
2613 27-Mar-2018, Tue
- नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची या पदावर फेरनिवड झाली आहे.
- भंडारी यांनी नेपाळी काँग्रेसचे उमेदवार कुमार लक्ष्मी राय यांना पराभूत केले.
- भंडारी यांना दोन-तृतीयांश पेक्षा जास्त मते मिळाली.
- विद्या देवी भंडारी यांना सत्तारूढ़ सीपीएन-यूएमएल आणि सीपीएन (माओवादी) यांच्याव्यतिरिक्त वाम आघाडी, संघीय समाजवादी फोरम-नेपाल तसेच अन्य छोट्या पक्षांकडून समर्थन मिळाले.
- विद्यादेवी २०१५मध्ये नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या होत्या.
- तसेच १९९४ व १९९९च्या संसदीय निवडणुकीतही त्या निवडून आल्या होत्या.
- संसद सदस्य झाल्यानंतर ३ वर्षांनंतर विद्यादेवी यांना पर्यावरण मंत्रिपद देण्यात आले.
- मात्र, केवळ महिला मंत्री असल्याने त्यांना इतरांकडून सहकार्य मिळत नव्हते.
- विद्यादेवी या दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदावर विराजमान हो णे भारतासाठी अधिक समाधानकारक आहे. कारण त्यांच्या काळातच भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंधांना गती मिळाली आहे.