Gross National Product (GDP) growth rate at 6.3 percent

 1. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुरू असलेली घसरण अखेर थांबली असून भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) दुसऱ्या तिमाहीतील वृद्धीदर ६.३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
 2. चालू आर्थिक वर्षांतील हा सर्वाधिक वृद्धीदर आहे.
 3. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत जीडीपीचा वृद्धीदर ५.७ टक्क्यांपर्यंत घसरला होता.
 4. हा वृद्धीदर तीन वर्षांतील सर्वात निचांकी दर ठरला होता.
 5. याशिवाय गेल्या पाच तिमाहींमध्येही घसरणच पाहायला मिळाली होती.
 6. या घसरणीच्या गर्तेतून बाहेर पडत आता जीडीपीच्या वृद्धीदराने ६.३ पर्यंत मजल मारली आहे.
 7. नोटाबंदी आणि जीएसटीनंतर भारताच्या अर्थव्यवस्थेत सुस्तावलेपणा आला होता.
 8. त्यानंतर जीडीपीचा वृद्धीदर वाढवण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते.
 9. त्याला अखेर यश आले असून जीडीपी वृद्धीदराने गाठलेली ६.३ टक्क्यांपर्यंतची मजल अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी ठरणार आहे.
 10. दरम्यान, नोटाबंदीनंतर गुंतवणुकीवर मोठा परिणाम झाला होता.
 11. आता कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढे येऊ लागल्या आहेत.
 12. त्यामुळे वृद्धीबरोबरच रोजगारांनाही चालना मिळणार आहे.

 

        जीडीपीचे आजपर्यंतचे दर

जुलै-सप्टेंबर २०१५ - ७.४ %
ऑक्टोबर-डिसेंबर २०१५ - ७.३ %
जानेवारी-मार्च २०१६ - ७.९ %
एप्रिल-जून २०१६ - ७.१ %
जुलै-सप्टेंबर २०१६ - ७.३ %
ऑक्टोबर-डिसेंबर २०१६ - ७ %
जानेवारी-मार्च २०१७ - ६.१ %
एप्रिल-जून २०१७ - ५.७ %

एप्रिल-जून २०१७ - ५.७ %

जुलै-सप्टेंबर २०१७ - ६.३ %

 

 


By 2020, the 'National AYUSH Mission (NAM)' was approved

 1. देशात प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धतीच्या वारसास बळकटी आणण्यासाठी भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) या केंद्र पुरस्कृत योजनेला 1 एप्रिल 2017 पासून ते 31 मार्च 2020 पर्यंत पुढे सुरू ठेवण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.
 2. या मंजुरीत तीन वर्षांच्या कालावधीत 2400 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

वैशिष्ठ्ये:-

 1. NAM ची अंमलबाजवणी आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी (AYUSH) मंत्रालयाद्वारा केली जात आहे.
 2. याचा उद्देश्य कमी पैश्यात  आयुष सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.
 3. आयुष रुग्णालये आणि दवाखाने अद्ययावत करणे.
 4. प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये आयुष सुविधा उपलब्ध करून देणे.
 5. आयुष शिक्षण संस्था, राज्य शासन, आयुर्वेद, सिद्ध, यूनानी व होमिओपॅथी औषधीवितरण केंद्रांना अद्ययावत करून राज्य-स्तरीय संस्थात्मक क्षमता मजबूत करणे.
 6. आयुर्वेद, सिद्ध, यूनानी व होमिओपॅथी अंमलबजावणी यंत्रणा आणि औषधी तपासणी प्रयोगशाळा उभारणे.
 7. योग्य कृषी सरावांना वापरत आणून औषधी वनस्पतींची शेती करण्यास मदत देणे, जेणेकरून त्यांच्या साठवण आणि वितरण संरचनेचा विकास तसेच कच्च्या मालाची सतत मागणी पूर्ण केली जाऊ शकणार आहे.
 8. राष्ट्रीय आयुष अभियानाला सप्टेंबर 2014 मध्ये सुरूवात केली गेली.
 9. भारत सरकारने देशामध्ये होमिओपॅथीचा समावेश असलेले राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) योजनेच्या जाहिरातीसाठी आयुष प्रणाली अंमलात आणली आहे.
 10. हे अभियान देशामध्ये आणि मुख्यत्वेकरून वंचित व दुर्गम भागांमध्ये आयुष आरोग्य सेवा/शिक्षण उपलब्ध करून देत राज्य/केंद्रशासित प्रदेश शासनांच्या प्रयत्नांना पाठबळ पुरवत आहे.
 11. जेणेकरून आरोग्य सेवांमधील तफावत दूर केली जाऊ शकणार असून याशिवाय, वार्षिक योजनांसाठी अधिक स्त्रोतांना पूर्ण करण्यासाठी तरतूद देखील केली जात आहे.


The WHO's 'Tracking Universal Health Coverage: 2017 Global Monitoring' report is famous

 1. जागतिक बॅंक (WB) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांचा ‘ट्रॅकिंग यूनिवर्सल हेल्थ कव्हरेज: 2017 ग्लोबल मॉनिटरींग’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 2. जगातल्या 7.3 अब्ज लोकसंख्येपैकी जवळपास अर्ध्या (2.3 ते 3.5 अब्ज) लोकसंख्येला आवश्यक आरोग्य सेवा प्राप्त करू शकत नाही आहेत.
 3. आरोग्य सेवा प्राप्त करण्यासाठी स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहे.
 4. दर वर्षी मोठ्या संख्येने कुटुंबांना दारिद्र्याच्या दरीत ढकलल्या जात आहे.

