Graduate and Teachers' Constituency: 50 percent of valid votes required for victory

 1. मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या विधान परिषदेच्या चार मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी  गुरुवारी होणार आहे. या पाश्र्वभूमीवर या मतदारसंघांच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती.
 2. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची मतमोजणी कशी होते?
  1. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये मतमोजणीसाठी वेगळी पद्धत असते.
  2. एकूण वैध मतांच्या ५० टक्के मते मिळाली तरच तेवढी मते मिळणारा उमेदवार पहिल्या फेरीत विजयी म्हणून जाहीर केला जातो.
  3. एकूण वैध मतांच्या ५० टक्के कोणत्याही उमेदवाराला न मिळाल्यास पुढील पसंतीची मते मोजली जातात.
  4. त्यातही अनेकदा आवश्यक मतांचा कोटा पूर्ण होत नाही. मग सर्व मतांची मोजणी पूर्ण झाल्यावर सर्वाधिक मते मिळणारा उमेदवार विजयी म्हणून घोषित केला जातो.
  5. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये पारंपरिक मतपत्रिकांचा वापर केला जात असल्याने मतमोजणीला बराच वेळ जातो.
  6. कारण ५० टक्के मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास पुन्हा सर्व मतपत्रिका मोजाव्या लागतात.
 3. राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ किती आहेत?
  1. ७८ सदस्यीय विधान परिषदेत सात मतदारसंघ हे पदवीधर तर सात मतदारसंघ हे शिक्षकांसाठी आहेत.
  2. एकूण १४ सदस्य हे पदवीधर व शिक्षकांमधून निवडले जातात.
  3. ३० सदस्य हे विधानसभेतून निवडले जातात, २२ सदस्य हे स्थानीय स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात.
  4. १२ सदस्य हे राज्यपालांकडून नियुक्त केले जातात.


Applying the complete plastic ban from June 23 in Maharashtra

 1. महाराष्ट्र सरकारने २३ मार्च रोजी अधिसूचना काढत लागू केलेली सरसकट प्लास्टिकबंदी तीन महिन्यांनंतर म्हणजेच २३ जूनपासून लागू होत आहे.
 2. प्लास्टिकबंदीबाबत सविस्तर माहितीसाठी मुंबईतील नागरिकांना १८०० २२२ ३५७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.
 3. प्लास्टिकबंदीमध्ये नेमकी कशावर बंदी असेल, प्लास्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास दंड किती याचा घेतलेला हा आढावा.
 4. बंदी कशावर?
  1. प्लास्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या. पातळ-जाड, बंध असलेल्या-नसलेल्या सर्व पिशव्या.
  2. थर्माकोल व प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या व एकदाच वापरून फेकल्या जाणाऱ्या वस्तू. उदा. ताट, वाटय़ा, ग्लास, चमचे इ.
  3. उपाहारगृहात अन्न देण्यासाठी वापरले जाणारे डबे, स्ट्रॉ, नॉनवोवन पॉलिप्रॉपिलेन बॅग. (वोवन पॉलिप्रॉपिलेन बॅग या धान्य साठवण्यासाठी वापरल्या जातात.)
  4. नारळपाणी, चहा, सूप इ. पातळ पदार्थ देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्या.
  5. थर्माकोल व प्लास्टिकचे सजावट साहित्य.
 5. बंदी कशावर नाही?
  1. उत्पादकांकडूनच प्लास्टिकच्या वेष्टनात येणारे पदार्थ. उदा. ब्रॅण्डेड वेफर्स, चिवडा इ.
  2. ब्रॅण्डेड शर्ट, ड्रेस, साडय़ा यांची उत्पादकांकडून गुंडाळलेली प्लास्टिक वेष्टने.
  3. ब्रॅण्डेड दूध, तेल असलेल्या जाड प्लास्टिक पिशव्या तसेच बाटलीबंद पाणी.
  4. शेती, रोपवाटिका, ओला कचरा जमा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विघटनशील प्लास्टिकच्या पिशव्या.
  5. निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक.
  6. औषधांसाठी वापरले जाणारे वेष्टन.
 6. कारवाई कुठे?
  1. सर्व दुकाने, कंपन्या, सार्वजनिक ठिकाणे, वने, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, शासकीय, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृह व नाट्यगृह.
 7. कारवाई कोणावर?
  1. राज्यातील कोणतीही व्यक्ती व व्यक्तींचा समूह, दुकानदार, मॉल्स, फेरीवाले, वितरक, वाहतूकदार, मंडई, कॅटरर्स इत्यादी.
 8. दंड आणि शिक्षा:-
  1. महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम २००६नुसार नियमभंग केल्यास पहिल्या वेळी ५ हजार रुपये आणि दुसऱ्या वेळी १० हजार रुपये दंडाची तरतूद.
  2. तिसऱ्या वेळी पकडले गेल्यास २५ हजार रुपये व ३ महिन्यांच्या कैदेची तरतूद.


Overtime allowance will be discontinued by central employees

 1. बहुतांश केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम भत्ता आता बंद करण्यात येणार असून तसा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
 2. कार्मिक मंत्रालयाने याबाबत अधिसुचना जारी केली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे.
 3. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनेक वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे.
 4. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये ऑपरेशनल स्टाफ आणि औद्योगिक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सर्व केंद्रीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम भत्ता थांबवण्यात येणार आहे, असे खर्च विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 5. सर्व केंद्रीय मंत्रालये/विभाग, भारत सरकारशी जोडलेली आणि संलग्न असलेल्या सर्वप्रकारच्या कार्यालयांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
 6. त्याचबरोबर सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या प्रशासनाला त्यांच्याकडील ऑपरेशनल स्टाफची यादी तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
 7. तसेच केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांवर बायोमेट्रिक उपस्थिती असल्यास ओव्हरटाईम भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑपरेशनल स्टाफच्या ओव्हरटाइम भत्त्यात बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा भत्ता 1991च्या आदेशाप्रमाणेच कायम राहणार आहे.


Bilateral relations between India and the Seychelles

 1. सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॅनी फ्यूरूर त्यांच्या प्रतिनिधीमंडळासह भारत भेटीवर आले आहेत.
 2. सेशेल्स हा पूर्व आफ्रिकेजवळ हिंद महासागरातला 115 बेटांचा एक द्वीपसमूह आणि देश आहे. आतापर्यंत द्वैपक्षीय संबंधातून, सेशेल्सच्या 70% सैन्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांना लागणारी जवळजवळ 50% सैन्य मालमत्ता भारताकडून पुरविण्यात आली आहे.
 3. भारताने सेशेल्सला तटरक्षक दलाची एक फास्ट ट्रॅक नौका, एक डॉर्नियर विमान आणि दोन हेलिकॉप्टर भेट दिली आहे.
 4. भारत आणि सेशेल्स यांच्यामधील आर्थिक आणि रणनीतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने केल्या जाणार्‍या प्रयत्नामधून सहा करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत.
 5. ते आहेत -
  1. स्थानिक संस्था, शैक्षणिक आणि व्यावसायिक संस्था यांच्यामार्फत लघुविकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी इंडियन अनुदानित सहाय्य संबंधात सामंजस्य करार
  2. भारताचे पणजी (महानगरपालिका) आणि सेशेल्सचे व्हिक्टोरिया या शहरांच्या पालिका दरम्यान मैत्री आणि सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी जुळी-शहरे संबंधी करार
  3. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात भारतीय कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-in) आणि सेशेल्सचा माहिती दळणवळण तंत्रज्ञान विभागात सहकार्यासाठी सामंजस्य करार
  4. सन 2018-2022 या काळात सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम
  5. भारतीय नौदल आणि सेशेल्सचे राष्ट्रीय माहिती सामायिकीकरण आणि समन्वय केंद्र यांच्यात अधिकृत जलवाहतुकीसंदर्भात माहिती सामायिक करण्यासंबंधी तांत्रिक करार
  6. दोन्ही देशांच्या परराष्ट्र सेवा संस्थेदरम्यान सामंजस्य करार
 6. याशिवाय, 2015 साली झालेल्या कराराप्रमाणे भारताला आता सेशेल्सच्या असोम्पशन बेटावर तटरक्षक दलाची धोरणात्मक सुविधा विकसित करता येईल.
 7. सेशेल्सच्या 1.3 दशलक्ष वर्ग किलोमीटर पसरलेल्या विशेष आर्थिक क्षेत्राची (EEZ) देखरेख करण्यासाठी भारत आपले दुसरे डॉर्नियर हे समुद्री गस्त विमान सोपवणार आहे.


