2.6 lakh deaths annually in India due to ammunition

 1. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतात दारुमुळे दरवर्षी २.६ लाख जणांचा मृत्यू होतो. 
 2. या लोकांना यकृताच्या समस्या, कर्करोग यांसारख्या समस्या उद्भवतात. तसेच दारु पिऊन गाडी चालवल्यानेही बरेच अपघात होतात आणि त्यातच अनेकांचा मृत्यू होतो.
 3. भारतात वर्षाला होणाऱ्या एकूण अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी १ लाख लोकांचे मृत्यू हे अप्रत्यक्षरित्या दारुमुळे होतात.
 4. तर कर्करोगामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ३० हजार जण दारु घेत असल्याचे समोर आले आहे.
 5. तर यकृताच्या आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असून त्यामुळे १.४ लाख लोकांचा मृत्यू होतो.
 6. त्यामुळे तरुणांना या व्यसनापासून दूर ठेवणे हे येत्या काळातील मोठे आव्हान असेल.
 7. तंबाखूच्या संदर्भात ज्याप्रमाणे धोरण असते त्याचप्रमाणे दारुच्या विषयातही राष्ट्रीय धोरण असावे अशी मागणी तज्ञांकडून करण्यात येत आहे.
 8. देशभरात दारु पिण्यासाठी वयाची एकच अट असावी असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या महाराष्ट्रात हे वय २५ वर्षे असून गोव्यात ते १८ वर्षे आहे. मात्र हे सगळीकडे सारखेच असावे अशी मागणी होत आहे.
 9. जगात दिवसाला दारुमुळे ६ हजार जण मृत्युमुखी पडतात. यातील २८ टक्के अपघात हे वाहनांचे अपघात, स्वत:ला इजा करुन घेणे व हिंसा यामुळे होतात.
 10. तर २१ टक्के पचनाच्या तक्रारीमुळे होतात. १९ टक्के लोकांना हृदयाशी संबंधित तक्रारी उद्भवतात. तर बाकीच्यांना कर्करोग आणि इतर तक्रारी उद्भवतात.


