
1966 18-Dec-2017, Mon
- अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी विमानामधील ‘ब्लॅक बॉक्स’ रेकॉर्डरच्या संकल्पनेवर आधारित अभिनव असे एक रिकॉर्डर विकसित केले आहे.
- जे रोबोटिक सर्जिकल प्रणालीच्या मदतीने प्रोस्टेट (पौरुष ग्रंथी) च्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेदरम्यान शल्य चिकित्सकांचे नैपुण्य मापू शकण्यास सक्षम आहे.
- ‘डीवीलॉगर (dVLogger)’ नामक हे रिकॉर्डर आहे, जे चलचित्र (व्हिडिओ) आणि कार्यासंबंधी माहिती यांचे संकलन करते.
- GEARS (इवॅल्यूएशन अॅसेसमेंट ऑफ रोबोटिक स्किल्स) या पद्धतीचा वापर करून माहितीचे संकलन केले जाते.
- या रिकॉर्डरला ‘इन्ट्युटिव सर्जिकल’ कंपनीने विकसित केले आहे.
- हे उपकरण कंपनीच्या ‘दा विंची सर्जिकल सिस्टम’ सोबत जोडले जाऊ शकते.
- ‘दा विंची सर्जिकल सिस्टम’ हे एक रोबोटिक सर्जिकल प्लॅटफॉर्म आहे.
- ज्याला सामान्य लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेच्या FDA ने परवानगी दिलेली आहे.