IIFA Awards 2018

 1. बँकॉक येथे २४ जून रोजी पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री विद्या बालन आणि मानव कौल यांच्या ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळवला.
 2. तर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेण्यात आला. श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी हा पुरस्कार स्विकारला.
 3. तसेच ‘हिंदी मीडियम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कार इरफान खानलादेण्यात आला.
 4.  आयफा पुरस्कार विजेत्यांची यादी:- 
  1. बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस: मेहर विज (सीक्रेट सुपरस्टार)
  2. बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर: नवाजुद्दीन सिद्दीकी (मॉम)
  3. बेस्ट स्टोरी : अमित मसूरकर (न्यूटन)
  4. बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल): अरिजीत सिंह, हवाएं (जब हैरी मेट सेजल)
  5. बेस्ट प्लेबॅक सिंगर (फीमेल): मेघना मिश्रा, मैं कौन हूं (सीक्रेट सुपरस्टार)
  6. बेस्ट बॅकग्राउंड स्कोर: प्रीतम चक्रवर्ती (जग्गा जासूस)
  7. सर्वश्रेष्ठ गीत: नुसरत फतेह अली खान, ए १ मेलोडी फना आणि मनोज मुंतशीर (मेरे रश्के कमर (बादशाहो))
  8. बेस्ट कोरियोग्राफी: विजय गांगुली आणि रुएल डोसन वारिन्दानी (जग्गा जासूस)
  9. बेस्ट स्पेशल इफेक्ट्स: एनआई वीएफएक्स (जग्गा जासूस)
  10. बेस्ट स्क्रीनप्ले: नितेश तिवारी आणि श्रेयश जेनस (बरेली की बर्फी)
  11. बेस्ट डॉयलॉग: हितेश केवल्य (शुभ मंगल सावधान)
  12. बेस्ट एडिटिंग: व्यंकट मैथ्यू (न्यूटन)
  13. बेस्ट साउंड डिजाइन: दिलीप सुब्रमण्यम आणि गणेश गंगाधरन (टाइगर जिंदा है)