Launch of Green Agriculture Project in India

 1. भारत सरकारने अन्न व कृषी संघटनेसोबत मिळून हरित कृषी प्रकल्प (ग्रीन एग्रीकल्चर प्रोजेक्ट) सुरू केला.
 2. कृषी क्षेत्रातील जैव विविधता आणि वन संरक्षणाद्वारे कृषी क्षेत्रात  परिवर्तन आणणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
 3. या प्रकल्पाची अंमलबजावणी भारत सरकारच्या कृषी आणि पर्यावरण मंत्रालयाद्वारेकरण्यात येईल.
 4. मध्यप्रदेश, मिझोरम, ओडिशा, राजस्थान आणि उत्तराखंड या ५ राज्यांमध्ये हा प्रकल्प सुरु होणार आहे.
 5. या प्रकल्पासाठी ३३.५ दशलक्ष डॉलर्स निधी ग्लोबल एनवायरन्मेंट फॅसिलिटीद्वारे पुरविण्यात आला आहे.
 6. या प्रकल्पाअंतर्गत, जैव विविधता, जमिनीची धूप, हवामानातील बदल आणि वन व्यवस्थापनाला केंद्रस्थानी ठेवून कृषी उत्पादन घेतले जाईल.
 7. याद्वारे देशाच्या विकास आणि पर्यावरण संरक्षण यादरम्यान समन्वय स्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल.
 8. पार्श्वभूमी:-
  1. भारतातील शेती व संबंधित उपक्रम लोकसंख्येच्या मोठ्या भागासाठी उपजीविका देतात. भारतातील ८२ टक्के शेतकरी लहान किंवा भूमिहीन आहेत.
  2. जल पातळीमध्ये घट, जमिनीच्या उत्पादकतेमध्ये घट, जैवविविधता आणि प्राण्यांच्या प्राकृतिक स्त्रोतांचा ऱ्हास यामध्ये संसाधनांच्या अकार्यक्षम वापरामुळे वाढ झाली आहे.
  3. यामुळे पर्यावरणाची खूप हानी झाली आहे. म्हणूनच भारतात शेतीसाठी शास्त्रशुध्द दृष्टीकोन आणि वैज्ञानिक पद्धती अवलंबण्याची गरज आहे.
 9.  अन्न व कृषी संस्था (एफएओ):-
  1. ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या अंतर्गत कार्यरत एक विशेष संस्था आहे. भूकनिवारणासाठी जगभर प्रयत्न करणे हे ह्या संस्थेचे मुख्य कार्य आहे.
  2. १६ ऑक्टोबर १९४५ रोजी या संस्थेची स्थापना झाली. त्याचे मुख्यालय रोम, इटलीमध्ये स्थित आहे. सध्या जगातील १९४ देश ह्या संस्थेचे सदस्य आहेत.
 10. ग्लोबल एनवायरन्मेंट फॅसिलिटी:- 
  1. ही एक बहुपक्षीय आर्थिक यंत्रणा आहे, ज्याअंतर्गत पर्यावरण अनुकूल योजना सुरू करण्यासाठी देशांना अनुदान दिले जाते.
  2. १९९२च्या रियो अर्थ समिटनंतर या संस्थेची स्थापना झाली. जगाच्या पर्यावरणीय समस्येचे निराकरण करणे हा त्यांचा उद्देश आहे. त्याचे मुख्यालय वॉशिंग्टन, अमेरिका येथे स्थित आहे.
  3. या संस्थेद्वारे जैवविविधता, मातीच्या उत्पादकतेतील घट, जलवायू परिवर्तन, आंतरराष्ट्रीय जल क्षेत्र, ओझोन थराची झीज आणि सेंद्रीय प्रदूषके इत्यादि ६ प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य केले जाते.


World Tourism Day: September 27

 1. दरवर्षी 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. जगभरात पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने सन 1980 पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने हा दिवस साजरा करीत आहे.
 2. या वर्षी ‘सस्टेनेबल टूरिजम – ए टूल फॉर डेवलपमेंट’ या संकल्पनेखाली हा दिवस साजरा केला जात आहे. या वर्षी या दिवसाचे आयोजकत्व दोहा (कतार) कडे देण्यात आले आहे.
 3. दिवसाचा उद्देश - पर्यटन आणि त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक व आर्थिक मूल्यांच्या संदर्भात जागतिक पातळीवर समुदायांमध्ये जागृती निर्माण करणे. तसेच पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून देशांना उत्पन्न वाढविण्यास प्रोत्साहन देणे.
 4. पर्यटन उद्योग हा देशाच्या उत्पन्नात महत्त्वाचे योगदान देतो आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास मदत करते. शिवाय रोजगाराच्या दृष्टीने हे क्षेत्र सर्वाधिक रोजगार प्रदान करते.
 5. पर्यटनात भारत:-
  1. भारत जगातल्या पाच शीर्ष पर्यटक ठिकाणांपैकी एक आहे. भारतीय पर्यटन विभागाने सप्टेंबर 2002 मध्ये 'अतुल्य भारत' नावाने एक राष्ट्रीय अभियान सुरू केले.
  2. या अभियानाचा उद्देश म्हणजे भारतीय पर्यटनाला वैश्विक मंचावर चालना देणे. या अभियानांतर्गत हिमालय, वन्य जीव, योग आणि आयुर्वेद वर आंतरराष्ट्रीय समूहांचे लक्ष खेचले गेले.
 6. पार्श्वभूमी:-
 7. सन 1970 च्या 27 सप्टेंबर या तारखेला संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटनाचे (UNWTO) संविधान स्वीकारले गेले होते. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 27 सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिवसाचा रंग निळा आहे.
 8. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने वर्ष 2017 ला ‘विकासासाठी शाश्वत पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून घोषित केले गेले आहे.
 9. हे क्षेत्र जगाच्या सकल स्थानिक उत्पादनात अंदाजे 10% चे योगदान देते आणि जागतिक स्तरावर 10 पैकी 1 या प्रमाणात हे क्षेत्र रोजगार प्रदान करते.
 10. अंदाज आहे की, सन 2030 पर्यंत दरवर्षी 3.3% दराने पर्यटन क्षेत्राची वाढ होईल. 


