
2710 21-Jan-2018, Sun
- गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची मध्यप्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- पटेल यांची ही नियुक्ती गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांच्याजागी करण्यात येत आहे.
- कोहली यांच्याकडे मध्यप्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त भार होता.
- 76 वर्षीय आनंदीबेन पटेल 1987 साली भारतीय जनता पक्षात (भाजप) समावेश केला आणि 1994 साली त्यांची राज्यसभेत निवड झाली.
- त्या 1991 साली मंडल (बेचराजी जिल्हा) मतदारसंघातून पहिल्यांदा राज्य विधानसभेवर निवडून आल्या.
- त्यानंतर 2007 साली उत्तर गुजरातच्या पाटण आणि 2012 साली अहमदाबाद शहरातील घाटलोडिया मतदारसंघातून जिंकून आल्या.
- त्या गुजरातच्या प्रथम महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत.