.jpg)
1874 07-Aug-2018, Tue
- अमेरिकेने भारताचा समावेश 'स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथरॉयझेशन-1' (एसटीए) यादीत केला असून, त्यामुळे अमेरिकेतील उच्च तंत्रज्ञान आयात करण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याची माहिती भारताचे अमेरिकेतील दूत नवतेज सिंह सरना यांनी दिली.
- अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांनी 30 जुलै रोजी याबाबतची घोषणा केली.
- त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना सरना म्हणाले, 'अमेरिकेचा हा निर्णय केवळ भारताप्रती वाढत असलेल्या विश्वासाचे प्रतीक नसून, आर्थिक व संरक्षण क्षेत्रांतील एक भागीदार या नात्याने भारताच्या क्षमतेला दिलेली एकप्रकारची मान्यताच आहे.
- या निर्णयामुळे उभय देशातील द्विपक्षी, तसेच संरक्षण संबंध आणखी मजबूत होतील.'
- अमेरिकेच्या निर्यात नियंत्रण व्यवस्थेत भारताचे स्थान पाहता करण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण बदल असून, भारतासोबतचे आर्थिक व संरक्षण संबंध आमच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळेच भारताला हा दर्जा देण्यात आल्याचे विल्बर रॉस स्पष्ट केले.
- दरम्यान, अमेरिकेने 2016 मध्ये भारताला एक प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून मान्यता दिली होती.
- जगभरातील 35 देशांना अमेरिकेचा 'एसटीए-1' दर्जा प्राप्त असून, आता भारतही त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
- हा दर्जा प्राप्त करणारा भारत हा दक्षिण आशियातील एकमेव देश असून, आशियातील जपान, दक्षिण कोरिया या देशांचाही या यादीत समावेश आहे.
- नाटोचे सदस्य असलेल्या बहुतांशी देशांनाही यात स्थान देण्यात आले आहे.