 'Bright' Revolution in India

 1. एप्रिल-2018 मध्ये प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेला (PMUY) दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. 
 2. भारत हे 24 कोटी पेक्षा अधिक कुटुंबांचे घर आहे. त्यापैकी सुमारे 10 कोटी कुटुंबे अजूनही स्वयंपाक इंधन म्हणून LPG पासून वंचित आहेत आणि सरपण, कोळसा, गोवर्‍या अश्या स्वयंपाकाच्या मूळ इंधन स्त्रोतांवर अवलंबून आहेत, असे एका सर्वेक्षणामधून दिसून आले होते.
 3. अश्या पारंपरिक इंधनामुळे मोठ्या स्वरुपात घरगुती प्रदूषण होते आणि त्यामुळे महिला व मुलं यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन अनेक श्वसनाचे रोग / विकार उद्भवण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून ही योजना आणली गेली.
 4. प्रधान मंत्री उज्ज्वला योजना (PMUY):-
  1. 2016 साली प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेचा उत्तरप्रदेशच्या बल्लिया गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
  2. ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून राबवली जात असलेली प्रथम कल्याणकारी योजना आहे. 
  3. ही योजना ‘स्वच्छ इंधन, बेहतर जीवन’ या बोधवाक्याखाली राबवण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना स्वयंपाकासाठी इंधन म्हणून लिक्युईड पेट्रोलियम गॅस (LPG) पुरविण्यासाठी जोडणी प्रदान करणे आहे.
  4. या योजनेमार्फत, अशुद्ध स्वयंपाक इंधन किंवा जीवाश्म इंधन यावर चालवण्यात येणार्‍या पारंपरिक स्वयंपाक पद्धतीवरून वायु इंधनावर आधारित स्वच्छ स्वयंपाक पद्धतीवर येण्यासाठी महिलांना सक्षम केले जात आहे.
  5. या योजनेअंतर्गत, सामाजिक व आर्थिक जात गणना (SECC) माहितीच्या आधारावर ओळखल्या गेलेल्या दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील प्रौढ महिला सदस्येच्या नावे प्रत्येक LPG जोडणीसाठी रुपये 1600 ची आर्थिक मदत देण्यासोबतच विनामूल्य LPG जोडणी प्रदान करण्यात येते.
  6. ही योजना केंद्रीय अर्थसंकल्प 2016 मध्ये आर्थिक वर्ष 2016-17, 2017-18 आणि 2018-19 या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे.
  7. त्यासाठी 8,000 कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतुदीची घोषणा केली गेली. या योजनेच्या अंतर्गत तीन वर्षामध्ये 5 कोटी LPG जोडणी BPL कुटुंबांना देण्यात येणार आहे.
 5. योजनेची प्रगती:-
  1. योजनेच्या दोन वर्षांच्या काळात LPG जोडणीची संख्या 4 कोटींच्याही पुढे गेली आहे आणि भारतात LPGची जोडणी संख्या 2014 मधील 56% वरून 80% वर पोहोचली आहे.
  2. आज भारतात 20,227 LPG वितरक आहेत. शिवाय सन 2018-19 मध्ये आणखी 3,750 वितरकांची भर पडणार.
  3. एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून असलेले PMUY ग्राहक दरवर्षी चार किंवा अधिक सिलेंडर खरेदी करत आहेत.
  4. उज्ज्वला जोडणीमध्ये सुमारे अर्धा वाटा असलेल्या इंडियन ऑईल कॉरपोरेशन लिमिटेड (IOCL) कडून मे 2016 ते एप्रिल 2017 या कालावधीत 85.47 लक्ष उज्ज्वला ग्राहकांची नोंदणी केली गेली. मे 2016 पासून ते एप्रिल 2018 पर्यंत, या ग्राहकांचा सिलिंडर वापर वर्षाला सरासरी 4.4 एवढा होता.
  5. मे 2016 मध्ये नोंदणी झालेल्या पाच उज्ज्वला ग्राहकांपैकी एक दरवर्षी सात सिलिंडर वापरत आहे, म्हणजेच हे सन 2017-18 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील सरासरी 6.8 सिलिंडरच्या प्रमाणाला साध्य करते तसेच 60% लोक सध्या त्यांचा आठवा सिलिंडर वापरत आहेत.
  6. त्याचप्रमाणे कर्ज स्थगिती धोरण (loan deferment policy) उज्ज्वला ग्राहकांना कर्जाची रक्कम प्राप्त करण्याची अनुमती देते.
  7. हे धोरण 1 एप्रि ल 2018 पासून त्यांच्या पुढील सहा सिलेंडरच्या पुनर्भरणीकरणासाठी स्थगित करण्यात आले आहे. यामुळे ग्राहक या काळात अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.


 R. Pradhanandha India's youngest Grandmaster

 1. बुद्धिबळपटू आर. प्रग्नानंधा हा भारतातील सर्वात युवा आणि जगातील दुसरा युवा ग्रँडमास्टर ठरला आहे.
 2. जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर बनण्याचा मान सध्या रशियाकडून खेळणाऱ्या पण युक्रेनचा देशवासी असलेल्या सेर्गेट कार्जाकिन २००२मध्ये पटकावला होता. त्या वेळी कार्जाकिन १२ वर्षे ७ महिन्यांचा होता.
 3. इटली येथे झालेल्या ग्रेन्डिन ओपन बुद्धिबळ स्पर्धेत १२ वर्षे, १० महिने आणि १३ दिवसांच्या प्रग्नानंधाने अंतिम फेरीपूर्वीच ग्रँडमास्टरचा तिसरा नॉर्म पूर्ण केला.
 4. या स्पर्धेत पहिल्याच फेरीत प्रग्नानंधा पराभूत झाला होता. मात्र, हा त्याचा एकमेव पराभव ठरला. पुढील आठ फेऱ्यांमध्ये त्याने तीन डाव बरोबरीत सोडविले, तर पाच लढती जिंकल्या.
 5. या स्पर्धेत प्रग्नानंधाने ७.५ गुणांसह उपविजेतेपद मिळवले, तर क्रोएशियाच्या सॅरिक इव्हॅनने विजेतेपद मिळवले.
 6. २०१६मध्ये प्रग्नानंधा (१० वर्षे, १० महिने १९ दिवस) हा सर्वात युवा इंटरनॅशनल मास्टर ठरला होता.
 7. जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन ग्रँडमास्टर झाला त्यावेळी त्याचे वय १३ वर्षे ४ महिने होते. तर विश्वनाथ आनंदने हा सन्मान १८व्या वर्षी पटकावला.
 8. सगळ्यात तरूण भारतीय ग्रँडमास्टर आत्तापर्यंत परीमार्जन नेगी होता, ज्याने हा किताब १३ वर्षे ४ महिन्याचा असताना पटकावला होता.


