
2272 16-Feb-2018, Fri
- दिल्लीमध्ये 15 फेब्रुवारी 2018 रोजी भारतातला पहिला ‘रेडियो महोत्सव’ साजरा करण्यात आला.
- UNESCO च्या सहकार्याने हा महोत्सव ‘इंटरनॅशनल ऑफ विमेन इन रेडियो अँड टेलिव्हिजन’ तर्फे आयोजित केला गेला.
- याप्रसंगी थेट कलाप्रदर्शन, प्रदर्शनी आणि चर्चासत्रे अश्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.
- इंटरनॅशनल ऑफ विमेन इन रेडियो अँड टेलिव्हिजन (IAWRT) ही प्रसारण उद्योगातील महिलांची एक संघटना आहे.
- 1949 साली IAWRT ची स्थापना करण्यात आली.
- याचे अँस्टरडॅममध्ये मुख्यालय आहे.
- ही इलेक्ट्रॉनिक आणि संबंधित प्रसार माध्यमांच्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यावसायिक महिलांची संघटना आहे.
- IAWRT ला संयुक्त राष्ट्रसंघ वित्तीय व सामाजिक परिषद (ECOSOC) सह सल्लागार दर्जा प्राप्त आहे.