'State of the World Children 2017: Children in a Digital World' report is famous

 1. संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) ने आजच्या डिजिटल जगात लहान मुलांवरील वाढत्या लैंगिक गुन्ह्यांसंबंधी आणि अन्य प्रकारच्या धोक्यांवर गंभीर चिंता व्यक्त करत आपल्या ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन 2017: चिल्ड्रन इन ए डिजिटल वर्ल्ड’ अहवालात असे म्हटले आहे की, ही समस्या हाताळण्यासाठी शाळा, शुभेच्छुक आणि धोरण निर्मात्यांना अधिक जबाबदार बनण्याची आवश्यकता आहे.
 2. आज जगभरात इंटरनेटचा वापर करणार्‍यांमध्ये एक तृतीयांश तर मुले आहेत. 
 3. यावेळी प्रथमच UNICEF कडून मुलांवर डिजिटल तंत्रज्ञानाचा होणारा प्रभाव यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

मुख्य बाबी:-

 1. शिक्षणापासून ते मनोरंजन अश्या प्रत्येक क्षेत्रात आज मुलं इंटरनेटचा सर्रास वापर करीत आहेत.
 2. मात्र ज्या प्रमाणात ते याचा वापर करत आहेत, त्या स्तरावर डिजिटल जगातील धोक्यांपासून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था उपलब्ध नाहीत.
 3. आर्थिकदृष्ट्या समृद्ध वर्गातील मुलांमध्ये इंटरनेटचा वापर सर्वाधिक दिसून आलेला आहे.
 4. त्यामुळे मुलांना असलेला धोका आणि त्यामुळे होणार्‍या नुकसानाला सामोरे जाण्यासाठी त्यांना असेच सोडून दिले जात आहे, ही मुख्य चिंतेची बाब दिसून आली आहे.
 5. इंटरनेटचा वापर वंचित गटातील मुलांना माहिती पोहचण्यास, कौशल्य निर्मिती आणि आपल्या विचारांच्या माध्यमातून संवाद साधण्याच्या हेतूने एक व्यासपीठ प्रदान करू शकते.
 6. मात्र जगभरातील 34.60 कोटी अश्या मुलांना अजूनही ही सुविधा मिळालेली नाही, ज्यामुळे असमानता फैलत आहे.
 7. इंटरनेट कश्याप्रकारे मुलांसाठी धोक्याच्या संभावना वाढवत आहे. यामध्ये त्यांच्या खाजगी माहितीचा दुरुपयोग आणि नुकसानदायक सामग्रीपर्यंत पोहचण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
 8. निगरानीच्या अभावामुळे ही परिस्थिती आणखीनच गंभीर झालेली आहे.ज्यामुळे मानवी तस्करी आणि मुलांच्या लैंगिक शोषणाची प्रकरणे वारंवार दिसून येत आहे.
 9. कॅनडा, फ्रान्स, नेदरलँड, रशिया महासंघ आणि अमेरिकात होस्ट केलेल्या प्रत्येक 10 URLs पैकी 9 वर मुलांच्या लैंगिक शोषणासंबंधी सर्वाधिक डिजिटल सामग्री उपलब्ध असते.
 10. 'डार्क वेब' आणि क्रिप्टोकरन्सी यासारखे डिजिटल जाळे हे शोषण आणि गैरवापराचे सर्वात वाईट प्रकार आहेत, ज्यामुळे तस्करी आणि ऑनलाइन बाल लैंगिक शोषणाला प्रोत्साहन मिळत आहे.
 11. युवा गट इंटरनेटसोबत सर्वाधिक जोडले गेलेले आहेत. जागतिक स्तरावर, 71% तरुणाईची ऑनलाइन उपस्थिती असते, जी की एकूण लोकसंख्येच्या 48% आहे.
 12. तथापि, आफ्रिकेतील युवांची प्रत्येक पाचपैकी तीन या सर्वाधिक कमी प्रमाणात ऑनलाइन उपस्थिती असते, जेव्हा की युरोपमध्ये प्रत्येक 25 पैकी केवळ एक ऑनलाइन नसतो.
 13. सर्व वेबसाइट्सपैकी सुमारे 56% इंग्रजीत आहेत आणि बर्‍याच मुलांना ते समजत नसल्यामुळे इच्छित सामग्री मिळत नाही किंवा ते सांस्कृतिकदृष्ट्या अयोग्य असते.


वैद्यकीय शिक्षणासाठी नवा नियामक

 1. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार रोखण्यासाठी नवा नियामक आयोग स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
 2. सध्याची 'राष्ट्रीय वैद्यकीय परिषद' (एमसीआय ) मोडीत काढली जाणार आहे. त्यासाठी 'राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक २०१७' च्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
 3. या विधेयकानुसार वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण तसेच वैद्यकीय संस्थांचे मूल्यमापन आणि अधिस्वीकृती, डॉक्टरांची नोंदणी यासाठी चार स्वायत्त मंडळे स्थापली जाणार आहेत.
 4. रणजीत रॉय चौधरी समितीच्या शिफारशी तसेच संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींनुसार हा आयोग स्थापन केला जात आहे.
 5. या आयोगाचा अध्यक्ष आणि काही सदस्य हे सरकारनियुक्त असतील.
 6. पाच सदस्य हे निवडणुकीतून निवडले जातील, तर १२ सदस्य पदसिद्ध असतील.
 7. स्वायत्त मंडळांचे सदस्य हे कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील शोधसमितीकडून निवडले जातील.
 8. या आयोगामार्फत सामूहिक प्रवेश परीक्षा घेतली जाईल तसेच सर्व वैद्यकीय पदवीधारकांसाठी अनुज्ञा परीक्षा घेतली जाईल.
 9. ही अनुज्ञा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच वैद्यकीय व्यवसायासाठीचा परवाना दिला जाईल.
 10. संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर तीन वर्षांत अनुज्ञा परीक्षा सुरू केली जाणार आहे.