Maharashtra is the most skilled in the ownership claim

 1. देशाच्या नावावर सर्वाधिक ‘पेटंट’ असणे जागतिक पातळीवर बहुमानाची गोष्ट मानली जाते.
 2. हेच चित्र महाराष्ट्रातही दिसून येते. त्यामुळेच महाराष्ट्रातून गेल्या वर्षी पेटंट प्राप्तीसाठी साडेतीन हजारांहून अधिक अर्ज करण्यात आले असून याबाबत राज्याने अग्रस्थान घेतले आहे.
 3. ‘पेटंट’ म्हणजे काय ?
  1. संशोधनाची मालकी आपली असल्याबाबत सरकारी पातळीवर मिळालेली मान्यता म्हणजे ‘पेटंट’ होय.
  2. गेल्या वर्षी पेटंटसाठी आलेले अर्ज :- ३,५१३. ( २०१५-१६च्या तुलनेत महाराष्ट्रातून ४ टक्के पेटंट अर्ज कमी दाखल झाले. )
  3. सर्वाधिक १९,६४० पेटंट अर्ज इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स संबंधित विषयात दाखल झाले.
  4. त्यापैकी २,८६० पेटंटला मान्यता मिळाली, तर १४,५४० पेटंट मेकॅनिकल आणि संबंधित विषयासाठी दाखल झाले आहेत.
 4. क्रमवार राज्यांची स्थिती :-(कंसातील आकडे संबंधित राज्यांच्या अर्जाची संख्या)
  1. महाराष्ट्र - ३५१३,
  2. तामिळनाडू - २००३,
  3. दिल्ली - १०६६,
  4. तेलंगणा - ७९८,
  5. उत्तर प्रदेश - ६२५,
  6. गुजरात - ६२०,
  7. पश्चिम बंगाल - ४६०,
  8. हरियाणा - ४४१,
  9. केरळ -२७६,
  10. आंध्र प्रदेश - २७१,
  11. पंजाब - २०७,
  12. राजस्थान - १८१,
  13. झारखंड - १४४,
  14. मध्य प्रदेश - १४०,
  15. ओरिसा - १०३,
  16. आसाम - ६८,
  17. उत्तराखंड - ६४,
  18. जम्मू-काश्मीर - ४९,
  19. हिमाचल प्रदेश - ४०.


'E-Sahaj' online portal for security clearance

 1. केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी व्यापारी युनिट्सना सुरक्षा मंजूरी (क्लिअरन्स) देण्यासाठी ‘ई-सहज’ हे ऑनलाईन पोर्टल लॉन्च केले.
 2. या पोर्टलद्वारे इच्छुक सुरक्षा मंजूरीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात आणि नंतर त्यांचे स्टेटसही पाहू शकतात.
 3. ज्या उद्योगांना विशिष्ट परवाने, परवानग्या आणि नियम जरी केले जातात आणि याकरिता सुरक्षा मंजूरी (क्लिअरन्स) आवश्यक असते, अशा काही विशिष्ट उद्योगांद्वारे या पोर्टलचा वापर केला जाईल.
 4. काही संवेदनशील क्षेत्रातील कंपन्यांना परवान्यांसाठी सुरक्षा केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरक्षा मंजूरी (क्लिअरन्स) दिली जाते.
 5. गुंतवणूक आणि प्रकल्पांशी संबंधित आर्थिक धोक्यांचे मूल्यांकन करणे हा त्यामागचा उद्देश आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.