338 workers get 'Prime Minister's Award'

 1. उपराष्‍ट्रपती एम. वेंकेया नायडू यांच्या हस्ते सन 2011, 2012, 2013, 2014, 2015 आणि 2016 साठी 338 कामगारांना 194 ‘पंतप्रधान श्रम’ पुरस्‍कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत.
 2. पुरस्‍कार विजेत्यांमध्ये केंद्र व राज्‍य शासनांच्या कमीतकमी 500 सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी उपक्रमांमध्ये काम करणारे कामगार सामील होते.
 3. एकूण 338 पुरस्‍कार विजेत्यांमध्ये 20 महिला आहेत. दोन कामगारांना पुरस्‍कार मरणोत्तर दिले गेले.
 4. ‘पंतप्रधान श्रम’ पुरस्‍कार आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेनी बजावणारे तसेच उत्‍पादकता, सुरक्षा, गुणवत्‍ता, अभिनवता क्षमता आणि संसाधनांच्या संरक्षणासाठी उत्‍कृष्‍ट प्रदर्शन करणे तसेच जागृत व असाधारण साहस दाखवलेल्या कामगारांना दिले जाते.
 5. हा पुरस्कार कर्तव्य बजावताना आलेल्या मृत्यूसाठीही मरणोत्तर दिला जातो.

पंतप्रधान श्रम पुरस्काराचे स्वरूप

 1. श्रम भूषण पुरस्कार:
  1. पुरस्काराची एकूण संख्या 4, रोख पुरस्कार रुपये 1,00,000 आणि ‘सनद’.
 2. श्रम वीर / श्रम वीरांगना पुरस्कार:
  1. पुरस्काराची एकूण संख्या 12, रोख पुरस्कार रुपये 60,000 आणि ‘सनद’.
 3. श्रम श्री / श्रम देवी पुरस्कार:
  1. पुरस्काराची एकूण संख्या 16, रोख पुरस्कार रुपये 40,000 आणि ‘सनद’.


Recognition from the WHO of a shanty crystal biotechnics vaccine

 1. भारतीय शांता बायोटेकनिक्स कंपनीने कॉलरा आजारापासून बचावासाठी तयार केलेल्या तोंडावाटे घेता येणार्‍या ‘सॅंकॉल (Shanchol)’ नामक लसीला नियंत्रित तापमान साखळीत जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मान्यता प्राप्त झालेली आहे.
 2. WHO ने नियंत्रित तापमान साखळीत सॅंकॉल लसीला समाविष्ट करण्यासाठी साठ्यात बदल करण्याची परवानगी दिली आहे.
 3. शांता बायोटेकनीक्स ही औषधनिर्माण व संशोधन कंपनी सॅनोफी पाश्चर या उद्योगसमूहाची एक संलग्न कंपनी आहे.
 4. या परवानगीमुळे लसी संदर्भात खालील बाबी सुकर झाल्या:-
  1. लसीला उपयोगात आणण्यापूर्वी आधी 40 डिग्री सेल्सियस एवढ्या तापमानावर 14 दिवसांच्या एकल कालावधीसाठी ठेवले जाऊ शकणार आहे.
  2. या परवानगीमुळे वाहतुकीदरम्यान लसीच्या शीत-साखळीला (लसीचा प्रभाव टिकवण्यासाठी +2 डिग्री सेल्सियस व +8 डिग्री सेल्सियस या दरम्यान तापमान ठेवणे) सांभाळण्यामध्ये येणार्‍या आव्हांनांचे निवारण झाले आहे.

तुम्हाला हे माहित आहे का?

 1. पार्श्वभूमी:-
 2. शांता बायोटेकनिक्स कंपनीची ही दुसरी लस आहे, जी मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ शकणार आणि पारंपरिक शीत-साखळीत बाहेर साठवून ठेवण्यास आणि वितरित करण्यास परवानगी प्राप्त करणारी जगातली पहिली लस आहे.
 3. 2011 साली WHO च्या पूर्व-पात्रतेनंतर, कोंगो, हैती, मोजांबिक आणि दक्षिण सुदान सहित 25 देशांमध्ये सॅंकॉल लसीची 12 दशलक्ष खुराक पाठविण्यात आलेली आहे.
 4. तसेच सप्टेंबर 2017 मध्ये नायजेरियात उद्रेक झाल्यानंतर कंपनीने आंतरराष्ट्रीय मानवतावादी मदत योजनेमधून लसीची 900,000 खुराक पाठवली होती.


