
1201 14-Jan-2019, Mon
- माजी IAS अधिकारी ब्रह्म दत्त यांची यस बँकेच्या (Yes Bank) अंशकालिक गैर-कार्यकारी अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे.
- ही नियुक्ती दि. 4 जुलै 2020 पर्यंत प्रभावी करण्यात आली आहे.
- भारतातली चौथ्या क्रमांकाची खासगी क्षेत्रातली बँक असलेल्या यस बँकेला भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून ‘बँकिंग नियमन अधिनियम-1949’ अन्वये परवानगी प्राप्त झाली आहे.
- ब्रह्म दत्त जुलै 2013 पासून स्वतंत्र संचालक म्हणून यस बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत.
- शिवाय ते ‘नामनिर्देशन आणि वेतन समिती’चे अध्यक्षही आहेत. त्यांनी आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत कर्नाटक सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक जबाबदार्या सांभाळलेल्या आहेत.
- त्यांनी पूर्वी मंत्रिमंडळ सचिवालयात तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्य पाहिले होते.