Day special:

 1. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन’ आहे.

 2. मराठी ग्रंथकार डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1897 रोजी झाला होता.

 3. भारताचे 10वे उपराष्ट्रपती ‘कृष्णकांत‘ यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1927 मध्ये झाला होता.

 4. सन 1928 मध्ये डॉ. सी.व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आलेयामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

 5. वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध सन 1935 मध्ये लावला होता.


Day special:

 1. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमान यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी झाला.

 2. विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर यांचा जन्म 10 एप्रिल 1843 मध्ये झाला.

 3. बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म 10 एप्रिल 1894 मध्ये झाला होता.

 4. अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. धनंजय रामचंद्र तथा द.रा. गाडगीळ यांचा जन्म 10 एप्रिल 1901 रोजी झाला.

 5. इंग्लंडमधील साऊथम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने 1912 यावर्षी पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरुवात केली होती.

 6. सन 1955 मध्ये योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.


Day special:

 1. 11 एप्रिल हा ‘दिवस जागतिक पार्किन्सन दिन’ आहे.

 2. कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म 11 एप्रिल 1755 रोजी झाला.

 3. श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत ज्योतीराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला.

 4. कस्तुरबा गांधी यांचा जन्म 11 एप्रिल 1869 मध्ये झाला होता.

 5. सन 1919 मध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.

 6. सन 1999 मध्ये अग्नी-2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.


Day special:

 1. गुरु गोविंद सिंग यांनी सन 1699 मध्ये खालसा हे गुरु पंथ तयार केले.

 2. भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म 13 एप्रिल 1895 मध्ये झालाहोता.

 3. सन 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाला, यात 379 लोक ठार तर 1200 जखमी झाले होते.

 4. व्ही. शांताराम प्रभात हे सन 1942 मध्ये फिल्म कंपनीतून बाहेर पडले.


Day special:

 1. 15 एप्रिल हा दिवस ‘जागतिक कला दिन‘ तसेच ‘जागतिक सांस्कृतिक दिन‘ म्हणून साजरा केला जातो.

 2. शीख धर्माचे संस्थापक, पहिले गुरु ‘गुरु नानक देव‘ यांचा जन्म 15 एप्रिल 1469 रोजी झाला होता.

 3. सन 1892 मध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.

 4. आर.एम.एस. टायटॅनिक हे जहाज 1912 यासाली उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले होते.

 5. 15 एप्रिल 2013 हा दिवस संत साहित्याचे अभ्यासक ‘वि.रा. करंदीकर’ यांचा स्मृतीदिन आहे.


Day special:

 1. 16 एप्रिल हा दिवस ‘जागतिक ध्वनी दिन‘ आहे.

 2. सन 1853 मध्ये भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.

 3. विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार ‘चार्ली चॅपलीन‘ यांचा जन्म 16 एप्रिल 1889 मध्ये झाला होता.

 4. सन 1922 मध्ये मुळशी सत्याग्रह सुरू झाला.

 5. राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना सन 1948 मध्ये झाली.


Day special:

 1. 17 एप्रिल हा दिवस ‘जागतिक हिमोफिलिया दिन‘ म्हणून पाळला जातो.

 2. हिंदी कवी तसेच थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य ‘संत सूरदास’ यांचा जन्म 17 एप्रिल 1478 मध्ये झाला.

 3. बेसबॉल चे जनक ‘अलेक्झांडर कार्टराईट’ यांचा जन्म 17 एप्रिल 1820 रोजी झाला होता.

 4. बॅ. मुकुंदराव जयकर सन 1950 मध्ये पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले होते.

 5. सन 1952 मध्ये पहिली लोकसभा अस्तित्वात आली.

 6. सन 1971 द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.


Day special:

 1. ख्यातनाम क्रिकेट पंच ‘डिकी बर्ड’ यांचा जन्म 19 एप्रिल 1933 मध्ये झाला होता.

 2. सन 1948 मध्ये ब्रह्मदेशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश झाला.

 3. गीतरामायणातील शेवटचे गाणे सन 1956 मध्ये पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झाले होते.

 4. भारतीय प्रख्यात उद्योगपती ‘मुकेश अंबानी’ यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला.

 5. सन 1975 मध्ये आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.


Day special:

 1. प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी 1770 यासाली ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.

 2. नाझी हुकूमशहा तसेच दुसर्‍या महायुद्धाचा प्रारंभ करणारे अॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म 20 एप्रिल 1889 रोजी झाला.

