bhagat singh koshari new governor of maharashtra

 1. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.
 2. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला. त्यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्यपालपदी कोण येणार याविषयी चर्चा सुरू झाली होती.
 3. यात माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची राज्यपालपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात होते. पण, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगर सिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 4. भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला आहे. उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. तसेच उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.
 5. 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार केला होता. तसेच 2002 पासून 2007 पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
 6. 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते. भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. 1977 मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे.
 7. महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगाणाच्या राज्यपालपदाच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कलराज मिश्रा यांना राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहेत.
 8. बंडारू दत्तात्रय हे हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल आहेत. आरीफ मोहम्मद खान यांची केरळच्या, तर तमिलीसाई सौंदराजन यांची तेलंगणाच्या राज्यपालदी नियुक्ती करण्यात आली आहे.


Includes' Statue of Unity 'in the Times' World Greatest Places 2019 list

 1.  गुजरातमधल्या 597 फूट उंची असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याला टाइम्स मॅगझीनने प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेसेस 2019’ या यादीत स्थान दिले गेले आहे. त्याव्यतिरिक्त मुंबईचे ‘सोहो हाऊस’ या इमारतीनेही या यादीत स्थान मिळवले.
 2. सन 2019 मध्ये सर्वाधिक भेट दिलेल्या जगातली प्रथम पाच ठिकाणे -
  • 1. जियोसी जियोथर्मल सी बाथ्स (हुसविक, आइसलँड )
  • 2. कॅम्प अ‍ॅडव्हेंचर (रॉनेडे, डेन्मार्क)
  • 3. मोरी बिल्डिंग डिजिटल आर्ट म्युझियम (टोकियो, जपान)
  • 4. स्टार वॉर्स: गॅलेक्सीज एज अॅट डिस्नेलँड (अॅनाहिम, कॅलिफोर्निया)
  • 5. SFER IK (तुलूम, मेक्सिको )
 3. गुजरात राज्यात केवडिया येथे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 182 मीटर उंच आहे.
 4. हा नर्मदा नदीच्या किनारी जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. त्याचे अनावरण गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. ही शिल्पाकृती विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी साकारले. विक्रमी 33 महिन्यांमध्ये याचे बांधकाम केले गेले.
 5. मुंबईचे सोहो हाऊस हे 11 मजली इमारतीत असून ते अरबी समुद्राकाठी आहे. येथे 34 बैठकांचे सिनेमागृह, एक लायब्ररी आणि एक रूफटॉप बार आणि पूल आहे.


Top