10 percent reservation

 1. समाजाच्या सर्व वर्गातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ लोकांना नोकऱ्यांमध्ये, तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय 8 एप्रिलला सुनावणी करणारआहे.

 2. या याचिकांची सुनावणी करतानाच, या मुद्दय़ावर घटनापीठाने निर्णय द्यायला हवा होता, या याचिकाकर्त्यांपैकी काही जणांनी केलेल्या युक्तिवादाचाही आम्ही विचार करू, असे न्या. शरद बोबडे व न्या.एस.ए. नझीर यांच्या खंडपीठाने सांगितले.

 3. आपल्यासह अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल हे सरन्यायाधीश रंजन गोगोईयांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे हजर राहणार असल्यामुळे याचिकांची सुनावणी पुढे ढकलावी, असे केंद्र सरकारच्या वतीने युक्तिवाद करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुरुवातीलाच सांगितले.

 4. याचिकाकर्त्यांपैकी एकाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 11 मार्चला दिलेल्या आदेशाचा संदर्भ देताना, या याचिका घटनापीठाकडे सोपवाव्यात की, नाही या मुद्दय़ावर विचार व्हायला हवा असे सांगितले.

 5. 103व्या घटनादुरुस्तीनुसार रेल्वे 10 टक्के आरक्षणासह भरती करणार असल्याचे धवन यांनी सांगितले. त्यावर, हा मुद्दा या प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या आधीन राहील, असे न्यायालयाने तोंडी सांगितले.


AIRGUN COMPETITION

 1. तैपेईमधील ताओयुआन येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई केली.

 2. रवी कुमार आणि ईलाव्हेनिल व्हालारिव्हान जोडीने 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवले. पात्रता फेरीत रवी आणि ईलाव्हेनिल यांनी 837.1 गुणांसह आघाडी मिळवली होती.

 3. मात्र पाच संघांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत पार्क सुनमिन आणि शिन मिन्की या कोरियाच्या जोडीने त्यांच्यावर सरशी साधली.

 4. कोरियाने 499.6 गुणांसह सुवर्णपदक मिळवले, भारतीय जोडीच्या खात्यावर 498.4 गुण जमा होते. चायनीज तैपेईच्या जोडीला कांस्यपदक मिळाले. दीपक कुमार आणि अपूर्वी चंडेला या दुसऱ्या भारतीय जोडीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

 5. तसेच स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सौरभ चौधरी आणि मनू भाकर जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. याचप्रमाणे विजयवीर सिधू आणि ईशा सिंग जोडीने कनिष्ठ गटात सुवर्णपदक पटकावले. आता पाच पदकांची कमाई असणारा भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.


DIN VISHESH

 • सन 1849 मध्ये ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले होते.

 • अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक ‘पाडुरंग लक्ष्मण‘ तथा ‘बाळ गाडगीळ‘ यांचा जन्म 29 मार्च 1926 मध्ये झाला होता.

 • 1968 या वर्षी हात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKVराहुरी येथे स्थापना झाली.

 • सन 1982 मध्ये एन.टी. रामाराव यांनी तेलगू देसम या पक्षाची स्थापना केली.


Top

Whoops, looks like something went wrong.