Approval of integrated e-filing and centralized processing center 2.0 project

 1. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्राप्तीकर विभागाच्या 4241.97 कोटी रुपये खर्चाच्या ‘एकात्मिक ई-फायलिंग आणि केंद्रीकृत प्रक्रिया केंद्र 2.0’ (Integrated E-filing and Centralized Processing Centre) प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
 2. याव्यतिरिक्त, सध्या सुरू असलेल्या ‘CPC ITR 1.0’ या प्रकल्पाच्या 2018-19 वर्षासाठी 1482.44 कोटी रुपये एवढ्या निधीला मंजुरी दिली.
 3. करदात्यांसाठी जलद आणि अचूक निष्कर्ष, प्रथमताःच योग्य दृष्टीकोन, सर्वोत्तम सरावपद्धती, करदात्यांमध्ये जागरुकता आणि शिक्षण, ऐच्छिक कर पालनाला प्रोत्साहन, प्रलंबित मागण्यांचे व्यवस्थापन अश्या विविध मुद्द्यांवर हा प्रकल्प केंद्रीत आहे.
 4. या मंजुरीमुळे परताव्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यास तसेच कराशी संबंधित प्रलंबित समस्या सोडवण्यास मदत मिळणार. करदात्यांच्या मदतीसाठी एकात्मिक संपर्क केंद्र, डिजिटल प्रसारमाध्यमातून करदाता संपर्क कार्यक्रम आणि असे अनेक लाभ मिळतील.
 5. या प्रकल्पातून जलद प्राप्तीकर विषयक जलद रिफंडची प्रक्रिया आणि जागतिक पातळीवरील सर्वोत्तम पद्धती आणि मानकांचे पालन, विविध टप्प्यांची ताजी माहिती मोबाईल ॲप, ईमेल, SMS आणि संकेतस्थळाद्वारे देणे शक्य होईल.


US President nominates three resident citizens for Indian main posts

 1. व्हाईट हाऊसने संसदेच्या सिनेट या सर्वोच्च नियामक मंत्रिमंडळाकडे पाठविलेल्या ज्येष्ठ उमेदवारांच्या नव्या यादीनुसार, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मुख्य प्रशासकीय पदांसाठी भारतीय वंशाच्या तीन निवासी नागरिकांचे नामांकन दिले गेले आहे.
 2. त्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत -
 3. असिस्टेंट सेक्रेटरी ऑफ एनर्जी (न्यूक्लियर एनर्जी) पदासाठी - रीटा बरनवाल
 4. प्रायव्हसी अँड सिव्हिल लिबर्टिज ओव्हरसाइट बोर्डचे सदस्य - आदित्य बमझई
 5. असिस्टेंट सेक्रेटरी ऑफ ट्रेझरी - बिमल पटेल
 6. संयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) हा उत्तर अमेरिकेतला एक देश आहे.
 7. वॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि अमेरिकन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.


PCRA annually launches 'Enabled 2019' program

 1. भारत सरकारच्या केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीत पेट्रोलियम संरक्षण संशोधन संघाच्या (PCRA) नेतृत्वात वार्षिक ‘सक्षम 2019’ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
 2. संपूर्ण महिनाभर चालणार्‍या लोक-केंद्रित मोहिमेच्या अंतर्गत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू कंपन्यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
 3. त्यात 200 शहरांमध्ये 'सक्षम' सायकल डे, सायकलॉथन, लघुपट निर्मिती स्पर्धा, चालकांसाठी कार्यशाळा, स्वयंपाकाच्या इंधन बचतीसंदर्भात उपाय, प्रसार माध्यमांमार्फत जागरूकता अश्या उपक्रमांचा सहभाग आहे.
 4. सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) हा एक वार्षिक कार्यक्रम आहे.
 5. राज्य सरकार आणि अन्य भागधारकांसह सार्वजनिक क्षेत्रातील तेल व वायू कंपन्यांच्या सक्रीय सहभागातून सर्वसामान्यांमध्ये इंधनाच्या बचतीबाबत  तसेच पेट्रोलियम पदार्थांचे जतन या संदर्भात जागरुकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
 6. संघटनेविषयी:-
  1. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघ (Petroleum Conservation Research Association -PCRA) ही 1978 साली स्थापन करण्यात आलेली भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारित असलेली एक संस्था आहे.
  2. जी अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात ऊर्जा/इंधन विषयक कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यामध्ये गुंतलेली आहे.
  3. ही संस्था सरकारला तेल आणि त्यावर भारताच्या अवलंबित्वाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने धोरणे आणि धोरणांचा प्रस्ताव मांडण्यास मदत करते, तेल वापरण्याच्या पर्यावरणीय प्रभावाला कमी करण्यासाठी कार्य करते आणि जीवाश्म इंधनाचे संरक्षण देखील करते.


Announcement of Gandhi Peace Prizes for 2015, 2016, 2017 and 2018

 1. भारत सरकारकडून सन 2015, सन 2016, सन 2017 आणि सन 2018 साठी ‘गांधी शांती पारितोषिक’ विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
 2. सन 2015 - विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी
 3. सन 2016 - सुलभ इंटरनॅशनल आणि अक्षयपात्र फाऊंडेशन
 4. सन 2017 - ईकालअभियान ट्रस्ट (EkalAbhiyan Trust)
 5. सन 2018 – योहेई सासाकावा (भारत तसेच जगभरात कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी दिलेल्या योगदानासाठी)
 6. पुरस्काराविषयी
  1. 1995 साली महात्मा गांधी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त दरवर्षी ‘गांधी शांती पारितोषिक’ देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला.
  2. 1 कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि एक पारंपारिक हस्तकला/हातमाग वस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  3. ग्रामीण विकास, मानवतावाद, स्वच्छता, शिक्षण आणि कुष्ठरोगाचे निर्मूलन अश्या क्षेत्रात कार्यरत संस्था किंवा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.


Top