
1589 20-Sep-2018, Thu
- बांगलादेश सरकारने भारताला मोठी भेट दिली आहे. बांगलादेशच्या मंत्रिमंडळाने चितगांव आणि मोंगला ही बंदरे भारतासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
- मंत्रिमंडळ सचिव मोहम्मद शफिउल यांनी या निर्णयाबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
- प्रस्तावित मसुद्यानुसार यासंबंधीचा करार 5 वर्षांसाठी असून त्यानंतर त्याचा कालावधी वाढविला जाऊ शकतो.
- हा करार संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशांपैकी एकाला 6 महिन्यांची नोटीस द्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- या करारामुळे भारत आता बांगलादेशातील बंदराचा वापर करून देशाच्या ईशान्येतील राज्यांना अत्यंत कमी कालावधीत मालपुरवठा करू शकणार आहे.
- ही सुविधा प्राप्त करण्यासाठी भारताला जनरल ऍग्रिमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड (गॅट) च्या जागतिक नियमांचे पालन करावे लागेल.
- त्याचबरोबर माल वाहतुकीसाठी बांगलादेशातील कायद्यांचे पालन करावे लागणार असल्याचे शफिउल यांनी यावेळी सांगितले.
- हा करार झाल्यावर बांगलादेशचे कर अधिकारी भारतीय कपंन्यांकडून शुल्क तसेच करारासाठी रोखे स्वीकारू शकतील. तर शुल्क आणि वाहतुकीच्या रकमेसाठी गॅट नियमांचे पालन करावे लागणार आहे.
- जहाजांच्या प्रवासासाठी 4 मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत.
- चितगांव/मोंगला बंदर-अखौरामार्गे अगरतळा,
- चितगांव/मोंगला बंदर-तमाबिल मार्गे दौकी,
- चितगांव/मोंगला बंदर-श्योलामार्गे सुतरकंडी
- चितगांव/मोंगला बंदर-सिमंतपूरमार्गे विवेकबाजार असे चार मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत.
- या मार्गांमुळे ईशान्येच्या राज्यांना मदत होईल.