Approval to continue till mid-2020 under ACROSS scheme

 1. आर्थिक कल्याणासंबंधी मंत्रिमंडळ समितीने ‘वातावरण व हवामान संशोधन पद्धती निरीक्षण प्रणाली आणि सेवा’ (Atmosphere & Climate Research-Modelling Observing Systems & Services -ACROSS) या एकछत्री योजनेच्या 9 उप-योजना सन 2017 ते सन 2020 या कालावधीत चालविण्यासाठी मंजुरी दिली आहे.
 2. योजनेसाठी 1450 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
 3. भूविज्ञान मंत्रालय, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), राष्ट्रीय उष्णकटिबंधी हवामानशास्त्र संस्था (IITM), नॅशनल सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर फोरकास्टिंग (NCMRWF) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्विस (INCOIS) या संस्थांच्या माध्यमातून या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
 4. ACROSS योजना ही भूविज्ञान मंत्रालयाच्या वातावरणविषयक शास्त्र कार्यक्रमाशी संबंधित असून, ही योजना चक्रीवादळ, वादळ, उष्माघात, गडगडाटासह मुसळधार पाऊस आदींसाठी धोक्याचा इशारा यासह वातावरण आणि हवामान सेवांच्या विविध दृष्टीकोणांना समजून घेण्यासाठी आहे.
 5. या योजनेमुळे हवामान, तापमान आणि महासागर यासंबंधी सुधारित अंदाज आणि सेवा उपलब्ध होतील.
 6. त्यातून सार्वजनिक हवामान सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कृषी-हवामान सेवा, हवाई सेवा, पर्यावरण देखरेख सेवा, पर्यटन, तीर्थयात्रा, वीज निर्मिती, जल व्यवस्थापन, क्रिडा आदी सेवांना लाभ होईल.


The draft diplomatic declaration from the UK and the European Union after the brexit is valid

 1. ब्रिटन आणि युरोपीय संघाने ब्रिटन संघामधून बाहेर पडल्यानंतर दोघांमधील व्यापार आणि आर्थिक संबंध कश्याप्रकारे असणार यांची स्पष्टता देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या घोषणापत्राचा मसुदा मान्य केला आहे.
 2. ब्रेक्जिट’ प्रक्रियेमधून ग्रेटब्रिटन (UK) यूरोपीय संघातून (EU) बाहेर पडणार आहे.
 3. युरोपिय संघ हा 28 सदस्य राज्यांचा राजकीय आणि आर्थिक संघ आहे, जे प्रामुख्याने युरोप खंडात आहेत.
 4. युरोपिय संघाची स्थापना 1 नोव्हेंबर 1993 रोजी झाली आणि याचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आहे.
 5. लिस्बन करारामधील कलम 50 लागू करीत ब्रिटन 29 मार्च2019 पर्यंत EU च्या आर्थिक विभागातून बाहेर पडणार आहे.
 6. ब्रिटन (ग्रेट ब्रिटन/यूनाइटेड किंगडम/यूके/बर्तानिया) हा युरोप खंडाच्या वायव्येकडे असलेला एक संयुक्त बेटराष्ट्र आहे.
 7. ज्यामध्ये स्कॉटलँड, वेल्स आणि इंग्लंड तसेच उत्‍तर आयरलँड या प्रदेशांचा समावेश आहे.
 8. लंडन हे राजधानी शहर आहे आणि पाउण्ड स्टर्लिंग (GBP) हे अधिकृत चलन आहे.


India: Winner of 'Asia Environmental Implementation Award-2018'

 1. आशिया खंडात सीमेलगत पर्यावरण-विषयक गुन्ह्यांविरुद्ध लढा देण्यामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी भारत सरकारच्या वन्यजीवन गुन्हे नियंत्रण विभाग (WCCB) याला संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) कडून ‘आशिया पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार-2018’ (Asia Environment Enforcement Award) याने सन्मानित करण्यात आले आहे.
 2. वन्यजीवन गुन्हे नियंत्रण विभाग (WCCB) हे भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.
 3. विभागाला हा पुरस्कार ‘नवकल्पना’ गटात मिळाला आहे.
 4. विभागाने गुन्हेगारीचा कल ओळखण्यासाठी आणि गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि प्रभावी उपाययोजना शोधण्यासाठी वास्तविक वेळेत माहिती मिळविण्यासाठी ऑनलाइन ‘वन्यजीवन गुन्हे माहिती व्यवस्थापन प्रणाली’ विकसित केली आहे.
 5. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) हा दिनांक 5 जून 1972 रोजी स्थापना करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाचा एक विभाग आहे.
 6. जे पर्यावरणविषयक धोरणे आणि पद्धती यांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करते.
 7. याचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.


The Maharashtra government has approved the bill to change the law of adulteration

 1. महाराष्ट्र राज्य सरकारने भेसळ रोखण्यासाठीच्या कायद्याला अधिक कडक करीत त्यात बदल करण्यासाठी नवे विधेयक संमत करण्यात आले आहे.
 2. हे विधेयक भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्या व्यक्ती, आस्थापना यांच्याविरोधात ‘भारतीय दंड संहिता-1860’च्या कलम 272 व 273 मध्ये सुधारणा करणारे आहे.
 3. दूध किंवा अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळसंबंधी सर्व गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र ठरविण्यात आले आहेत.
 4. अशा गुन्ह्यांमध्ये दोषीला आजन्म कारावासाची शिक्षा देण्याची कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे.
 5. दुधात युरिया, ग्लुकोज, चरबी, कॉस्टिक सोडा तसेच गोडेतेलापासून पाण्यापर्यंत तऱ्हे-तऱ्हेची भेसळ होत असल्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.


BKSP team of Bangladesh: Winner of the 'Subroto Cup 2018' international football tournament

 1. नवी दिल्लीत खेळल्या गेलेल्या कनिष्ठ मुलांच्या 59व्या ‘सुब्रतो चषक’ या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना बांग्लादेशाच्या बांग्लादेश क्रिडा शिक्षा प्रतिष्ठान (BKSP) या संघाने जिंकलेला आहे.
 2. BKSP संघाने अंतिम सामन्यात अफगाणिस्तानाच्या अमिनी स्कूल या संघाचा पराभव करून सुब्रतो चषक आपल्या नावे करून घेतला आहे.
 3. या क्रिडास्पर्धेत एकूण 95 संघांचा सहभाग होता.
 4. अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळ या तीन देशांमधून 8 संघांनी या खेळात भाग घेतला होता.
 5. स्पर्धेचे पुरस्कार विजेते -
  1. सर्वोत्कृष्ट गोलरक्षक - प्रणब लिंबू (सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळा, सिक्किम)
  2. सर्वोत्कृष्ट खेळाडू - मोहम्मद नेमिल (रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, मुंबई)
  3. फेयर प्ले ट्रॉफी - रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, मुंबई


Top

Whoops, looks like something went wrong.