'Viral load' check for people suffering from HIV / AIDS in India

 1. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्‍याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी 26 फेब्रुवारी 2018 रोजी नवी दिल्लीत ‘HIV/एड्स ग्रस्त लोकांसाठी ‘व्हायरल लोड’ तपासणीचा शुभारंभ केला.
 2. या पुढाकाराच्या माध्यमातून देशामध्ये उपचार घेत असलेल्या 12 लाख HIV/एड्स ग्रस्त लोकांची नि:शुल्‍क ‘व्हायरल लोड’ तपासणी वर्षातून कमीतकमी एकदातरी नक्कीच केली जाऊ शकणार आहे.
 3. वर्तमान परिस्थिती:-
  1. वर्तमानात सुमारे 12 लाख HIV ग्रस्त लोक 530 हून अधिक ART केंद्रांमध्ये मोफत उपचाराचा लाभ घेत आहे.
  2. वैयक्तिक व समुदाय दोन्ही पातळीवर HIV च्या प्रसाराला आळा घालून त्याचा प्रसार कमी करण्यासाठी भारत सरकारने ‘ट्रीट ऑल’ पुढाकार घेतला आहे.
  3. 2017 साली ‘अॅंटीरेट्रोव्हायरल थेरेपी (ART) उपचार शिष्टाचाराला सुधारित केले गेले, जेणेकरून ART घेणार्‍या सर्व HIV ग्रस्त लोकांसाठी ‘ट्रीट ऑल’ पुढाकाराचा शुभारंभ होऊ शकणार आहे.

तपासणीचे महत्त्व

 1. ‘व्हायरल लोड’ तपासणी आजीवन अॅंटीरेट्रोव्हायरल थेरेपी (ART) घेणार्‍या रोगींच्या उपचाराच्या प्रभावांची निगरानी करण्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व ठेवते.
 2. नियमित तपासणी ‘फर्स्‍ट-लाइन रेजिमेंस (नियमानुसार प्रतिबंध)’ च्या उपयोगाला अनुकूल करणार, ज्यामुळे HIV ग्रस्त लोकांमध्ये औषधी-विरोधी प्रक्रियेचे निवारण होऊ शकणार आणि त्यांना दीर्घायुषी लाभण्यात मदत होऊ शकणार आहे.
 3. तपासणी ART शी जुळलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना फर्स्‍ट-लाइन उपचाराच्या  अपयशाबाबत आधीच निदान करण्यास सक्षम बनविणार आणि याप्रकारे ही रोगींना औषधी-रोधी होण्यापासून परावृत्त केल्या जाऊ शकणार आहे.
 4. LFU (लॉस टू फॉलो अप) HIV ग्रस्त लोकांवर लक्ष ठेवण्याच्या बाबतीत ‘मिशन संपर्क’ ला बळकट करण्यामध्येही याची मदत होणार आहे.


The first 'national ports, waterways and coastal technology centers' will be set up in IIT Madras, India

 1. जलवाहतूक व जलस्त्रोत मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते IIT मद्रास मध्ये पहिली ‘राष्ट्रीय बंदरे, जलमार्ग व तट तंत्रज्ञान केंद्र (NTCPWC)’ उभारण्यासाठी कोणाशीला ठेवण्यात आली आहे.
 2. राष्ट्रीय बंदरे, जलमार्ग व तट तंत्रज्ञान केंद्र (National Technology Centre for Ports, Waterways and Coasts -NTCPWC):-
 3. पार्श्वभूमी:-
  1. राष्ट्रीय बंदरे, जलमार्ग व तट तंत्रज्ञान केंद्र (National Technology Centre for Ports, Waterways and Coasts -NTCPWC) याची स्थापना जलवाहतूक मंत्रालयाच्या प्रमुख कार्यक्रम ‘सागरमाला’ अंतर्गत केली जात आहे.
  2. ही संस्था बंदरे, भारतीय आंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण आणि अन्य संस्थांसाठी अभियांत्रिकी व तांत्रिक माहिती आणि मदत प्रदान करण्यासाठी मंत्रालयाच्या एका तांत्रिक शाखेच्या रूपात कार्य करणार आहे.
  3. यासाठी 70.53 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


The world-famous cardiologist Dr. BK Goyal passes away

 1. प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी के गोयल यांचे २० फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले.
 2. सर्वसामान्य तसेच गरजू रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती.
 3. हृदयविकारशास्त्रातील प्रगाढ अभ्यास आणि अनुभवामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून गोयल यांच्याकडे रुग्णांचा ओघ असे.