Famous Urdu comedian Mushtaq Ahmed Yusufi passes away

 1. प्रसिध्द उर्दू व्यंग्यकार आणि विनोदी लेखक मुश्ताक अहमद युसूफी कराची येथे वयाच्या ९७व्या वर्षी निधन झाले.
 2. पाकिस्तानच नव्हे तर भारतातील उर्दू साहित्यवर्गातील ते सर्वाधिक वाचले गेलेले व लोकप्रिय विनोदी लेखक गणले जातात. त्यांचीतुलना उर्दूतील इब्ने इन्शा या नामवंत साहित्यिकाशी केली जाते.
 3. मुश्ताक अहमद युसूफी यांचा जन्म ४ सप्टेंबर १९२१ रोजी टोंक (राजस्थान) येथे झाला. फाळणीनंतर ते कराचीला गेले.
 4. त्यांनी आग्रा विद्यापीठातून तत्त्वज्ञानात एमए पदवी घेतली. नंतर अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. पुढे त्यांच्या उर्दू साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना डीलिट ही पदवीही प्रदान करण्यात आली.
 5. व्यवसायाने बँकर असलेल्या युसूफी यांनी पाकिस्तानातील अलाइड बँक, युनायटेड बँक व पाकिस्तान बँकिंग काउन्सिलची सर्वोच्च पदे त्यांनी भूषविली.
 6. अर्थजगतामध्ये वावरत असताना दुसरीकडे त्यांचे विनोदी लेखनही सुरू होते. त्यांचे लिखाण बहुप्रसव झाले नसले तरी ते अत्यंत वाचकप्रिय होते.
 7. चिराग तले, खाकम बदहन, जरगुजिश्त, आबे गुम आणि शामे शहरे यारां हे त्यांचे पाच विनोदी लेखसंग्रह उर्दू साहित्य जगतात अफाट लोकप्रिय आहेत.
 8. ते समाजातील सांस्कृतिक, नैतिक धारणा, मानवी स्वभावाचे वैविध्य, राजकीय व्यक्तिमत्त्वांची अनाकलनीय वृत्ती यावर अत्यंत मिश्कीलपणे व्यंगात्मक भाष्य करीत.
 9. मात्र त्यांच्या विनोदातील व्यंग अथवा उपरोध बोचरा नव्हता, किंबहुना विचार करण्यास प्रवृत्त करणाराच होता.
 10. समाजातील त्याज्य रूढी, परंपरांना विनोदाची टाचणी लावताना ते घाबरले नाहीत. धर्माध वर्ग त्यांच्या लिखाणामुळे कधी दुखावला गेला असेही घडले नाही.
 11. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांना आदमजी पुरस्कार, सितारा ए इम्तियाज, हिलाल ए इम्तियाज, पाकिस्तान अकादमी ऑफ लेटर्स, कायदे आजम मेमोरियल मेडल आदी अनेक पुरस्कार मिळाले.
 12. हिलाल ए इम्तियाज हा पाकिस्तानात साहित्य क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. 


Top

Whoops, looks like something went wrong.