GUINEES BOOK RECORD OF GADCHIROLI POLICE HEADQUARTER

 1. हिंसक माओवाद्यांचा गड असलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ात ‘गांधी विचार व अहिंसा‘ या पुस्तकाद्वारे शांततेचा संदेश देणाऱ्या गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाचे नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलेआहे. 
 2. एखाद्या पोलीस मुख्यालयाचे नाव अशा पद्धतीने गिनेस बुकात नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 3. गिनेस बुकच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत घोषणा करताच जिल्हा पोलीस दल व आदर्श मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पोलीस विभागाने सायंकाळी सर्व सहकाऱ्यांना सन्मानित केले.
 4. तसेच हा व्रिकम करताना पोलीस कवायत मैदानावर 12 सी.ए.ची ऑडिटिंग टीम, 13 ऑनलाइन कॅमेरे, एक ड्रोनची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित सर्वाच्या हाताला एक बारकोड टॅग लावण्यात आला.
 5. जवळपास 20 मिनिटापर्यंत पुस्तकाचे वाचन करून त्याचे सर्व दस्तऐवज ऑनलाइन गिनीज बुककडे पाठवण्यात आले.
 6. गिनीज बुकच्या अधिकाऱ्यांनी दस्तऐवजाची पाहणी व तपासणी करून 23 जुलै रोजी रात्री आपला निर्णय घोषित केला


KAKASAHEB SHINDE NAME TO AURANGABAD BRIDGE

 

 1. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कायगाव टोका (ता. गंगापूर जि.औरंगाबाद) येथे गोदावरी नदीच्या पुलावरून काकासाहेब शिंदे यांनी उडी घेत जलसमाधी घेतली होती.
 2. त्या पुलाचे ‘स्मृतिशेष काकासाहेब शिंदे पूल‘ असे नामकरण संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आले.
 3. 25 जुलै रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, कोषाध्यक्ष संतोष गाजरे तसेच काही मान्यवरांनीही काकासाहेब शिंदे यांच्या कुटुबियांची भेट घेऊन सांत्वन केले.


China defence expenditure triple to india

 1. चीनचा संरक्षण खर्च गेल्या वर्षी भारतापेक्षा तीन पटींनी अधिक होता पण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत संरक्षण सामुग्री खरेदीवर त्यांनी केलेला खर्च हा भारतापेक्षा कमी होता, असे केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी लोकसभेत सांगितले.
 2. चीनच्या वार्षिक संरक्षण अर्थसंकल्पाबाबत कुठलीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेच्या आकडेवारीनुसार चीनचा संरक्षण खर्च 2017 मध्ये 228230 दशलक्ष डॉलर्स होता तर भारताचा खर्च 63923 दशलक्ष डॉलर्स होता.
 3. 2016 मध्ये चीनचा संरक्षण खर्च 216031 दशलक्ष डॉलर्स होता तर भारताचा खर्च 56637 दशलक्ष डॉलर्स होता.
 4. 2017 मध्ये भारताने सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2.5 टक्के खर्च संरक्षण सामुग्री खरेदीवर केला तर चीनमध्ये हेच प्रमाण 1.9 टक्के होते.
 5. 2017 मध्ये भारताचा लष्करावरील खर्च 9.1 टक्के तर चीनचा 6.1 टक्के होता.


Top

Whoops, looks like something went wrong.