Former Deputy Speaker of Legislative Council Vasant Davkhare passed away

 1. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे वयाच्या ६८व्या वर्षी निधन झाले.
 2. किडनी निकामी झाल्याने त्यांच्यावर बॉम्बे रूग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
 3. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा माणूस अशी डावखरे यांची ओळख होती. राष्ट्रवादीसह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.
 4. हिवरे गावच्या सरपंचापासून थेट विधान परिषद उपसभापतीपदापर्यंतचा प्रवास या अभ्यासू कार्यकर्त्याने पूर्ण केला.
 5. डावखरे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हिवरे या गावी झाला. त्यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले.
 6. पदवीधर झाल्यानंतर त्यांची ओळख राजकारणातील तत्कालीन मातब्बर नेते बाळासाहेब देसाई यांच्याशी झाली. काही काळ देसाई यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिले. 
वसंत डावखरे यांचा राजकीय प्रवास
 1. १९८०साली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डावखरे यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
 2. १९८६साली त्यांनी कॉंग्रेस पक्षाकडून ठाणे महापालिकेची निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले.
 3. त्यांच्या प्रयत्नांमुळे १९८७मध्ये प्रथमच महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आली. १९८७ ते १९९३पर्यंत महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. काही काळ त्यांनी ठाण्याचे महापौरपदही भूषविले.
 4. १९९२पासून सतत चार वेळा ते राज्य विधानपरिषदेवर निवडून गेले. त्यानंतर सलग १८ वर्षे त्यांनी परिषदेचे उपसभापती पद भूषविले.
 5. २५ मे १९९९ला शऱद पवार यानी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी काँग्रेस सोडून डावखरे राष्ट्रवादीत गेले.
 6. राजकारणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला.
 7. कार्यकर्तृत्वाच्या चढ्या आलेखामुळेच राजकारणातील देव माणूस म्हणूनही ते ओळखले जात होते.


