Sudha Balakrishnan: RBI's first Chief Financial Officer (CFO)

 1. सुधा बालकृष्णन यांना भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याच्या प्रथम मुख्य वित्तीय अधिकारी (chief financial officer) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
 2. ही नेमणूक 15 मे 2018 पासून लागू करण्यात आली आहे.
 3. या नियुक्तीपूर्वी सुधा बालकृष्णन नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या कार्यकारी अधिकारी होत्या. त्या RBI मध्ये 12 व्या कार्यकारी संचालक असतील आणि त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.
 4. सप्टेंबर 2016 मध्ये गव्हर्नर उर्जित पटेल पदावर आल्यानंतर ही सर्वात मोठी संस्थात्मक बदलाची घटना समजली जात आहे.
 5. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.
 6. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, 1934 च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले.
 7. मूळ भागभांडवलाची प्रत्येकी 100 समभागामध्ये विभागणी झालेली आहे, जे की सुरुवातीला खाजगी भागधारकांच्या पूर्णपणे मालकीचे होते.
 8. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)
 1. भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे. भारतीय रिझर्व बँकेचे कार्यालय मुंबई येथे आहे.
 2. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते.
 3. रिझर्व बँक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.
 4. भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

  1. भारतीय चलनी नोटांची छपाई नियमित करणे.
  2. भारताची गंगाजळी राखणे.
  3. भारताची आर्थिक स्थिती राखणे.
  4. भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.


Ayushman Bharat Scheme

 1. भारत सरकारची ‘आयुष्यमान भारत’ ही राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना गरीब नागरिकांसाठी वरदान ठरत आहे.
 2. या योजनेचे सकारात्मक परिणाम आता आरोग्य व्यवस्थेत दिसून येत आहेत.  
 3. या योजनेमुळे दर्जेदार आरोग्य सुविधा आणि औषधोपचार मिळण्यास मदत होत आहे.
 4. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ज्या आरोग्य गरजा आणि उपचार केले जात नव्हते त्यांना आता आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
 5. त्यामुळे वेळेवर उपचार मिळाल्याने आरोग्य सुधारणा, रुग्णांचे समाधान, कार्यक्षमतेत वाढ आणि रोजगार निर्मिती झाल्याने जीवनमान उंचावण्यासाठी मदत लाभली आहे.
 6. याचा प्रभाव जाणून घेण्याआधी आपण या योजनेविषयी जाणून घेऊयात -
 7. ‘आयुष्मान भारत - राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीम (ABNHPM)’ या योजनेचे दोन घटक आहेत.
 8. पहिला घटक म्हणजे 10.74 लक्ष कुटुंबांना मोफत 5 लक्ष रूपयांचा आरोग्य विमा प्रदान करणे आणि दुसरा म्हणजे हेल्थ अँड वेलनेस सेंटरची स्थापना करणे.
 9. देशभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना (PHC) अद्ययावत करून त्यांना हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये रूपांतरित केले जाणार आहे.
 10. देशभरात 150000 उपकेंद्रांना हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये रूपांतरित केले जात आहेत.
 11. या केंद्रांवर 12 प्रकारच्या आजारांवर उपचार दिले जात आहेत आणि मोफत तपासणी सुविधा आणि औषधी मिळते.
 12. योजनेची गरज आणि त्याचे परिणाम:-
 13. या योजनेमुळे भारताच्या 40% लोकसंख्येला आरोग्य सुरक्षा प्राप्त झाली आहे.
 14. ग्रामीण भागात कच्च्या भिंती आणि छप्पर असलेले एकच खोली असलेले घर, 16 ते 59 या वयोगटातला एकही सदस्य नसलेले कुटुंब, अनुसुचित जाती अनुसूचित जमाती कुटुंब, दिव्यांग आणि कुटुंबात शारीरिक सक्षम व्यक्ती नसलेले कुटुंब अशा वेगवेगळ्या श्रेणीतील कुटुंबे तर शहरी भागात 11 श्रेणीतली कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत.
 15. संपूर्ण देशात कुठेही हा लाभ घेता येतो. देशातल्या सुचीबद्ध कोणत्याही खाजगी अथवा सरकारी रुग्णालयात रोकड रहित या सुविधेचा लाभ घेता येतो.
 16. शिवाय ही योजना लागू करणाऱ्या राज्यातली सर्व सरकारी रुग्णालये या योजनेंतर्गत येतात.
 17. निधी वेळेत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारकडून राज्य आरोग्य संस्थांना थेट विशिष्ट खात्यात निधी जमा केला जातो.
 18. त्यामुळे वित्तीय कार्यांमध्ये सुलभता आली आहे. मात्र तरीही औषधी वितरण व्यवस्था, त्याचा पुरवठा आणि त्याला प्रवेश अश्या विविध बाबी योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे ठरत आहे.
 19. या समस्येला हाताळण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न चालू आहेत.


Patanjali's Swadeshi Prosperity Simcard unveiled

 1. बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करत आपली सिमकार्ड बाजारात आणली आहेत.
 2. यासाठी कंपनीने सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)शी करार केला आहे.
 3. हरिद्वारमध्ये या सिमकार्डचे अनावरण करण्यात असून, या सिमकार्डला स्वदेशी समृद्धी सिमकार्ड असे नाव देण्यात आले आहे.
 4. आता सुरुवातीच्या टप्प्यात या सिमकार्डचा वापर पतंजलीचे कर्मचारी आणि अधिकारी यांना करता येणार आहे.
 5. त्यानंतर हे कार्ड देशभरात असणाऱ्या बीएसएनएलच्या ५ लाख काऊंटर्सवर सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
 6.  पतंजली सिम कार्डचे फायदे:-
  1. हे सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांना पतंजलीच्या इतर उत्पादनांवर १० टक्के सूट मिळणार आहे.
  2. १४४ रुपयांच्या रिचार्जवर देशभर अनलिमिटेड कॉल्सबरोबरच २ जीबी डेटा देण्यात येणार आहे.
  3. याशिवाय १०० मेसेज मोफत मिळणार आहे.
  4. हे सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांना २.५ लाख रुपयांचा आरोग्य विमा, ५ लाख रुपयांचा जीवन विमा देण्यात येणार आहे.


 After the public meeting, Vedanta Group's Sterlite Copper project closed

 1. वेदांता ग्रुपच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाविरोधात गेले महिनाभर सुरु असलेल्या आंदोलनानंतर अखेर तामिळनाडू सरकारने हा प्रकल्प कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. तुतिकोरिन येथील या प्रकल्पाविरोधात लोकांनी आंदोलन पुकारल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ जणांचा मृत्यू झाला होता.
 3. त्यामुळे लोकांची मागणी लक्षात घेता प्रकल्प बंद करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे.
 4. तामिळनाडू सरकारने राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाला कॉपर प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
 5. तुतिकोरिन येथे वेदांता स्टरलाइट कॉपर प्रकल्प असून या प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी विस्तार केला जाणार होता. यासाठी काम देखील सुरु झाले होते.
 6. गेल्या १०० दिवसांपासून या प्रकल्पाविरोधात स्थानिक लढा देत होते. या प्रकल्पामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते.
 7. तसेच भूजल प्रदुषित होत असून यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचेही स्थानिकांनी म्हटले होते.


 Virat Kohli received CEAT 'International Cricketer of the Year' award

 1. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला ‘CEAT क्रिकेट मानांकन पुरस्कार’ समारंभात ‘इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 2. अन्य पुरस्कार:-
  1. जीवनगौरव पुरस्कार – फारूक इंजीनियर (भारत, सक्रिय: 1959-1976)
  2. पॉप्युलर चॉइस पुरस्कार - क्रिस गेल (वेस्ट इंडिज) 
  3. इंटरनॅशनल बॅटस्मन ऑफ द इयर - शिखर धवन (भारत)
  4. इंटरनॅशनल बॉलर ऑफ द इयर - ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) 
  5. आउटस्टँडिंग इनिंग्ज ऑफ द इयर - हरमनप्रीत कौर (भारतीय महिला) 
  6. डोमेस्टिक प्लेयर ऑफ द इयर - मयंक अगरवाल (भारत)
  7. अंडर 19 प्लेयर ऑफ द इयर - शुभमन गिल (भारत)


Top

Whoops, looks like something went wrong.