Former Defense Minister Manohar Parrikar passes away

 1. देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ह्यांचे दिनांक 17 मार्च 2019 रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
 2. ते 63 वर्षांचे होते.
 3. तीन वेळा गोव्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळण्याचा बहुमान त्यांनी मिळवला.
 4. 2000-05, 2012-14 आणि 14 मार्च 2017 पासून निधनापर्यंत ते मुख्यमंत्री होते.
 5. शिवाय 2014-2017 या काळात देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी पर्रिकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती.


Special cadres will be created in Army for permanent appointment of women

 1. सशस्त्र दलांमध्ये महिला कर्मचार्‍यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यासाठी लष्करात एक विशेष संवर्ग स्थापित करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहेत.
 2. प्रस्तावानुसार पात्र महिलांची कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) माध्यमातून भारतीय लष्कराच्या दहा शाखांमध्ये नेमणूक केली जाणार.
 3. त्या नियुक्तीचा कार्यकाळ 14 वर्षांचा असेल.
 4. भारतीय लष्कराच्या दहा शाखा - जज अॅडव्होकेट जनरल (JAG); आर्मी एज्युकेशन कॉर्प्स; सिग्नल्स; इंजीनियर्स; आर्मी एव्हिएशन; आर्मी एयर डिफेन्स; इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजीनियर्स; आर्मी सर्व्हिस कॉर्प्स; आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स; आणि इंटेलिजेंस
 5. आतापर्यंत भारतीय हवाई दलात पायलट सहित सर्व शाखा महिलांसाठी खुल्या  करण्यात आल्या आहेत.
 6. तर भारतीय नौदलात जमिनीवरील सर्व कार्यांच्या संदर्भात असलेल्या शाखांमध्ये कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) माध्यमातून महिला कर्मचार्‍यांना समाविष्ट केले जात आहे.
 7. कर्मचारी निवड आयोग (SSC):-
  1. ही संस्था कार्मिक व प्रशिक्षण विभागाशी (DoPT) संलग्न असलेली एक संस्था आहे.
  2. ही भारत सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागातल्या जागांवर नियुक्त्या करते.
  3. संस्थेची स्थापना दि. 4 नोव्हेंबर 1975 रोजी भारत सरकारने ‘गौण निवड आयोग (Subordinate Service Commission)’ या नावाने केली आणि 1977 साली त्याला वर्तमान नाव प्राप्त झाले.


M. R. Kumar: New Director of Life Insurance Corporation of India

 1. एम. आर. कुमार ह्यांची भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) याच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
 2. या व्यतिरिक्त विपिन आनंद आणि टी. सी. सुशील कुमार ह्यांना व्यवस्थापकीय संचालक (MD) पदी नियुक्त केले गेले.
 3. भारतीय जीवन विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India -LIC) हा एक भारतीय सरकारी विमा गट आहे.
 4. या संस्थेची स्थापना दिनांक 1 सप्टेंबर 1956 रोजी झाली आणि मुंबईत त्याचे मुख्यालय आहे.
 5. ही भारतातली सर्वात मोठी विमा कंपनी आहे.


GIG tag for Coorg Arabica coffee and four other coffee varieties was received

 1. कूर्ग अरेबिका कॉफी तसेच वायनाद रोबस्टा कॉफी, चिकमगालूर अरेबिका कॉफी, अराकू व्हॅली अरेबिका कॉफी आणि बाबाबुदंगीरीस अरेबिका कॉफी अश्या पाच कृषी उत्पादनांना भौगोलिक खूण (GI) टॅग प्राप्त झाले आहे.
 2. कूर्ग अरेबिका कॉफीचे पीक विशेषकरून कर्नाटक राज्याच्या कोडागू जिल्ह्यात घेतले जाते.
 3. वायनाद रोबस्टा कॉफीचे पीक पश्चिम घाटाच्या वायनाद प्रदेशात घेतले जाते.
 4. चिकमगालूर अरेबिका कॉफी आणि बाबाबुदंगीरीस अरेबिका कॉफीचे पीक कर्नाटकाच्या चिकमगालूर जिल्ह्यात घेतले जाते.
 5. अराकू व्हॅली अरेबिका कॉफीचे पीक प्रामुख्याने आंध्रप्रदेशाच्या विशाखापट्टनम जिल्ह्यात आणि ओडिशाच्या कोरापूट जिल्ह्यात घेतले जाते.
 6. भौगोलिक खूण (GI):-
  1. भौगोलिक खूण (Geographical Indication) हे उत्पादनांवर छापले जाणारे चिन्ह आहे.
  2. या चिन्हामुळे उत्पादनाला विशेष भौगोलिक ओळख मिळते आणि त्याची मूळ गुणवत्ता दर्शवते (उदा. दार्जीलिंगची चायपत्ती, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी).
  3. भारताच्या बौद्धिक संपदा अधिकार जाहिरात व व्यवस्थापन विभाग (Cell for IPR Promotion and Management -CIPAM) कडून भारतीय उत्पादनांना GI टॅग प्रदान केला जातो.


Italy became a partner in China's 'Belt and Road' initiative

 1. इटली चीनच्या ‘बेल्ट अँड रोड पुढाकार’ (BRI) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग बनला आणि त्यासंबंधी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
 2. प्रस्तावित करारानुसार युरोपच्या मध्यात वसलेले इटली हे या आंतरराष्ट्रीय मार्गिकेचे प्रमुख गंतव्यस्थान असेल.
 3. याचबरोबर, इटली बेल्ट अँड रोड पुढाकाराचा भाग बनणारा जी-7 समुहाचा पहिला देश आहे.
 4. प्रकल्पाविषयी:-
  1. चीनने 2013 साली ‘बेल्ट अँड रोड पुढाकार (BRI)’ हा त्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तुत केला.
  2. या प्रकल्पामधून दक्षिण-पूर्व आशिया, मध्य आशिया, आखाती प्रदेश, आफ्रिका आणि युरोप यांना जमिनी आणि समुद्री मार्गांच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याने जोडण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
  3. या पुढाकाराच्या अंतर्गत चीनने आतापर्यंत 80 हून अधिक देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी करार केलेला आहे.


Bianca Adrskuna wins 'Indian Wells Masters' Tennis Tournament

 1. बियांका अँड्रीस्कू या कॅनेडाची टेनिसपटूने ‘इंडियन वेल्स मास्टर्स 2019’ या स्पर्धेच्या महिला एकल गटाचे जेतेपद जिंकले आहे.
 2. बियांकाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या एंजेलिका कार्बर हिचा पराभव करून हा किताब जिंकला.
 3. स्पर्धेचे अन्य विजेते –
  1. पुरुष एकल – डोमिनिक थीम (ऑस्ट्रिया)
  2. पुरुष दुहेरी - निकोला मेक्टीक (क्रोएशिया) आणि हॉरॅसिओ झेबॅलोस (अर्जेंटिना)
  3. महिला दुहेरी - एलिस मर्टन्स (बेल्जियम) आणि अरीना साबलेंका (बेलारूस)
 4. इंडियन वेल्स मास्टर्स (किंवा बी.एन.पी. परिबास ओपन व WTA इंडियन वेल्स ओपन) ही इंडियन वेल्स (कॅलिफोर्निया, अमेरिका) मधील इंडियन वेल्स टेनिस गार्डन येथे आयो जित केली जाणारी वार्षिक टेनिस स्पर्धा आहे.
 5. स्पर्धेची स्थापना सन 1974 मध्ये करण्यात आली.


Top

Whoops, looks like something went wrong.