Ajay Narayan Jha: new members of the Finance Commission

 1. अजय नारायण झा यांची पंधराव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे.
 2. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनल्यानंतर शक्तीकांता दास यांनी आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता.
 3. अजय नारायण झा हे मणीपूरचे 1982 सालचे बॅचचे भारतीय प्रशासन सेवा अधिकारी आहेत.
 4. ते भारत सरकारचे वित्त सचिव होते. यापूर्वी त्यांनी चौदाव्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून काम केले होते.
 5. पंधराव्या पंचवार्षिक वित्त आयोगाची स्थापना नोव्हेंबर 2017 मध्ये एन. के. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
 6. एप्रिल 2020 ते मार्च 2025 या कालावधीसाठी राष्ट्र व राज्य यांमधील महसूलाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी त्यायोग्य पद्धत तयार करण्यासाठी हे आयोग तयार करण्यात आले.


Usha Thorat Committee of RBI to study outside the market of the country

 1. भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) माजी उप-गव्हर्नर उषा थोरात यांच्या नेतृत्वात एक कृतीदल तयार केले आहे.
 2. जे देशाबाहेरील रुपयाच्या बाजारपेठेसंबंधी (offshore rupee market) समस्यांचे परीक्षण करणार आणि स्थानिक चलनाच्या बाह्य मूल्याबाबत स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी धोरणात्मक उपाययोजनांची शिफारस करणार आहे.
 3. आठ सदस्य असलेली ही समिती देशाबाहेरील रुपयाच्या बाजारपेठेच्या विकासाच्या कारणांचे मूल्यांकन करणार आहे.
 4. स्थानिक बाजारपेठेतले रुपयाचे विनिमय दर आणि बाजारातली तरलता यावर देशाबाहेरील बाजारपेठेच्या प्रभावांचा अभ्यास करणार आहे.
 5. समिती स्थानिक बाजारात प्रवेश करण्यासाठी अनिवासी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजनांची देखील शिफारस करणार आहे.


Ministry of Textiles 'Weaving Area Development Scheme'

 1. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने ‘विणकाम क्षेत्र विकास योजना’ (scheme for Development of Knitting and Knitwear Sector) याचा शुभारंभ केला आहे.
 2. भारत सरकारच्या पॉवरटेक्स भारत कार्यक्रमाच्या अंतर्गत ही योजना तयार करण्यात आली आहे.
 3. विणकाम आणि विणलेल्या कापडी वस्तू या क्षेत्राचा MSME क्षेत्रात महत्त्वाचा वाटा आहे. कापडांच्या निर्यातीत देखील त्याचे लक्षणीय योगदान आहे.
 4. या क्षेत्राचा भारतातल्या एकूण विणकाम उत्पादनात 27% योगदान आहे आणि 15% कापड निर्यात केले जात आहे.
 5. योजनेचे घटक:-
  1. उद्योगांच्या सहकार्याने विणकाम करणार्‍या कामगारांच्या समूहाने सार्वजनिक खासगी भागीदारी (PPP) तत्वावर नवीन सेवा केंद्रे तयार करणे.
  2. वस्त्र संशोधन संघ (TRAs) आणि निर्यात प्रोत्साहन परिषदा (EPCs) याच्याद्वारे चालविण्यात येणार्‍या उपस्थित पॉवर यंत्रमाग सेवा केंद्रांचे आणि संस्थांचे आधुनिकीकरण
  3. ग्रुप वर्क शेड योजना
  4. यार्न बँक योजना
  5. सामान्य सुविधा केंद्र योजना
  6. प्रधानमंत्री पत योजना
  7. सौर ऊर्जा योजना
  8. आणि अन्य सुविधा
 6. तिरुपूर, लुधियाना, कानपूर आणि कोलकाता येथे या क्षेत्राचे सर्वात मोठे समूह आहेत.
 7. तिरुपूर (तामिळनाडू) हा सर्वात महत्वाचा निर्यात गट आहे. तिरुपूरमधील 90% पेक्षा अधिक उत्पादन निर्यात केले जाते.
 8. पॉवरटेक्स भारत योजना आणि विणकाम विकास योजना एकत्र करून मंत्रालयाकडून चालवली जात आहे.
 9. 1 एप्रिल 2017 पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना चालवली जात आहे.


Citizens rejected for the fifth consecutive term as President of Algeria

 1. अल्जेरियाचे 81 वर्षीय राष्ट्रपती अब्देलअझीझ बुतेफ्लिका हे पदावर त्यांच्या पाचव्या काळासाठी राहण्याचा विचार करीत आहे.
 2. राष्ट्रपती पदासाठी त्यांनी उमेदवारी निश्चित केल्यानंतर देशभरात विरोध प्रदर्शन सुरू झाली. त्यांच्या या निर्णयाचा नागरिकांनी विरोध केला असून हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत.
 3. 1999 साली अब्देलअझीझ बुतेफ्लिका अल्जेरियाचे राष्ट्रपती बनले. गृहयुद्धाचा अंत करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. 
 4. अल्जेरिया हा आफ्रिका खंडाच्या उत्तर भागातील माघरेब प्रदेशामधील एक देश आहे.
 5. सध्या अल्जेरियामध्ये अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धतीचे सरकार आहे.
 6. अल्जीयर्स ही अल्जीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 7. अल्जेरियाई दिनार हे राष्ट्रीय चलन आहे.


NASA's 'Atmospheric Wave Experiment (AWE) Mission'

 1. अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संस्थेनी USD 49 दशलक्ष एवढा खर्च असलेल्या ‘अॅटमॉस्फियरिक वेव्ह्ज एक्सपेरिमेंट (AWE) मिशन’ नावाची अंतराळ हवामान अंदाज विषयक मोहीम राबविण्याची योजना आखली आहे.
 2. अंतराळात पृथ्वीभोवती असलेल्या आवरणाचा अभ्यास करण्यासाठी आणि तेथील हवामानाचा अंदाज घेण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे.
 3. हा विषय अंतराळ मोहिमांमध्ये अत्याधिक महत्वाचा आहे.
 4. अंतराळात तंत्रज्ञान आणि अंतराळवीरांवर त्याचा प्रचंड परिणाम होतो, रेडिओ संप्रेषणांमध्ये व्यत्यय येते आणि सर्वात गंभीर म्हणजे जमिनीवरील पॉवर ग्रिडवर त्याचा होणारा गंभीर परिणाम.
 5. संपर्कामध्ये उपयोगात येणार्‍या रेडियो लहरींमध्ये पृथ्वीच्या वरच्या वातावरणाचा हस्तक्षेप होतो. त्यामुळे संपर्क व्यवस्था प्रभावित होते. म्हणूनच यावर उपाय शोधण्यासाठी अश्याप्रकारची मोहीम प्रथमच चालवली जाणार आहे.
 6. ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) कडे ही मोहीम पाठविण्याची योजना आहे.
 7. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA):-
  1. ही संयुक्त राज्ये अमेरिका (USA) या देशाची एक सरकारी शाखा आहे, जी देशाच्या सार्वजनिक अंतराळ कार्यक्रमांचे आयोजन करण्यास आणि हवाई उड्डाणशास्त्र व अंतराळ संशोधनासाठी जबाबदार आहे. 
  2. NASAची स्थापना दिनांक 19 जुलै 1948 रोजी नॅशनल अॅडवायजरी कमिटी फॉर एरोनॉटिक्स (NCA) याच्या जागी केली गेली.


Top

Whoops, looks like something went wrong.