fastest supercomputer develop by china

 1. चीनने नव्या पिढीतील महासंगणकाचे प्रारूप तयार केले असून त्याच्या मदतीने सेकंदाला क्विंटिलियन गणने करता येतात.
 2. संगणनाच्या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यात वापरण्यात आले असून ‘सनवे एक्सास्केल कॉम्प्युटर‘ असे त्याचे नाव आहे. हा संगणक 5 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आला.
 3. नॅशनल रीसर्च सेंटर ऑफ पॅरलल कॉम्प्युटर इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, दी नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग सेंटर (जिनान), नॅशनल लॅबोरेटरी फॉर मरीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थांनी संयुक्तपणे या महासंगणकाची निर्मिती केली आहे.
 4. या संगणकाचे हे प्राथमिक रूप असून त्यात सेकंदाला क्विंटिलियन म्हणजे (1 वर अठरा शून्य-अब्ज अब्ज) गणने करता येतात.
 5. सनवे एक्सास्केल संगणकाचे प्राथमिक रूप हे संकल्पनेतील मोटार रस्त्यावर चालवण्यासारखे आहे, असे नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग सेंटरचे संचालक यांग मेइहाँग यांनी सांगितले. 2020च्या उत्तरार्धातील सर्वात प्रगत संगणक तयार करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
 6. सनवे ताइभूलाइट हा लागोपाठ दोन वर्षे 2016 व 2017 मध्ये जगातील वेगवान महासंगणक ठरला आहे.
 7. महासंगणकांमुळे हवामान अंदाज, महासागरी प्रवाह, आर्थिक माहिती, उत्पादन प्रक्रिया यातील चित्र बदलत असून त्यात प्रगती होत आहे, असे नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग सेंटरचे पॅन जिंगशान यांनी सांगितले.
 8. अमेरिका व जपान ही एक्सास्केल महासंगणक तयार करण्याच्या स्पर्धेत असून 2021 मध्ये त्यांचा नवीन महासंगणक तयार होईल.
 9. भारताने ‘प्रत्युश’ हा महासंगणक पुण्याच्या आयआयटीएम या हवामान प्रयोगशाळेत बसवला असून त्याचा वेग सेकंदाला 6.8 पेंटाफ्लॉप म्हणजे 1 हजार दशलक्ष-दशलक्ष गणने इतका आहे.


ramon laguarta

 1. पेप्सिको कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इंदिरा नूयी 12 वर्षांनंतर आपल्या पदावरून पायउतारझाल्या आहेत. कंपनीकडून ही घोषणा करण्यात आली आहे.
 2. 62 वर्षीय इंदिरा नूयी यांच्या जागी रेमन लॅगार्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पेप्सी कंपनीचे सहावे सीईओ असतील.
 3. पेप्सिको कंपनीच्या त्या पहिल्या महिला सीईओ होत्या. येत्या 3 ऑक्टोबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. गेल्या 24 वर्षांपासून त्या पेप्सी कंपनीशी निगडीत आहेत.
 4. पेप्सिको कंपनीत काम करणे ही माझ्यासाठी आयुष्यातील अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. मला अभिमान आहे की, गेल्या 12 वर्षांत आम्ही फक्त भागधारकच नव्हे तर सर्वांसाठी चांगली कामगिरी केली असल्याचे इंदिरा नूयी यांनी म्हटले आहे.
 5. रेमन लॅगार्ट हे मागील 22 वर्षांपासून पेप्सिको कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी कार्पोरेट स्ट्रॅटजी, पब्लिक पॉलिसी आदींमध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे. त्याचबरोबर त्यांनी कंपनीच्या यूरोप-आफ्रिका विभागाचे सीईओपदही सांभाळले आहे.


america has given STA -1 Respect to india

 1. अमेरिकेने भारताचा समावेश 'स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथरॉयझेशन-1' (एसटीए) यादीत केला असून, त्यामुळे अमेरिकेतील उच्च तंत्रज्ञान आयात करण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याची माहिती भारताचे अमेरिकेतील दूत नवतेज सिंह सरना यांनी दिली.
 2. अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांनी 30 जुलै रोजी याबाबतची घोषणा केली.
 3. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना सरना म्हणाले, 'अमेरिकेचा हा निर्णय केवळ भारताप्रती वाढत असलेल्या विश्वासाचे प्रतीक नसून, आर्थिक व संरक्षण क्षेत्रांतील एक भागीदार या नात्याने भारताच्या क्षमतेला दिलेली एकप्रकारची मान्यताच आहे.
 4. या निर्णयामुळे उभय देशातील द्विपक्षी, तसेच संरक्षण संबंध आणखी मजबूत होतील.'
 5. अमेरिकेच्या निर्यात नियंत्रण व्यवस्थेत भारताचे स्थान पाहता करण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण बदल असून, भारतासोबतचे आर्थिक व संरक्षण संबंध आमच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळेच भारताला हा दर्जा देण्यात आल्याचे विल्बर रॉस स्पष्ट केले.
 6. दरम्यान, अमेरिकेने 2016 मध्ये भारताला एक प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून मान्यता दिली होती.
 7. जगभरातील 35 देशांना अमेरिकेचा 'एसटीए-1' दर्जा प्राप्त असून, आता भारतही त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
 8. हा दर्जा प्राप्त करणारा भारत हा दक्षिण आशियातील एकमेव देश असून, आशियातील जपान, दक्षिण कोरिया या देशांचाही या यादीत समावेश आहे.
 9. नाटोचे सदस्य असलेल्या बहुतांशी देशांनाही यात स्थान देण्यात आले आहे.


