Award for India's 'Aadhaar', 'Umang' App at World Government Conference

 1. दुबई (UAE) मध्ये 13 फेब्रुवारीला ‘जागतिक सरकार परिषद 2018’ च्या समारोपीय कार्यक्रमात भारतातल्या ‘आधार’ आणि ‘उमंग’ अॅपला पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
 2. ‘आधार’ हा सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख तंत्रज्ञान पुरस्काराचा मानकरी ठरला तर ‘उमंग’ अॅपने अॅक्सेसीबल गवर्नमेंट श्रेणीत सर्वोत्कृष्ट मोबाइल-शासकीय सेवा पुरस्कार जिंकला.
 3. भारताच्या प्रत्येक नागरिकाला एक बहुउद्देशीय राष्ट्रीय ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या एका महत्वाकांक्षी योजनेमधून ‘भारतीय विशिष्‍ट ओळख प्राधिकरण’ (Unique Identification Authority of India -UIDAI) ची 2009 साली स्थापना करण्यात आली.
 4. या संस्थेकडून ‘आधार’ नामक बनविण्यात आलेले ओळखपत्र दिले जाते. त्यामध्ये संबंधित व्यक्तीला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो, जो आधार क्रमांक म्हणून ओळखला जातो.
 5. आधार क्रमांक ही 12 अंकी एक विशिष्ट संख्या आहे, जी त्या व्यक्तीसाठी एक कायम ओळख असणार आहे.


Cauvery water dispute: Supreme court reduced Tamil Nadu's share

 1. कावेरी पाणीवाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने कावेरी नदीतून तामिळनाडूला मिळणाऱ्या पाण्यात कपात केली आहे. तर दुसरीकडे कर्नाटकचा वाटा वाढवण्यात आला आहे.
 2. नदीतील पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, त्यामुळे नद्यांवर राज्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने हा निर्णय दिला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम आता केंद्र सरकारकडे सोपवण्यात आले आहे.
 3. भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेत खंडपीठाने हा निर्णय दिला.
 4. न्यायालयाचा निर्णय:-
  1. कर्नाटकच्या वाट्याचे पाणी 14.75 TMC ने वाढविण्यात आले आहे. बंगळुरुमधील निवासी भागातील पाण्याची मागणी व उद्योगधंद्यांमुळे ही वाढ करण्यात आली आहे.
  2. तामिळनाडूच्या वाट्याचे पाणी 14.75 TMC ने कमी करण्यात आले आहे.
  3. पुद्देचेरी (30 TMC) आणि केरळ (7 TMC) यांच्या वाट्यातील पाणी लवादाच्या निर्णयाप्रमाणेच ठरविण्यात आले आहे.
  4. तमिळनाडूमधील 20 TMC भूजलाला या प्रकरणासाठी विचारात घेतलेले नव्हते आणि त्यामुळे परिस्थितीची पाहणी करणे आवश्यक होते, असे स्पष्ट केले.
  5. हा निर्णय 15 वर्षांसाठी लागू आहे.
 5. कावेरी पाणीवाटप वाद काय आहे?
  1. कर्नाटकातील तळकावेरीत उगम पावणारी कावेरी नदी 322 किलोमीटर प्रवास करून तमिळनाडूत प्रवेश करते. तमिळनाडूत 483 किलोमीटर अंतर प्रवास करून बंगालच्या उपसागरास मिळते. कावेरी नदी कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांसाठी पाण्याची पूर्तता करण्यासाठी एक प्रमुख स्त्रोत आहे.
  2. पाणीवाटप लवादाच्या 2007 मधील निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
  3. या लवादाने तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पुद्दुचेरी यांच्या वाट्याचे पाणी ठरवून दिले. मात्र कर्नाटकने पाणी सोडण्यास नकार दिल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.
  4.  गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर न्यायालयाने 16 फेब्रुवारीला या प्रलंबित वादावर निर्णय दिला आहे.


