
1914 03-Feb-2018, Sat
- भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने भारताच्या ईशान्य क्षेत्रातील विमानतळांच्या विकासासाठी आणि सुधारणांसाठी 3,400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
- आसामसाठी 1720 कोटी रुपये, त्रिपुरासाठी 525 कोटी रुपये, मणिपुरसाठी 800 कोटी रुपये, नागालँडसाठी 42 कोटी रुपये, अरुणाचल प्रदेशासाठी 211 कोटी रुपये आणि मिजोरमसाठी 60 कोटी रुपये वाटप केले गेले आहेत.
- वर्ष 2016-17 मध्ये या क्षेत्रात हवाई प्रवाश्यांची एकूण संख्या 68.04 लक्ष होती.
- मागील वर्षात यामध्ये 27.02% ची वाढ नोंदवली गेली आहे.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) याची 1 एप्रिल 1995 रोजी स्थापना करण्यात आली.
- हे प्राधिकरण नागरी हवाई वाहतूक मंत्रालयांतर्गत कार्यरत असून विमानतळ व त्याला संलग्न पायाभूत संरचनेचे निर्माण, सुधारणा, देखभाल आणि व्यवस्थापन यासाठी जबाबदार आहे.