anjoli ila menon awarded national kalidas award

 1. आपल्या चित्रांमधून स्त्रियांची विविध रूपे व त्यांचे भाव टिपणाऱ्या प्रसिध्द महिला चित्रकार अंजोली इला मेनन यांना मध्यप्रदेश सरकारने राष्ट्रीय कालिदास सन्मान प्रदान केला आहे.
 2. दृश्य कलेत स्त्रीजीवनाची विविध रूपे मांडण्याच्या मेनन यांच्या कर्तृत्वाचा खास उल्लेख पुरस्कार समितीने केला आहे.
 3. भारतातील अतिशय संवेदनशील व सिद्धहस्त कलाकारांपैकी त्या एक असून, विविध साधनांनी मेनन यांनी स्त्री प्रतिमा रेखाटल्या. मॅसोनाइटवर तैलरंगाने चित्रे रंगविणे, ही त्यांची खास पद्धत.
 4. १९५८मध्ये त्यांचे चित्र प्रदर्शन दिल्लीत झाले होते तेव्हापासून आतापर्यंत त्यांची कलाकीर्द अव्याहत सुरू आहे.
 5. जलरंगांतही त्यांनी काम केले आहे. इटलीच्या मुरानो बेटावर जाऊन त्यांनी काच-कलाकृती घडवल्या.
 6. मुंबई विमानतळाच्या सर्वात मोठय़ा भित्तिशिल्पासह, अनेक भित्तिशिल्पे (म्यूरल) त्यांनी घडविली आहेत. त्यांना २०००मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
 7. दिल्लीतील मेनोनजायटिस-थ्री जनरेशन्स ऑफ आर्ट (२००८), गॉड्स अँड अदर्स (२०००), यात्रा (२००६) ही त्यांची चित्र प्रदर्शने गाजली. पॅरिस, अल्जियर्स, साओ पावलो येथील महाप्रदर्शनांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
 8. १९४०साली बंगालमध्ये (आताचा पश्चिम बंगाल) त्यांचा जन्म झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी जे. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्ट्स या मुंबईतील उपयोजित कलासंस्थेचा रस्ता पकडला.
 9. नंतर दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी साहित्यात पदवी घेतली. नंतर फ्रेंच शिष्यवृत्तीवर त्यांना पॅरिसमधील इकोल द ब्यू आर्ट्स या संस्थेत कला शिकण्याची संधी मिळाली.


adharcard will be expire if 3 years we are not use

 1. सलग ३ वर्षे आधारकार्डचा वापर न केल्यास ते निष्क्रिय करण्याचा निर्णय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय)ने घेतला.
 2. त्यामुळे पॅनकार्ड आणि बँक खात्याला आधार जोडणी करणे बंधनकारक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
 3. तसेच आधार आणि पॅनकार्ड यांच्यावरील नाव, जन्मदिनांक, जन्मवर्ष आणि छायाचित्र या माहितीमध्ये तफावत आढळल्यास त्यांची जोडणी करता येणार नसल्याचेही यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.
 4. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी जोडणी करण्यासाठी दिलेली मुदत पुन्हा वाढविली होती.
 5. आतापर्यंत आधार आणि पॅन क्रमांक जोडणीसाठी ५ वेळा मुदतवाढ देण्यात आली असून, हीच मुदत आता ३१ मार्च २०१९पर्यंत वाढवण्यात आली आहे.
 6. याशिवाय बँक खाते, मोबाईल सीमकार्ड, एलपीजी गॅस सिलींडर अनुदान आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे.
 7. परंतु, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
 8. ज्या नागरिकांचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडला आहे, त्यांना आधारशी संबंधित कोणत्याही माहितीमधील बदल प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर जाऊन करता येणार आहे.


SEBI ANNOUNCED EXECUTIVE OFFICER COMPULSORY IN ALL BANK

सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) २९१ कंपन्यांना त्यांच्या संचालक मंडळावर १ एप्रिल २०२०पासून अकार्यकारी अध्यक्षाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

या २९१ कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस आणि भारती एअरटेल या कंपन्यांचा समावेश आहे.

 1. सेबीच्या नव्या नियमानुसार हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी कंपन्यांना अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या दोन्ही जबाबदाऱ्यांचे विभाजन करावे लागणार आहे.
 2. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि भारती एअरटेलचे सुनील भारती मित्तल हे सध्या आपआपल्या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या दोन्हीही पदांवर आहेत.
 3. पण २०२०मध्ये या दोघांसह टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, ओएनजीसी, कोल इंडिया, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो आणि एचसीएल टेक्नोलॉजी या कंपन्यांना दोन पदांचे विभाजन करावे लागणार आहे.
 4. सेबीने नियुक्त केलेल्या कोटक समितीने केलेल्या शिफारसीनुसार हा नवीन नियम तयार करण्यात आला आहे.
 5. याशिवाय कंपन्यांच्या संचालक मंडळांवर स्वतंत्र महिला संचालकाची नियुक्त करण्याचा सेबीचा नियम आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सेबीने १ एप्रिल २०१९ची मुदत दिली आहे.


Mohammad anas has won gold medal

 

 1. भारताचा धावपटू मोहम्मद अनास याने झेक रिपब्लीक येथील ४०० मी. शर्यतीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 2. ही शर्यत ४५.२४ सेकंदात पूर्ण करत मोहम्मद अनासने नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला आहे.
 3. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चौथे स्थान मिळविताना अनसने ४५.३१ सेकंदांचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला होता.
 4. त्यापूर्वीचा ४५.३२ सेकंदाचा विक्रम त्याच्याच नावावर होता.
 5. मिल्खा सिंगनंतर राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत प्रवेश करणारा अनास हा दुसरा भारतीय ठरला. मिल्खा सिंग यांनी १९५८मध्ये ४४० यार्ड शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते.
 6. भुवनेश्‍वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत अनासने ४२ वर्षांनंतर भारताला चारशे मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते.
 7. याच स्पर्धेत महिलांची ४०० मीटर शर्यत ५३.०१ सेकंदात पार करत भारताच्या आर. पुवम्मानेही सुवर्णपदक जिंकले.
 8. तर पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीत ४०० मीटरमधील माजी राष्ट्रीय विक्रमवीर आरोक्‍य राजीवने २०.७७ सेकंद वेळ देत कांस्यपदक जिंकले.


sunil chetri best player award announced

 1. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा २०१७ या वर्षाचा ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार’ जाहीर कण्यात आला आहे.
 2. छेत्रीने नुकताच आपला १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. बायचुंग भूतियानंतर ही कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा खेळाडू ठरला. तो भारत आणि बंगळुरू एफसीचा स्ट्रायकर आहे.
 3. पुरुष गटात छेत्रीला सर्वोत्कृष्ट खेळाडू, तर महिला गटात कमलादेवीला २०१७ची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
 4. एआयएफएफच्या २०१७चे अन्य पुरस्कार:
 5. बेस्ट ग्रासरुट डेव्हलपमेंट प्रोग्राम पुरस्कार : केरळ एफ.ए.
 6. सहायक रेफ्री पुरस्कार : सुमंत दत्ता
 7. सर्वोत्कृष्ट रेफ्री पुरस्कार : सी. आर. कृष्णा


Top

Whoops, looks like something went wrong.