
1381 08-Jan-2019, Tue
- भारताची संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) 106 व्या ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC)’ या कार्यक्रमात 'एक्झीबिटर ऑफ द ईयर' पुरस्काराचा विजेता ठरला आहे.
- जालंधर (पंजाब) येथे दि. 3 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत 'फ्यूचर इंडिया: सायन्स अँड टेक्नॉलॉजी' या संकल्पनेखाली ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC) 2019’ या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
- DRDO ने 'कलाम्स व्हिजन: डेयर टू ड्रीम' या विषयावर माहिती प्रदान केली. प्रदर्शनीमध्ये DRDOने त्यांनी विकसित केलेल्या विविध उपकरणांचे प्रदर्शन मांडले होते.
- भारतीय विज्ञान परिषद मंडळ (ISCA):-
- भारतीय विज्ञान परिषद मंडळ (ISCA) ही कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे मुख्यालय असलेली भारतातली एक प्रमुख वैज्ञानिक संघटना आहे.
- याची 1914 साली स्थापना करण्यात आली आणि ते दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटतात.
- यामध्ये 30,000 हून अधिक वैज्ञानिक सदस्य म्हणून आहेत.
- 15-17 जानेवारी 1914 या काळात ISCA ची पहिली बैठक एशियाटिक सोसायटी (कलकत्ता) येथील परिसरात झाली.
- ISCA च्या नेतृत्वात आयोजित भारतीय विज्ञान परिषद (Indian Science Congress -ISC) हा विज्ञान क्षेत्रातला जगातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे.