Exports to $ 331 billion in India's trade

 1. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील निर्यातीबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. भारताने निर्यात व्यापारात दमदार कामगिरी केल्याचे समोर आले आहे. सरत्या आर्थिक वर्षात निर्यातीत ९ टक्के वाढ वाढ झाली असून ३३१ अब्ज डॉलरपर्यंत व्यापार पोहचला आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये नोंदवण्यात आलेल्या निर्यातीचा विक्रम यंदा मोडीत निघाला आहे.

 2. आर्थिक मंदीच्या वातावरणात २०१८-१९ या वर्षात ३३१ अब्ज डॉलर व्यापाराची नोंद करण्यात आली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. मार्च महिन्यात निर्यात व्यापारात ११ टक्के वाढ झाली. ऑक्टोबर २०१८ नंतर एका महिन्यात सर्वाधिक मोठी वाढ मार्चमध्ये नोंदवण्यात आली. ऑक्टोबरमध्ये १७.८६ टक्के वाढ नोंदवण्यात आली. फार्मा, केमिकल, अभियांत्रिकी क्षेत्रातील वाढीमुळे एकूण निर्यात व्यापारात वाढ झाली आहे.


Successful test of the cruise missile from the country

 1. ओदिशाच्या किनारपट्टीवर भारताने 15 एप्रिल रोज स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय‘ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. सबसोनिक निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची ही सहावी चाचणी होती.

 2. 2013 साली पहिल्यांदा निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. निर्भय क्षेपणास्त्राच्या सुरुवातीच्या काही चाचण्या अपयशी ठरल्या होत्या.

 3. मिसाइलच्या फ्लाइट कंट्रोल सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये काही समस्या होत्या. त्यामध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) निर्भय क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. या क्षेपणास्त्राचा टप्पा 1 हजार किलोमीटरचा आहे.

 4. अमेरिकन नौदलाकडे असलेल्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्राच्या धर्तीवर निर्भयची निर्मिती करण्यात आली आहे. निर्भयच्या यशस्वी चाचणीमुळे शत्रूच्या लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची भारताची क्षमता वाढणार आहे.


Senior Literary Dr. G.M.M. Pawar dies

 1. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.गो.मा. पवार यांचे आज 16 एप्रिल रोजी निधन झाले. सोलापुरात वैद्यकीय उपचार सुरु असतांना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 88 वर्षाचे होते.

 2. मराठी समीक्षेमध्ये विनोदाची सैद्धांतिक मिमांसा करणारे गो.मा. पवार हे पहिले समीक्षक ठरले असून पवार हे साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक होते. त्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

 3. डॉ. पवार यांना काही दिवसांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले होते. गो.मा. पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्यलेखन केले आहे. पवार हे मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक होते.

 4. डॉ. पवार यांना साहित्य अकादमी पुरस्कार (नवी दिल्ली), भैरूरतन दमाणी पुरस्कार (सोलापूर), शिवगिरीजा प्रतिष्ठान पुरस्कार (कुर्डुवाडी), रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार (वाई), पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार (प्रवरा नगर), महाराष्ट्र फाऊंडेशन मराठी साहित्य पुरस्कार (मुंबई), महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार, धोंडीराम माने साहित्य रत्न पुरस्कार, (औरंगाबाद), शरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार (सोलापूर), मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, (औरंगाबाद) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.


This year, Master Dinanath Mangeshkar Award is announced

 1. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे संगीत, नाटय़, कला आणि सामाजिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारे मास्टर दीनानाथ पुरस्कार जाहीर करण्यात आले.

 2. प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांना या वर्षीचा संगीत आणि कला क्षेत्रातील मास्टर दीनानाथ पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात येणार असून मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव प्रसिद्ध लेखक सलीम खानयांना प्रदान करण्यात येणार आहे.

 3. प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून दरवर्षी दिले जाणारे हे पुरस्कार या वर्षी 24 एप्रिल रोजी मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात प्रदान करण्यात येतील.

 4. ‘सीआरपीएफ’चे महासंचालक विजयकुमार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या वर्षीच्या विजेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील.

 5. भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे.


Day special:

 1. 16 एप्रिल हा दिवस ‘जागतिक ध्वनी दिन‘ आहे.

 2. सन 1853 मध्ये भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.

 3. विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार ‘चार्ली चॅपलीन‘ यांचा जन्म 16 एप्रिल 1889 मध्ये झाला होता.

 4. सन 1922 मध्ये मुळशी सत्याग्रह सुरू झाला.

 5. राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना सन 1948 मध्ये झाली.


China's first 'Marine Lizard' drone

 1. समुद्र आणि जमिनीवर काम करू शकणारे जगातील पहिली ‘अॅम्फिबिअस ड्रोन बोट’ चीनने तयार केली आहे. ‘मरिन लिझार्ड’ असे नाव चीनने या ड्रोनला दिले असून, त्याचे नियंत्रण थेट उपग्रहांद्वारे होणार आहे.

 2. जमिनीवरील हल्ले; तसेच हवाई ड्रोन आणि जहाजांवरील ड्रोनचा वापर करून लढाऊ त्रिकुट तयार करण्याची याची क्षमता आहे

 3. ‘चीन जहाजबांधणी उद्योग निगम’ अंतर्गत वुचांग जहाजबांधणी उद्योग समूहाने या ड्रोन बोटची निर्मिती केली आहे. या ड्रोनने सर्व चाचण्या यशस्वीपणे पार केल्या आहेत. ‘मरिन लिझार्ड’ असे नाव याला दिले आहे.

 4. ड्रोनशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले, की या ड्रोनचा कार्यक्षमतेचा पल्ला १२०० किलोमीटर असून याचे नियंत्रण उपग्रहांद्वारे केले जाणार आहे.

 5. ‘मरिन लिझार्ड’ बोटीच्या आकाराचे असून लांबी १२ मीटर आहे. डिझेलवर चालणाऱ्या हायड्रोजेटवर ड्रोन चालत असून समुद्रामध्ये जास्तीत जास्त ५० नॉट वेग हा ड्रोन गाठू शकतो.


Top