Ozone layer can be filled by the hole: NASA

 1. पृथ्वीवरील जीवनास संरक्षण देणार्‍या ओझोन थरातले छिद्र हा एक वैश्विक चिंतेचा मुद्दा आहे. मात्र NASA ने चालविलेल्या एका अभ्यासातून आढळून आले आहे की, नियोजित पर्यावरणास अनुकूल सरावांनी हे छिद्र भरून काढता येण्याजोगे आहे.
 2. NASA च्या औरा उपग्रहाने केलेल्या मोजमापानूसार, शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून अंटार्क्टिक ओझोन छिद्रामध्ये क्लोरीन पातळीचा अभ्यास करत आहेत आणि ही पातळी कमी होत आहे. 2005 सालापासून झालेल्या छिद्रामध्ये 20% ची घट झाली असे निर्देशनास आले.
 3. ओझोन थराला हानी पोहचवणार्‍या पदार्थांवर प्रतिबंध घालणार्‍या ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’च्या यशाचा हा पहिला निश्चित पुरावा आहे. 1987 सालच्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलने रेफ्रिजरेटर आणि एरोसोल स्प्रेमधील प्रोपेलंट यामध्ये पूर्वी वापरात असलेल्या क्लोरोफ्लुरोकार्बन (CFC) ला सरावामधून बाद केले.
 4. ओझोन थर आणि छिद्राविषयी:-
  1. ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू आहे. ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र O3 असे लिहितात.
  2. क्रिस्टियन फ़्रेड्रिक स्कोएनबेन या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने 1840 साली ओझोनचा शोध लावला.
  3. 1913 साली फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्‍री बुइसन यांनी पृथ्वीवरील ओझोन थराचा शोध लावला. 1930 साली भौतिकशास्त्रज्ञ सिडनी चॅपमॅन यांनी ओझोनचा थर तयार होण्याची प्रक्रिया शोधून काढली.
  4. सहसा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 7 ते 25 मैल (11 ते 40 किलोमीटर) वरती आकाशात स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोनचा (O3) थर आहे, जे एखाद्या सनस्क्रीन प्रमाणे पृथ्वीवर येणार्‍या सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून होणार्‍या हानीकारक प्रभावांपासून बचाव करते आणि याचा मानवी जीवनावरही अत्याधिक दुष्परिणाम होतो.
  5. ओझोन हा वातावरणात मुख्यत: दोन थरांमध्ये  आढळतो. जमिनीपासून 10-16 किमीपर्यंतचा वातावरणाचा थर  म्हणजे तपांबर (troposphere) आणि त्यावरील 50 किमीचा थर हा स्थितांबर (stratosphere) म्हणून ओळखला जातो. ओझोनचे प्रमाण विषुववृत्तीय प्रदेशावर कमी तर ध्रुवीय प्रदेशांवर सर्वाधिक असते.
  6. ओझोन हा हरितगृह वायू (greenhouse gas) असल्यामुळे तो तपांबराचे व पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढविण्यासही कारणीभूत होऊ शकतो.
  7. स्थितांबरातील (stratosphere) ओझोन सूर्यकिरणांतील अतिनील (ultraviolet or UV) किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून थोपवतो. अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होणे, गुणसूत्रांचे उत्परिवर्तन होणे यासारखे दुष्परिणाम दिसून येतात. शिवाय पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. पार्श्वभूमी:-
  1. ओझोन छिद्राचा सर्वात पहिला शोध 1985 साली लावण्यात आला. दक्षिण गोलार्धात सप्टेंबरपासून डिसेंबर या काळात हिवाळी मौसमानंतर सूर्यकिरणांच्या वापसीने जो उत्प्रेरक प्रभाव पडतो, त्याने अंटार्कटिक क्षेत्रात ओझोन छिद्र तयार होते.
  2. 2000 साली ओझोन छिद्र 115 लाख चौ. मैल (29.86 दशलक्ष चौ. किलोमीटर) इतका सर्वाधिक वाढलेला होता.
 2. ओझोनच्या संरक्षणार्थ आंतरराष्ट्रीय प्रयत्न:-
  1. ओझोन थर कमी करण्यास प्रामुख्याने क्लोरोफ्लुरोकार्बन (CFC) आणि इतर काही रसायने कारणीभूत ठरतात.
  2. यामुळे ओझोन थराच्या संरक्षणासाठी 16 सप्टेंबर 1987 रोजी कॅनडातील मॉन्ट्रियल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षर्‍या केल्या.
  3. हा करार ओझोनच्या थरास हानीकारक ठरणार्‍या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा होता.
  4. मॉन्ट्रियल करारामधून CFC च्या उत्पादनावर बंदी आणणे, त्यांना पर्यायी रसायने शोधणे वगैरे उपाययोजना आखली गेली.
  5. या करारातील अटी 1989 सालापासून लागू झाल्या. भारताने 1992 सालापासून मॉन्ट्रियल करारातील उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली.


There are huge stars in the nearby galaxy - a search

 1. आपल्या आकाशगंगेचाच भाग असलेल्या 170,000 प्रकाशवर्ष दूर ‘लार्ज मॅगेलॅनिक क्लाउड’ नामक एका लहान उप-आकाशगंगामध्ये 30 दोराडस (किंवा टॅरेंट्यूला नेबुला किंवा NGC 2070) नामक क्षेत्र आहे .
 2. 30 दोराडस हे HII क्षेत्राचे एक उदाहरण आहे.
 3. जे की आंशिक आयोनाइज्ड हायड्रोजनचे एक मोठे ढग आहे ज्यामध्ये नवीन तारे जन्माला येतात.
 4. ‘VLT-FLAMES टॅरेंट्यूला’ सर्वेक्षणाचा भाग म्हणून, ऑक्सफर्ड विद्यापीठातील डॉ. फबिअन श्नेडर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 30 दोराडस या क्षेत्रात जवळजवळ 1,000 तार्‍यांचे निरीक्षण करण्यासाठी ESO च्या व्हेरी लार्ज टेलिस्कोपचा वापर केला.
शोधतील महत्त्वाचे मुद्दे
 1. या क्षेत्राचा सखोल अभ्यास करण्यामधून असे दिसून आले की, या क्षेत्रात तार्‍यांची निर्मिती लाखो वर्षांपूर्वी सुरू झालेली आहे, जरी ते एका विशिष्ट क्षेत्रात मर्यादित नव्हती. त्यामुळे या क्षेत्रात अपेक्षेपेक्षा प्रचंड आकाराचे अनेक तारे निर्माण झालेले असावेत.
 2. आतापर्यंत, 200 सौर वस्तुमान असलेले तारे अस्तित्व असल्याचे विधान अतिशय विवादास्पद होते आणि या अभ्यासातून असे दिसून आले आहे की 200-300 सौर वस्तुमान असलेले अधिकाधिक तारे साधारणपणे आहेत.