 डॉ. बी के गोयल

 1. जयपूरला १९३६साली जन्मलेले डॉ. बी के गोयल हे एक जगप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ होते.
 2. डॉ. गोयल हे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख होते.
 3. तसेच त्यांनी जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये कार्डियोलॉजीचे डायरेक्टर-प्रोफेसर म्हणूनही काम केले.
 4. टेक्सास हार्ट इन्स्टिटय़ूट व न्यू ऑर्लिन्स येथील ओशनर हार्ट इन्स्टिटय़ूट या संस्थांमध्ये ते सल्लागार शल्यविशारद होते.
 5. खान अब्दुल गफार खान म्हणजे सरहद्द गांधी यांच्यावरील शस्त्रक्रियेमुळे गोयल यांचे नाव सर्वतोमुखी झाले.
 6. १९९०मध्ये तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल केले होते तेव्हा त्यांच्यावर उपचारासाठी गोयल यांना पाचारण करण्यात आले होते.
 7. गोयल यांनी भारतातील पहिले इंटेन्सिव्ह केअर युनिट आणि मोबाइल कोरोनरी केअर युनिट स्थापन केले.
 8. त्यांचे ‘हार्ट टॉक’ हे पुस्तक अनेक भाषांत प्रसारित झाले. १९८०मध्ये वयाच्या ३९व्या वर्षी ते मुंबईचे नगरपाल (शेरीफ)होते.
 9. अवघ्या २९व्या वर्षी जे जे रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. याशिवाय अनेक रुग्णालयांत हृदयरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केले.
 10. ह्युस्टनस्थित टेक्सास हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये ते हृदयरोगतज्ज्ञ सल्लागार होते तसेच भारतीय सैन्यदलाच्या विभागाचेही ते हृदयरोगतज्ज्ञ सल्लागार होते.
 11. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वैद्यकीय सल्लागार चमूमध्येही त्यांचा सहभाग होता. मुंबईतील हाफकिन संस्थेच्या अध्यक्षपदाचा त्यांनी १४ वर्षे कार्यभार सांभाळला.
 12. देशातील पल्स पोलिओ अभियान, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंडो अमेरिकन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी, हार्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया, इंडियन कॉलेज ऑफ कार्डिओलॅजी, धन्वंतरी फाऊंडेशन येथेही त्यांनी भरीव काम केले.
 13. मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाने गोयल यांची जुलै २००७मध्ये उपराष्ट्रपती पदासाठी आणि मार्च २०१२मध्ये राष्ट्रपती पदासाठी शिफारस केली होती.
 14. वैद्यकीय क्षेत्रातील मौल्यवान योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री (१९८४), पद्मभूषण (१९९०), पद्मविभूषण (२००५) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
 15. गोयल यांनी पन्नासहून अधिक वर्षे वैद्यकीय सेवा केली. यात त्यांनी गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता निस्पृह भावनेने रुग्णसेवा केली.


Beginning of Shigmotvasa in Goa

 1. दणदण वाजणारे ढोल, कडाडणारे ताशे आणि कांसाळ्यांच्या (मोठ्या झांजा) तालबद्ध साथीला ‘ओस्सय ओस्सय’ ‘वा वा किती आनंद झाला, गोविंदा रे गोपाळा’ आदी उत्साही व लयबद्ध घोषणांनी दुमदुमणारा आसमंत, गुलाल-रंगांची उधळण यामुळे गोव्यातील शिगमोत्सवाचा माहौल उत्सवी बनतो.
 2. शिमगोत्सवाला स्थानिक भाषेत शिगमोत्सव किंवा शिशिरोत्सव असेही म्हटले जाते.
 3. खासकरून ग्रामीण भागात शिगमोत्सवाची विविध रुपे पाहायला मिळतात. सामाजिक बहुसांस्कृतिकरण व आधुनिकीकरणाच्या झळा शिगमोत्सवालाही बसत आहेत; मात्र इथल्या उत्सवप्रिय जनतेने हे सांस्कृतिक दायज (ठेवा) प्राणपणाने जपले आहे.
 4. गावागावात शिगम्याचे स्वरुप बदलत जाताना दिसते. समान्यत: झाड तोडून ग्रामदैवतचे आवाहन करून होळी उभारली जाते. लाकडे व शेणाच्या गोवºया जाळल्या जातात.
 5. बहुतेक गावांत रोमटामेळ दिसून येतो. ढोल-ताशे व कांसाळी वाजवत, नाचत-गात गटागटाने लोक गावात दारोदार फिरतात. काही ठिकाणी शिंग (तुतारीसारखे वाद्य) वाजविले जाते.
 6. काही गावांत फक्त मंदिराजवळ शिगमोत्सव साजरा होतो. यानिमित्ताने प्रथा, परंपरा पाळल्या जातात.
 7. रणमाले हा गायन, नृत्य व नाट्याचा प्रकार उत्तर गोव्यातील झर्मे या गावाने जपला आहे.
 8. चोरोत्सव हा विधी उत्तर गोव्यात काही ठिकाणी साजरा होतो. त्याचे स्वरुप गावानुसार बदललेले दिसून येते.
 9. गडे उत्सव हे साळ, कुडणे, पिळगाव इथल्या शिगम्याचे वैशिष्ट्य. काही गावांत करुल्यो किंवा करवल्यो हा प्रकार दिसून येतो. स्त्री रुप धारण केलेल्या मुलांची (करुल्यो) खणानारळाने ओटी भरुन पूजा केली जाते. होमखण, घोडेमोडणी, छत्र्यो उत्सव आदी प्रकार वेगवेगळ्या गावांत साजरे होतात.


The Importance of Today's Day in History

 1. महत्वाच्या घटना:-
  1. १९४६: बँक ऑफ इंग्लंड चे राष्ट्रीयीकरण झाले.
  2. १९४७: आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.
  3. १९४८: गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.
 2. जन्म:-
  1. १९२२: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे जन्म.
  2. १९३०: उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल २०१३)
  3. १९४४: पश्चिम बंगाल चे ७वे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म.
  4. १९८०: पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी यांचा जन्म.
 3. मृत्यू:-
  1. १९५५: महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती याचं निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८७७)
  2. १९८९: महाराष्ट्राचे ५वे आणि ९वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील याचं निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)
  3. १९९९: वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर याचं निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९१०)
  4. २००३: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी१९४२)


Top

Whoops, looks like something went wrong.