agni 5 will enter in to the indian army

 1. चीनलाही माऱ्याच्या टप्प्यात आणणारी “अग्नी-5” ही आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणा लष्करात समाविष्ट करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारताच्या लष्करी सामर्थ्यात मोठी वाढ होणार आहे.
 2. पाच हजार कि.मी.चा पल्ला आणि अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) या विशेष तुकडीमध्ये समाविष्ट केले जाणार आहे.
 3. तसेच या क्षेपणास्त्र यंत्रणेच्या काही चाचण्या झाल्या असून. काही अद्याप बाकी आहेत. चीनची राजधानी बीजिंगसह शांघाय, हॉंगकॉंग अशी शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येऊ शकतात.


ICC Honour hall of fame to rahul dravid

 1. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि ‘द वॉल’ असं बिरुद मिरवणाऱ्या राहुल द्रविडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आयसीसीकडून राहुल द्रविडचा Hall of Fame मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
 2. राहुल हा आयसीसीच्या मानाच्या यादीत सहभागी होणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी भारताच्या बिशनसिंह बेदी, कपिल देव, सुनील गावसकर आणि अनिल कुंबळे या खेळाडूंना आयसीसीच्या Hall of Fame या यादीत स्थान मिळालं आहे.
 3. तसेच द्रविडसह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग आणि इंग्लंडचे ज्येष्ठ फलंदाज क्लेरी टेलर यांनाही आयसीसीच्या यादीत मानाचं स्थान मिळालं आहे.
 4. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये द्रविड 13 हजार 288 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये द्रविडच्या पुढे अनुक्रमे सचिन तेंडुलकर, रिकी पाँटींग आणि जॅक कॅलिज हे खेळाडू आहेत.


Mumbai's Victorian and Art Deco Ensemble has been declared as the UNESCO World Heritage Site.

 1. दक्षिण मुंबई परिसरातील व्हिक्‍टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तूंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे.
 2. ‘युनेस्को‘च्या जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा येथे झालेल्या 42व्या परिषदेत दक्षिण मुंबईतील व्हिक्‍टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे राज्यात पाचव्या जागतिक वारसा स्थळाचा समावेश होणार आहे.
 3. दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह व फोर्ट परिसरात 19व्या शतकातील व्हिक्‍टोरियन वास्तुशैलींच्या इमारती व 20व्या शतकातील आर्ट डेको शैलीच्या इमारती आहेत.
 4. यामध्ये उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिन्स्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, पश्‍चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलिस मुख्यालय, ओव्हल मैदान या व्हिक्‍टोरियन वास्तुशैलीच्या इमारती, तसेच क्रिकेट क्‍लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्‍लमेशनची पहिली रांग, दिनशॉ वाछा रोडवरील राम महल, इरॉस व रिगल सिनेमा हॉल, तसेच मरिन ड्राइव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती आदी वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होण्यासाठी नामांकन झाले आहे.


5 years FDI Report

 1.  भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढीचा  गेल्या पाच वर्षांतील नीचांक झाला असून परकीय गुंतवणुकीच्या वाढीचा दर २०१७-१८ मध्ये ३ टक्के नोंदला गेला असून केवळ ४४.८५ अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढी गुंतवणूक झाली आहे.
 2. औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्या आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये थेट परकीय गुंतवणूक केवळ ३ टक्के वाढली असून ४४.८५ अब्ज डॉलर्स एवढीच गुंतवणूक झाली आहे.
 3. परदेशी निधीचा देशातील ओघ २०१६-१७ मध्ये ८.६७ टक्क्य़ांनी वाढला तर २०१५-१६ मध्ये हे प्रमाण २७ टक्के तर २०१३-१४ मध्ये ८ टक्के होते. २०१२-१३ मध्ये थेट परदेशी गुंतवणूक ऋण ३५ टक्के होती. तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत गुंतवणूक वाढवणे आता गरजेचे असून परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उद्योगस्नेही वातावरण निर्माण केले पाहिजे.
 4. डेलॉइट इंडियाचे अनिल तलरेजा यांनी सांगितले की, ग्राहक व किरकोळ क्षेत्रात परदेशी गुंतवणूक कमी झाली आहे कारण भारताच्या थेट परदेशी गुंतवणूक धोरणात अनिश्चितता व गुंतागुंत आहे.
 5. उद्योगस्नेही मानांकनात भारताची कामगिरी चांगली असली तरी परदेशी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण करण्यात अपयश आले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक बिस्वजित  धर यांनी सांगितले की, थेट परदेशी गुंतवणूक ही देशाच्या अर्थव्यवस्थेची व्यापकता दाखवत असते.
 6. गेल्या दोन वर्षांत थेट परकीय गुंतवणूक कमी होत गेली होती. यूएनसीटीएडी या संस्थेच्या अहवालातही भारतातील  थेट परकीय गुंतवणूक २०१७ मध्ये ४० अब्ज डॉलर्सपर्यंत घसरली होती. २०१६ मध्ये ती ४४ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरली होती.
 7. भारतातून दक्षिण आशियात झालेली गुंतवणूक ११ अब्ज डॉलर्स म्हणजे दुप्पट झाली होती.


Top