Defense Innovation Center will be established in Coimbatore-Defense Minister Nirmala Sitharaman

 1. संरक्षण मंत्रालयाने तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये ‘संरक्षण अभिनव केंद्र (Defence Innovation Centre)’ उभारण्याची घोषणा केली आहे.
 2. हे केंद्र कोडिस्सीया ट्रेड फेयर कॉम्प्लेक्स येथे स्थापित केले जाणार आहे.
 3. केंद्राची स्थापना झाल्यानंतर, कोडिस्सीया MSME ला संरक्षण क्षेत्राच्या आवश्यकता आणि मागणीसाठी दुवा बनू शकते. 
 4. योजनेनुसार संरक्षण विनिर्माण क्षेत्रात लघुउद्योगांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
 5. या आस्थापनेसाठी प्रारंभीक निधीच्या रूपात कोडिस्सीयाला 20 कोटी रुपये प्रदान केले जाणार आहे.
 6. या सहकार्यात लघु आणि मध्यम प्रकल्पांसोबतच स्टार्टअपची ओळख केली जाणार आहे.


Pravasi Bhartiya Divas - 9th January

 1. प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो त्याचे कारण असे की, ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये परतले होते.
 2. म्हणुन २००३ सालापासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे.
 3. आयोजन :-
  1. भारत सरकारचे अनिवासी भारतीय कार्य मंत्रालय (Ministry of Overseas Indian Affairs) व उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्रालय (Ministry for Development of North Eastern Region), फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ह्यांच्या मार्फत केले जाते.
  2. १ला प्रवासी भारतीय दिवस - नवी दिल्ली. (२००३).
  3. मागील वर्षाचा म्हणजेच १५वा प्रवासी भारतीय दिवस - बंगळुर (२०१७) येथे पार पडला होता.
  4. यावर्षीचा प्रवासी भारतीय दिवस सिंगापुर येथे पार पडणार आहे.
  5. सिंगापूरमध्ये दोन दिवसीय ‘ASEAN-भारत प्रवासी भारतीय दिवस’ आयोजित करण्यात आलेला आहे.    
  6. शिवाय २५ - २६ जानेवारीला ASEAN - भारत भागीदारीचे २५ वे वर्ष आहे. 
  7. हे वर्ष चिन्हांकित करण्यासाठी ‘अँसीयंट रूट, न्यू जर्नी: डायस्पोरा इन द डायनॅमिक ASEAN-इंडिया पार्टनरशिप’ या विषयाखाली एका शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
  8. शेजारी राष्ट्रांसह व्यावसायिक आणि राजकीय संबंधांना अधिक व्यापक करण्यासाठी आणि परदेशासंबंधी धोरणांना आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने भारत योजनेचे क्रियान्वयन करणार आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (ASSOCIATION OF SOUTHEAST ASIAN NATIONS -ASEAN)
 2. स्थापना :-  ८ ऑगस्ट  १९६७.
 3. सदस्य असलेले देश :-

 

ब्रुनेई दरुसालेम कंबोडिया
म्यानमार लाओ PDR
मलेशिया
इंडोनेशिया
फिलीपीन्स
व्हिएतनाम
सिंगापूर
थायलंड

                  या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे.

 1. निर्मिती :- 
 2. मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांनी 8 ऑगस्ट 1967 रोजी केली.
 3. ASEAN हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत निरीक्षक आहे.