 3. सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा.ह.भ.प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा 20 एप्रिल 1896 रोजी माहीम, ठाणे येथे जन्म झाला होता.

 4. सन 1946 मध्ये राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.

 5. आंध्रप्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म 20 एप्रिल 1950 मध्ये झाला.


LADY SINGHAM PRIYA SINH

 1. लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह यांची राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा (एनआयए) दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे. चार वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर त्यांची नेमणूक नवी दिल्लीतील एनआयएमध्ये करण्यात आली आहे.

 2. ज्योती प्रिया सिंह यांनी डेप्यूटेशनवर बदलीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांची या अर्जावरून दिल्लीत एनआयएमध्ये 4 वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. 2008 बॅचच्या आयपीएस अधिकारी ज्योती प्रिया सिंह यांची लेडी सिंघम म्हणून ओळख आहे.

 3. तसेच त्यांनी कोल्हापूरमध्ये अतिरिक्त पोलीस अधिक्षक असताना छेडछाडप्रकरणी आलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करत एका राजकिय नेत्याविरोधात छेडछाडप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. एका दिवसात त्यांनी 40 रोडरोमीयोंना हिसका दाखवला होता.

 4. पुण्यात सध्या त्या सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला प्रकरणाच्या तपास त्यांच्याकडे आहे. तसेच बीटकॉईन फसवणूक प्रकरणाच्या एसआयटीच्या त्या प्रमुख आहेत.


Manu Bhakar-Saurabh Chaudhary Gold Medal: ISSF Championship

 1. नवी दिल्लीत सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषकात भारतीय नेमबाज पुन्हा एकदा फॉर्मात परतले आहेत.

 2. 10 मी. एअर पिस्तुल (मिश्र) प्रकारात भारताच्या मनू भाकेर आणि सौरभ चौधरी जोडीने सुवर्णपदकाची कमाई केलीआहे.

 3. अंतिम फेरीत भारतीय जोडीने चीन आणि जपानच्या खेळाडूंची झुंज मोडीत काढली. विश्वचषकाला सुरुवात झाल्यांनंतर अपुर्वी चंदेला आणि सौरभ चौधरी यांनी पहिल्या दोन दिवसांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती.

 4. मात्र त्यानंतर भारतीय नेमबाजांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. अखेरीस मिश्र प्रकारात आणखी एका पदकाची कमाई करत भारताच्या खेळाडूंनी दमदार पुनरागमन केले आहे. दोघांनीही अंतिम फेरीत 483.4 गुणांची कमाई केली.


A major decision of the Central Government in the defense sector

 1. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर घडामोडींना वेग मिळाला असून केंद्र सरकारने 2700 कोटींच्या शस्त्र खरेदीला तातडीने मंजूरी दिली आहे.

 2. नवी दिल्लीत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान संरक्षण साहित्य खरेदीला मंजूरी देण्यात आली. दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत 2700 कोटी किंमतीचे संरक्षण साहित्य खरेदी करण्यास तातडीने मंजूरी देण्यात आली.

 3. भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आता पाकिस्तानच्या विमानाने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे.

 4. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केली. यानंतर विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 5. लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर विमानतळं हाय अलर्टवर असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी विमानांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.


Mukesh Ambani is the top 10 billionaire list

 1. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. चीनमधील हरून रिसर्चने संपत्तीविषयक जाहीर केलेल्या अहवालानुसार, जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांचा समावेश झाला आहे. ते या यादीत 10 व्या क्रमांकावर आहेत.

 2. तर, अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे प्रथम क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडे 54 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. विशेष म्हणजे टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी हे संपूर्ण आशिया खंडातून एकमेव व्यक्ती आहेत. त्यांच्या संपत्ती 9 अब्ज डॉलर म्हणजेच 20 टक्क्यांनी वधारली आहे

 3. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारभांडवल 7 लाख 74 हजार 870.23 कोटी आहे. गेल्या महिन्यात कंपनीच्या बाजारभांडवलाने 8 लाख कोटींचा टप्पा पार केला होता. कंपनीत मुकेश यांचा 52 टक्क्यांचा हिस्सा आहे.

 4. देशांतर्गत श्रीमंत व्यक्तींचा विचार करता, हिंदुजा ग्रुपचे एस पी हिंदुजा (21 अब्ज डॉलर), विप्रोचे अझीम प्रेमजी (17 अब्ज डॉलर), सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला (13 अब्ज डॉलर) हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.


Top