्किनमध्ये मानवी त्वचेप्रमाणेच न्यूरॉन्स असतील. तिला स्पर्श केल्यास त्यातील सिलिकॉन आधारित न्यूरल ट्रान्झिस्टर व ग्राफिनकीमुळे लगेच मेंदूला संदेश जाईल.
 8. कार्बनच्या पातळ पापुद्र्याइतकी जाड असलेली ही त्वचा अणूच्या जाडीएवढी, पण पोलादापेक्षाही मजबूत असेल.
 9. या त्वचेमध्ये प्रकाशीय विद्युत घट वापरले जाणार असून त्यातून प्रति चौरस सेंमीला २० नॅनोवॅट ऊर्जा उपलब्ध होईल.
 10. त्यांचे मूळ संशोधन हे इलेक्ट्रॉनिक त्वचा, रोबोटिक यंत्रणा, प्रॉस्थेटिक्स यात आहे. त्यांचे एकूण २०० शोधनिबंध व चार पुस्तके प्रकाशित आहेत.
 11. युरोपीय समुदायाच्या अनेक प्रकल्पांत त्यांनी नेतृत्व केले असून त्यांना मेरी क्युरी फेलोशिप मिळाली आहे.
 12. वयाच्या चाळिशीतील उत्तम स्कॉटिश वैज्ञानिकांमध्ये त्यांचा समावेश २०१६मध्ये करण्यात आला आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.