Heart 10 kg of ISSF males for Hazarika Air rifle junior type gold medal

 1. चाँगवान (दक्षिण कोरिया) येथे ISSF विश्व क्रिडा स्पर्धेत भारतीय नेमबाज हृदय हझारिका ह्याने पुरुषांच्या 10 मी. एयर रायफल कनिष्ठ प्रकाराचे सुवर्णपदक पटकावले आहे.
 2. महिलांच्या 10 मी. एयर रायफल प्रकारात इलाव्हेनिल, श्रेया अगरवाल, मनिनी कौशिक यांनी एकूण 1880.7 अंकांचा नवा विश्वविक्रम रचत सुवर्णपदक जिंकले आहे.
 3. 1986 साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) कडून ऑलंपिक स्पर्धांमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी एक एकसंध प्रणाली म्हणून ISSF विश्वचषक स्पर्धेची स्थापना करण्यात आली.
 4.  दरवर्षी चार स्पर्धा घेतल्या जातात. सर्वोत्तम नेमबाजांसाठी 1988 सालापासून ISSF विश्वचषक अंतिम ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
 5. 1907 साली ISSF ची स्थापना करण्यात आली.


 Agreement between India and France for the implementation of the "Mobilize Your City" program

 1. भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान "मोबिलाइझ युवर सिटी (MYC)" कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी करार झाला आहे.
 2. या कार्यक्रमाचा 3 पथदर्शी शहरांना पाठिंबा आहे, ते म्हणजे - नागपूर, कोची व अहमदाबाद.
 3. या शहरांमध्ये स्थानिक पातळीवर शहरी गतिशीलता योजना राबवून शहरी वाहतुकीशी संबंधित हरितगृह वायूचे (GHG) उत्सर्जन कमी करण्यामध्ये चालविलेल्या त्यांच्या प्रयत्नांत आर्थिक तसेच तांत्रिक सहाय्य दिले जाणार आहे. 
 4. युरोपीय संघाने भारतात MYC कार्यक्रमाच्या अंतर्गत विशिष्ट गुंतवणूक आणि तांत्रिक मदतीच्या घटकांमध्ये योगदान देण्याकरिता फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (AFD) याच्या माध्यमातून 3.5 दशलक्ष युरोचा निधी देण्याचे मान्य केले आहे.
 5. "मोबिलाइझ युवर सिटी (MYC)" हा एका आंतरराष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग आहे.
 6. हा कार्यक्रम फ्रेंच आणि जर्मन सरकारद्वारा समर्थित आहे.
 7. हा कार्यक्रम डिसेंबर 2015 मध्ये COP21 परिषदेत सुरू करण्यात आला.


 5 MoU between India and Czech Republic

 1. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या झेक प्रजासत्ताक देशाच्या दौर्‍यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये 5 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत.
 2. झालेले करार –
  1. भारताचे विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि झेक अॅकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यात सहकार्यासाठी
  2. राजकीय पारपत्र (passport) धारकांना व्हिसा सवलत देण्याकरिता
  3. भारताच्या बाजूने पुढाकार घेत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागासह, विज्ञान आणि तंत्रज्ञान वैविध्यपूर्ण विषयांमध्ये भारत-झेक प्रकल्पाला मदत करण्याकरिता कृतीयोजना
  4. ELI बीमलाइन्स आणि टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) यांच्या दरम्यान लेझर तंत्रज्ञांच्या क्षेत्रात सहकार्यासाठी
  5. हरयाणा कृषी विद्यापीठ आणि झेक यूनिव्हर्सिटी ऑफ लाइफ सायन्सेस यांच्या दरम्यान सहकार्यासाठी


International Literacy Day: September 8

 1. संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि संस्कृतिक संघटना (UNESCO) याच्या नेतृत्वात 8 सप्टेंबरला जगभरात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन पाळला जातो.
 2. या वर्षी 52वा साक्षरता दिन 'लिटरेसी अँड स्किल्स डेव्हलपमेंट' या विषयाखाली पाळला जात आहे.
 3. संपूर्ण जगात दरवर्षी 8 सप्टेंबर या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ पाळला जातो.
 4. 1965 साली या तारखेला तेहरानमध्ये शिक्षण मंत्र्यांच्या वैश्विक शिखर परिषदेच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच बैठक आयोजित केली गेली.
 5. UNESCOने नोव्हेंबर 1966 मध्ये आपल्या 14व्या सत्रात 8 सप्टेंबर या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ म्हणून घोषित केले.
 6. या दिनी सक्रियपणे आंतरराष्ट्रीय समुदायांना एकत्र आणणे आणि व्यक्ती, समुदाय आणि संघटना यांना सक्षम बनवण्यासाठी एक साधन म्हणून साक्षरतेला प्रोत्साहन दिले जाते.


Top

Whoops, looks like something went wrong.