
1154 24-Nov-2017, Fri
- स्वीत्झर्लंडच्या IMD या प्रमुख बिजनेस स्कूलने प्रकाशित केलेल्या 'IMD टॅलेंट रँकिंग' या जागतिक क्रमवारीमध्ये भारताचे स्थान ३ स्थानांनी उंचावत ५१ व्या क्रमांकावर पोहचले आहे.
- या क्रमवारीत प्रथम स्थानी स्वीत्झर्लंड पुन्हा एकदा कायम आहे. या क्रमवारीत प्रथम दहामध्ये स्वीत्झर्लंड नंतर अनुक्रमे ऑस्ट्रिया, फिनलँड, नेदरलँड, नॉर्वे, जर्मनी, स्वीडन आणि लक्जमबर्ग या देशांचा समावेश आहे.
- यूरोप प्रांतातील स्वीत्झर्लंड, डेनमार्क आणि बेल्जियम हे देश या बाबतीत प्रतिस्पर्धी आहेत. यूरोपची भक्कम शिक्षण प्रणाली स्थानिक प्रतिभाचा विकास तसेच परदेशी प्रतिभा आणि उच्च कुशल व्यवसायिकांना आकर्षित करण्याची क्षमता प्रदान करते.
- IMD टॅलेंट रँकिंग हा प्रतिभांना आकर्षित व विकसित करण्यात आणि त्यांना आपल्या येथे सतत कामावर ठेवण्यामध्ये देशांच्या प्रयत्नांना प्रदर्शित करते. IMD ने आपल्या वार्षिक जागतिक प्रतिभा क्रमवारीमध्ये ६३ देशांचा समावेश केला आहे.