Entirely inscribed Matunga station in Limca Book of Records

 1. शतप्रतिशत महिलाराज असणाऱ्या मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.
 2. पूर्णपणे महिला कर्मचारी असणारं हे देशातलं पहिलं रेल्वे स्थानक आहे.
 3. या स्थानकावर प्रवाशांना तिकीट देण्यापासून ते प्रवाशांची सुरक्षा वाहण्यापर्यंतचे प्रत्येक काम महिला कर्मचारी करत आहेत.
 4. दररोज ३० ते ३५ हजार प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. गेल्यावर्षी जुलै महिन्याच्या आसपास महिला कर्मचाऱ्यांच्या हाती कारभार सोपवण्यात आला होता.
 5. सर्व कामाकरिता महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून महिला सक्षमीकरणाचा नवा पायंडा घातल्याबद्दल देशभरातून मध्य रेल्वेचं कौतुक करण्यात आलं होतं.
 6. या स्थानकात ३४ महिला अधिकारी-कर्मचारी काम पाहत आहेत. यात महिला स्टेशन मास्तरसह ११ तिकीट आरक्षण कर्मचारी, ७ तिकीट तपासनीस, २ मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, २ उद्घोषणा करणाऱ्या महिला कर्मचारी आणि अन्य कामांसाठी ५ ‘पॉइंट्समन’ यांचा समावेश आहे. तर प्रवाशी व महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ५ महिला अधिकारी-कर्मचारी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने तैनात करण्यात आल्या आहेत.
 7. माटुंगा परिसरात जास्त महाविद्यालये असल्यामुळे येथे प्रवासी विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
 8. या महिला दिवसपाळीतच नाही तर रात्रपाळीतदेखील काम करतात.


'Lagaan' fame actor Shrivallabh Vyas passed away

 1. अभिनेते श्रीवल्लभ व्यास यांचे रविवारी सकाळी जयपूर येथे निधन झाले.
 2. ते ६० वर्षांचे होते. जवळपास ६० पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारलेल्या व्यास यांना काही वर्षांपूर्वी एका भोजपुरी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच अर्धांगवायूचा झटका आला होता.
 3. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा व्यास आणि दोन मुली असे कुटुंब आहे. २००८ नंतर व्यास रुपेरी पडद्यापासून दूर होत गेले.
 4. व्यास यांच्या कुटुंबियांना चित्रपटसृष्टीतून आमिर खान, इमरान खान आणि मनोज वाजपेयी वगळता इतर कोणीही कठीण प्रसंगी मदतीचा हात पुढे केला नाही, अशी खंत त्यांची पत्नी शोभा व्यास यांनी व्यक्त केली.
 5. दर महिन्याला आमिर हा व्यास यांच्या कुटुंबियांना ३० हजार रुपयांची आर्थिक मदत करत होता.
 6. त्याशिवाय त्यांच्या मुलींच्या शाळेचा आणि व्यास यांच्या वैद्यकीय उपचारांसाठीचा सर्व खर्चसुद्धा आमिरच पाहात होता.
 7. ‘लगान’मध्ये व्यास यांनी साकारलेली भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
 8. त्याशिवाय ‘सरफरोश’, ‘अभय’, ‘आन- मेन अॅट वर्क’, ‘शूल’, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस- द फॉरगॉटन हिरो’ आणि ‘संकेत सिटी’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. याशिवाय रंगभूमीवरही ते बऱ्यापैकी सक्रिय होते.


Dilip Asbe appointed as NPCI CEO

 1. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय या राष्ट्रीय स्तरावरील अदायगीचे (पेमेंट्स) संचालन करणाऱ्या मध्यवर्ती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दिलिप आसबे यांची नियुक्ती झाली आहे.
 2. ही नियुक्ती तत्काळ अंमलात आली आहे.
 3. २००९पासून एनपीसीआय रिटेल पेमेंट्स प्रणाली देशात राबवत आहे.
 4. आसबे यांनी या संस्थेत विविध पदांवर काम केले असून यूपीआयसारख्या प्रणालीचा प्रसार करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
 5. देशातील किरकोळ देयक यंत्रणांसाठी केंद्रीय पायाभूत सुविधा म्हणून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना 2009 साली करण्यात आली.
 6. देशातील देयकांच्या सुविधेसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही संकल्पना अमलात आणली.
 7. एनपीसीआयतर्फे देण्यात येणाऱ्या सेवा:- 
  1. इंटर बँक एटीएमचे व्यवहार बदलून एकच सेवा करणे,
  2. धनादेश वाटणे,
  3. आधार अनेबल पेमेंट सिस्टम,
  4. रुपे कार्ड,
  5. युनिफाईड पेमेंट इंटरफेस


Top

Whoops, looks like something went wrong.