motor bike ambulance service started in palghar

 

 1. पालघर जिल्ह्यातील दुर्गम पाड्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा मिळावी. कुपोषित बालके, गरोदर मातांना वैद्यकीय उपचार वेळेत मिळण्यासाठी गुरुवार 2 ऑगस्टपासून या भागात मोटर बाईक ॲम्ब्युलन्स सुरु करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले.
 2. पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्यासह पालघर जिल्ह्यातील खासगी व्यवसाय करणारे स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते.
 3. वर्षभरापूर्वी मुंबई येथे 10 मोटर बाईक ॲम्ब्युलन्सचा शुभारंभ करण्यात करण्यात आला. त्या माध्यमातून हजारो नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली. त्यानंतर या सेवेला मिळालेले यश पाहता महाराष्ट्रात नव्याने 30 बाईक ॲम्ब्युलन्स सुरु करण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतला होता.
 4. त्यामध्ये मुंबईत मे महिन्यात नवीन 10 बाईक ॲम्ब्युलन्स सुरु करण्यात आल्या. मेळघाट आणि पालघर येथे प्रत्येकी पाच बाईक ॲम्ब्युलन्स सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पालघर येथे 2 ऑगस्टपासून बाईक ॲम्ब्युलन्सची सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन मोबाईल मेडिकल युनिटदेखील सुरु केले जातील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
 5. एरवी बाईक ॲम्ब्युलन्ससाठी 108 क्रमांक फिरवावा लागतो. मात्र पालघर जिल्ह्यात या ॲम्बुलन्सना ठराविक पाड्यांना भेट देण्याबाबतचे वेळापत्रक करुन देण्यात येणार असून त्यामुळे ज्या भागात चारचाकी वाहन पोहोचू शकत नाही अशा दुर्गम पाड्यांवर या बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. विशेष करुन गरोदर माता व कुपोषित बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी या सेवेचा वापर करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
 6. आज मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये आरोग्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये मातामृत्यू रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
 7. शासकीय यंत्रणेने खासगी व्यवसाय करणाऱ्या स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची मदत घ्यावी. ज्या शासकीय रुग्णालयात, उपकेंद्रात स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसेल अशा वेळेस खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून उपचाराची सुविधा निर्माण करावी.
 8. गरोदर मातांमध्ये ॲनिमियाचे मोठे प्रमाण आढळून येत असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी गोळ्यांसोबत इंजेक्शन देण्याच्या पर्यायावर विचार करावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
 9. दुर्गम भागातील शासकीय रुग्णालयातून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला अन्य खासगी रुग्णालयात हलविण्यासाठी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा वापर करु देण्यासाठी पालघर जिल्ह्यात विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात येईल.त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याची शिफारस ग्राह्य मानली जाईल, असेही त्यांनी सांगितले.


anuradha podwal honored at UK parliament

 1. गायिका अनुराधा पौडवाल यांना नुकतंच ब्रिटनच्या संसद सभागृहात इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने त्यांच्या संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल गौरविण्यात आले आहे.
 2. या सोहळ्यास ब्रिटिश ऑल पार्टीचे संसद सदस्य, राजकारणी, एशियन रेडिओ तसेच यूकेमधील भारतीय संगीत क्षेत्रातील अग्रगण्य प्रतिनिधी उपस्थित होते.
 3. अनुराधा यांनी आजवर अनेक भारतीय भाषांमधील १५००हून अधिक गाणी गायली आहेत. या पुरस्काराबद्दल त्या सांगतात की, ‘८०० वर्षांचा इतिहास लाभलेल्या ब्रिटिश संसदेत पुरस्कार प्राप्त होणे ही माझ्यासाठी खूपच आनंददायी बाब असून आजवरच्या श्रोत्यांच्या वाढत्या प्रेमामुळेच हे सर्वकाही शक्य होऊ शकले आहे.
 4. आपण केलेले कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असून त्याची इतक्या मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जात असल्याची जाणीव हा पुरस्कार स्वीकारताना होत आहे.’
 5. शहीदांच्या कुटुंबांसाठी आणि गरीबांसाठी केलेल्या मदतीच्या कार्याबद्दल त्या म्हणतात की, ‘हे केवळ मी समाजाचे काही देणे लागते म्हणून मनापासून केलेले कार्य आहे. त्याबद्दल जास्त काही मी बोलू इच्छित नाही.
 6. समाजाप्रती आपली जबाबदारी असून सामाजिक कार्याद्वारे त्याची परतफेड करणे आपले कर्तव्य आहे असे मी मानते.’


Top