ठळक बाबी:-

 1. 21 व्या शतकात लसीकरण आणि कुटुंब नियोजन तसेच HIV साठी अॅंटी-रेट्रोव्हायरल उपचार आणि मच्छरदाणी अशा काही मुख्य आरोग्य सेवा प्राप्त करण्यासाठी सक्षम लोकांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले आहे.
 2. सध्या 800 दशलक्ष लोकांना त्यांच्या कुटुंबातील एकूण खर्चाच्या साधारणपणे 10% भाग स्वत:वर तसेच कुटुंबातीलअन्य सदस्यांवर आरोग्य खर्च म्हणून खर्च करावा लागत आहे.
 3. जवळजवळ 100 दशलक्ष लोकांना हा खर्च परवडत नाही आणि त्यांना दिवसाला फक्त $ 1.90 किंवा त्यापेक्षा कमी खर्चावर जगण्यास भाग पाडत आहे.
 4. उप-सहारा आफ्रिका आणि दक्षिण आशिया या प्रदेशात सेवा उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आढळून येते.
 5. इतर क्षेत्रांमध्ये, कुटुंब नियोजन आणि बाळाचे लसीकरण अश्या प्राथमिक आरोग्य सेवा अधिक उपलब्ध होत आहेत, मात्र याचा खर्च त्यांनाच द्यावा लागतो.
 6. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रत्येक पाचव्या दरिद्री कुटुंबामधील फक्त 17% माता व मुलांना सात मूलभूत आरोग्य हस्तक्षेप सेवांपैकी किमान सहा सेवा मिळतात.
 7.  जेव्हा की श्रीमंत कुटुंबामधील माता व मुलांच्या बाबतीत हे प्रमाण 74% आहे.
 8. पूर्व आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोप अश्या क्षेत्रात तर लोकांना त्यांच्या कुटुंबावरील एकूण खर्चापेक्षा साधारणपणे 10% वाटा आरोग्य सेवांवर खर्च करावा लागतो.
 9. पूर्व आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोप या क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा प्राप्त करण्याचा स्तर सर्वाधिक आहे.
 10. तर उप-सहारा येथे हा स्तर सर्वाधिक कमी आहे.


 Victory Day - Celebrated on 16th December

 

 1. वर्ष 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध दरम्यान 16 डिसेंबरला भारताने पाकिस्तानचा पराभव केला.
 2. या दिवसाला चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी 16 डिसेंबरला भारतात ‘विजय दिवस’ साजरा करतात.
 3. भारत-पाक युद्धातील पाकिस्तानच्या पराभवानंतर 16 डिसेंबर 1971 रोजी ढाकामध्ये पाकिस्तानी जनरल ए. के. नियाजी यांनी आपल्या 93000 पाकिस्तानी सैनिकांसोबत भारतीय कमांडर ले. जनरल जगजीत सिंह अरोडा यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.
 4. या युद्धात जवळपास 3,900 भारतीय सैनिक शहीद तर 9,851 जखमी झाले होते.
 5. याशिवाय भारतात दरवर्षी 26 जुलैला ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो.
 6.  1999 साली भारतीय लष्कराच्या सैनिकांनी कारगिल आणि त्याच्या आसपासचा प्रदेश ताब्यात घेऊन ते युद्ध जिंकले होते.


Snehlata Shrivastav appointed as Lok Sabha Secretary General

 1. लोकसभेच्या महासचिवपदी स्नेहलता श्रीवास्तव यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
 2. नोव्हेंबर महिन्यात त्यांची लोकसभेच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
 3. कार्यकाळ १ डिसेंबर २०१७ -- ३० नोव्हेंबर २०१८
 4. लोकसभेचे विद्यमान मुख्यसचिव अनुप मिश्रा ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले, त्यानंतर १ डिसेंबर रोजी श्रीवास्तव यांनी पदभार स्विकारला. 
 5. स्नेहलता श्रीवास्तव या १९८२च्या बॅचच्या मध्यप्रदेश कॅडरच्या सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
 6. त्यांनी मध्य प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
 7. श्रीवास्तव यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाच्या सचिव म्हणून तसेच अर्थ मंत्रालयातील विशेष/अतिरिक्त सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
 8. लोकसभेच्या महासचिवसारख्या सर्वोच्च पदावर एखाद्या महिलेची नियुक्ती करण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 9. राज्यसभेत रमा देवी या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.


Rohit Sharma's third double century

 1. पंजाबमधील मोहाली येथील मैदानावर श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने कारकिर्दीतील तिसरे द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला.
 2. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.
 3. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा पहिला कर्णधारही ठरला आहे.
 4. त्याने १५३ चेंडूंमध्ये केलेल्या २०८ धावांच्या धमाकेदार खेळीत १३ चौकार १२ षटकारांची आतिषबाजी केली.
 5. रोहित शर्माने पहिल्या शंभर धावा ११५ चेंडूत तर नंतरच्या शंभर धावा अवघ्या ३६ चेंडूत पूर्ण केल्या.
 6. रोहितच्या या धमाकेदार खेळीमुळे भारताने या सामन्यात श्रीलंकेचा १४१ धावांनी पराभव केला. 
 7. २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्द रोहितने कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावताना २०९ धावांची खेळी साकारली होती.
 8. २०१४मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावा करत वनडेतील दुसरे द्विशतक झळकावले होते.
 9. ही खेळी कोणत्याही खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे.
 10. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१०मध्ये वनडेतील पहिले द्विशतक झळकावले होते.
 11. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २०० धावांची खेळी केली होती.
 12. याशिवाय भारताचा वीरेंद्र सेहवाग, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलनेही आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.