 Removal DEBRIS: The first satellite demonstrating technology to clear space waste

 1. अंतराळामधील विविध मोहिमांमधून तयार झालेला मानवनिर्मित कचरा साफ करण्यासाठी एक संभाव्य उपाययोजना म्हणून एका नव्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक देणारा उपग्रह प्रथमच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) तर्फे तैनात करण्यात आला आहे आणि तो लवकरच कक्षेत प्रयोग सुरू करणार आहे.
 2. ब्रिटनने तयार केलेला रीमूव्हDEBRIS नामक उपग्रह हा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत असलेला धोकादायक कचरा हटविण्यासाठी केला जाणारा जगातला पहिला प्रयत्न आहे.
 3. ब्रिटनमधील सरे विद्यापीठाच्या सरे स्पेस सेंटरच्या नेतृत्वात अंतराळ कंपन्या आणि संशोधन संस्थांच्या सहाय्याने हा उपग्रह तयार केला गेला.
 4. या प्रकल्पाला युरोपीय संघाने सहकार्य दिलेले आहे.
 5. एप्रिल-18 च्या सुरुवातीला स्पेसएक्स CRS-14 च्या माध्यमातून ISSकडे ही मोहीम रवाना करण्यात आली होती.
 6. उपग्रहाचे कार्य:-
 7. 100 किलो वजनी हा उपग्रह जाळे आणि हार्पुनचा वापर करुन कचरा जमा करण्याचा प्रयत्न करेल आणि सोबतच कॅमेरा आणि रडार यंत्रणेमार्फत तपासणी करणार आहे.
 8. एक अभिनव प्रकारचे तंत्रज्ञान म्हणून ओळखले जात असलेले हे तंत्रज्ञान मासे पकडतात त्या प्रमाणे आपले जाळे पसरवून पुढे प्रवास करत त्यामध्ये कचरा पकडणार आणि संकलित केलेला हा कचरा पृथ्वीच्या दिशेनी ढकलणार आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना होणार्‍या घर्षणाने निर्माण होणार्‍या आगीत तो कचरा आपोआप जळून नष्ट होणार, अशी ही योजना आहे.


 The Prime Minister spoke through the 'Pragati' platform

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती व दळणवळण तंत्रज्ञान आधारित ‘प्रो-अॅक्टिव गव्हर्नन्स अँड टाइमली इंप्लीमेंटेशन’ (प्रगती/PRAGATI) या बहुपद्धती डिजिटल आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी आतापर्यंत 27 वेळा जनसंवाद साधला आहे.
 2. ‘प्रो-अॅक्टिव गव्हर्नन्स अँड टाइमली इंप्लीमेंटेशन’ (प्रगती/PRAGATI) व्यासपीठ हे एक अद्वितीय एकात्मिक आणि परस्परसंवादी व्यासपीठ आहे.
 3. हे मंच सामान्य जनतेच्या तक्रारींना संबोधित करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि त्याचबरोबर योजना आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मदत करते.
 4. यामध्ये डिजिटल डेटा मॅनेजमेंट, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि भू-स्थानिक तंत्रज्ञान या तीन नवीनतम तंत्रज्ञानांना एकात्मिक केलेले आहे.
 5. ही एक तीन (PMO, केंद्र शासनाचे सचिव आणि राज्यांचे मुख्य सचिव) स्तरीय प्रणाली आहे.
 6. याचा शुभारंभ 25 मार्च 2015 रोजी झाला आणि दर महिन्याला चौथ्या बुधवारी (प्रगती दिन) हा कार्यक्रम घेतला जातो.


Top

Whoops, looks like something went wrong.