The Victorian Glass House will open again in London's rare plants museum

 1. लंडनमधील ऐतिहासिक व विशालकाय 'व्हिक्टोरियन ग्लास हाऊस' पुन्हा एकदा पर्यटकांसाठी उघडण्यात येणार आहे.
 2. यावेळी हे संग्रहालय भौगोलिक प्रदेशात विभागलेले असणार, ज्यात आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, हिमालय आणि आशिया येथील वनस्पतींना ठेवले जाणार आहे.
 3. व्हिक्टोरियन ग्लास हाऊस:-
  1. लोखंड आणि काच यापासून या इमारतीचा सांगाडा तयार करण्यात आला आहे. या संरचनेचे बांधकाम ब्रिटिश वास्तुकार डेसिमस बर्टन यांनी सन 1860 मध्ये केले होते आणि हे संग्रहालय सन 1863 मध्ये नागरिकांसाठी उघडण्यात आले होते.
  2. लंडनमधील केव गार्डन्स येथील 'व्हिक्टोरियन ग्लास हाऊस' हे जगभरातील दुर्मिळ वनस्पतींचे एक मोठे संग्रहालय आहे. या घरात तीन जंबो जेट विमान उभे राहू शकतात, एवढे मोठे ते आहे.
  3. सन 2013 मध्ये दुरुस्तीसाठी म्हणून 'व्हिक्टोरियन ग्लास हाऊस'ला बंद करण्यापूर्वी तेथे जगभरात आढळणार्‍या दुर्मिळ अश्या जवळजवळ 1,000 वनस्पती प्रजाती होत्या. आता त्यात सुमारे 1500 दुर्मिळ वनस्पती आहेत.
  4. विशेष म्हणजे येथे दक्षिण आफ्रिकेमध्ये पूर्वी आढळणारी ‘एन्सेफलर्टोस वूडी’ नामक वनस्पती आहे, जे ताड वृक्षासमान दिसते आणि त्याचे पान चमड्याप्रमाणे असून रंग हिरवा आहे.
  5. या वनस्पतीचा केवळ एकच प्रकार वनांमध्ये आढळून आला होता. मात्र गेल्या खूप काळापासून ही वनस्पती आपल्या निसर्गातून लुप्त पावलेली आहे.


Inauguration of 'Global Sustainable Development Council' at the hands of PM

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 फेब्रुवारी 2018 रोजी नवी दिल्लीत ‘जागतिक शाश्वत विकास परिषद 2018’ (WSDS 2018) चे उद्घाटन करण्यात आले.
 2. यावर्षी ‘पार्टनरशिप फॉर ए रेझीलिएंट प्लॅनेट’ या विषयाखाली परिषद भरविण्यात आली आहे. परिषदेचा समारोप 17 फेब्रुवारीला होणार आहे..
 3. जागतिक शाश्वत विकास परिषद (WSDS) हा ‘द एनर्जी अँड रि‍सोर्सेस इंस्‍टीट्यूट (TERI)’ चा प्रमुख मंच आहे.
 4. जो शाश्वत विकास, ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्राशी जोडलेल्या वैश्विक नेता आणि विचारवतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो.
 5. द एनर्जी अँड रि‍सोर्सेस इंस्‍टीट्यूट (TERI) ही नवी दिल्लीतील एक विना-नफा संशोधन संस्था आहे, जी ऊर्जा, पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात संशोधन कार्य चालवते.
 6. सन 1974 मध्ये याची स्थापना ‘टाटा एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ म्हणून करण्यात आली होती.


$ 100 million loan agreement with India's NDB for Rajasthan Water Project

 1. राजस्थानमधील जल प्रकल्पांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी भारताने नवीन विकास बँक (NDB) सोबत $100 दशलक्षचा ऋण करार केला.
 2. हा निधी राजस्थानमधील 678 किलोमीटर लांबीच्या इंदिरा गांधी कालवा (सन 1958-63 दरम्यान उभारलेले) प्रणालीच्या पुनरुज्जीविकरणासाठी उपयोगात आणला जाणार आहे.
 3. शिवाय संलग्न सिंचन प्रकल्पांसाठी देखील वापरला जाईल.
 4. हा करार म्हणजे भारत सरकार आणि NDB मध्ये वाळवंटी प्रदेशातल्या राजस्थान जल क्षेत्र पुनर्निर्माण प्रकल्पासाठी झालेल्या $345 दशलक्षच्या ऋण कराराचा पहिला हप्ता आहे.
 5. नवीन विकास बँक (New Development Bank  -NDB) (पूर्वीची BRICS विकास बँक) ही BRICS राष्ट्रांद्वारे (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) स्थापन करण्यात आलेली बहुपक्षीय बँक आहे. 15 जुलै 2014 रोजी NDB ची स्थापना करण्यात आली.
 6. या बँकेचे पहिले आणि सध्या कार्यरत अध्यक्ष भारताचे के. व्ही. कामत हे आहेत. बँकेचे मुख्यालय शांघाय (चीन) येथे आहे.
 7. NDB उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी पुरविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आले आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.