National Energy Conservation Day

 1. ऊर्जा कार्यक्षमता विभागाकडून दरवर्षी १४ डिसेंबरला 'राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस' साजरा करण्यात येतो.
 2. यावर्षी ३२२ औद्योगिक प्रकल्प तसेच प्रमुख क्षेत्रांतील आस्थापने '२७ व्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्‍कार' साठी सहभागी झाले होते.
 3. ऊर्जा कार्यक्षमता आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व यासंबंधी जनजागृती फैलावण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
 4. विद्युत मंत्रालयांतर्गत ऊर्जा कार्यक्षमता विभाग (Bureau of Energy Efficiency) कडून दरवर्षी १४ डिसेंबरला 'राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस' साजरा करण्यात येतो.
 5. या दिवसानिमित्ता ऊर्जेच्या वापर कमी करण्यामध्ये उद्योगांच्या प्रयत्नांचा सन्मान करणे आणि त्यांना प्रोत्‍साहित करण्यासाठी 'राष्‍ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्‍कार' प्रदान केले जातात.
 6. हा पुरस्कार ५६ उपश्रेणींमध्ये दिला जातो.


Indian Olympic Association President Narinder Batra

 1. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षपदावर निवड झाली आहे.
 2. कार्यकाळ - चार वर्ष
 3. तसेच राजीव मेहता यांची सरचिटणीस पदी बिनविरोध निवड झाली आहे.
 4. आशियाई टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी मागील आठवडय़ात अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली.
 5. त्यामुळे ६० वर्षीय बात्रा यांचा मार्ग मोकळा झाला होता.
 6. सरचिटणीस पदासाठी मेहता हे एकमेव उमेदवार असल्यामुळे सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी ते पद सांभाळणार आहेत


 Scorpion-class submarine INS Calvary joins Indian Navy

 1. 14 डिसेंबर 2017 रोजी मुंबईमध्ये भारतीय नौदलात ‘INS कलवारी’ ही स्कॉर्पियन श्रेणीतली पाणबुडी राष्ट्राच्या सेवेत रुजू करून घेण्यात आली आहे.
 2. आता भारतीय नौदलाकडे एकूण 14 पाणबुड्या आहेत.
 3. 1,564 टन वजनी ‘INS कलवारी’ ही एक डीजल-इलेक्ट्रिक युद्ध पाणबुडी आहे, ज्याला भारतीय नौदलासाठी मझगाव डॉक शिपबिल्‍डर्स लिमिटेड या जहाजबांधणी कंपनीने तयार केले आहे.
 4. ही त्या 6 पाणबुडींपैकी पहिली आहे, ज्यांना भारतीय नौदलात सामील करण्यात येणार आहे.
 5. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ पुढाकारा अंतर्गत हा प्रकल्प फ्रांसच्या सहकार्याने चालवला जात आहे.
 6. या पाणबुडीची संरचना फ्रांसची नौदल संरक्षण व ऊर्जा कंपनी ‘DCNS’ ने तयार केलेली आहे.
 7. याचे निर्माण भारतीय नौदलाच्या 'प्रोजेक्ट-75’ अंतर्गत MDL कडून करण्यात आले आहे.

INS कलवरीची वैशिष्ट्ये:-  

 1. ही पाण्यामुळे पडणार्‍या उच्च तीव्रता हायड्रोस्टॅटिक दबावाखाली काम करण्यास सक्षम आहे आणि महासागरामध्ये खोलपर्यंत प्रवास करू शकते.
 2. डीजल आणि विद्युत अश्या दोन्ही इंधनावर ही पाणबुडी चालते.
 3. पाणबुडी 6 x 533 मि.मी. टॉर्पेडो ट्यूबने सज्ज आहे, ज्यामधून 18 व्हाइटहेड एलनिया सुस्तमी सुबॅक्की ब्लॅक शार्क हेवीवेट टॉर्पेडो किंवा SM-39 एक्सॉकेट अॅंटी-शिप क्षेपणास्त्र सोडले जाऊ शकते.
 4. कलवरीला केवळ MBDA च्या ट्यूब-लॉंच एक्सोकेट SM-39 अॅंटी-शिप क्षेपणास्त्रांनी सुसज्जित केले गेले आहे.
 5. पाणबुडी पाण्याखाली असताना कमाल 20 नॉट (ताशी 37 किमी) तर पाण्याच्या पृष्ठभागावर 12 नॉट (ताशी 22 किमी) गतीने पुढे जाऊ शकते.
 6. या पाणबुडीचे नाव हिंद महासागरात आढळणार्‍या 'टाइगर शार्क’ वरून ‘कलवरी’ असे ठेवण्यात आले आहे.
 7. पाणबुडीच्या खोल पाण्यात 120 दिवस महत्त्वाच्या सागरी चाचण्या घेतल्या गेल्या. पाणबुडीत सज्ज केलेल्या विभिन्न उपकरणांसाठी देखील चाचण्या घेतल्या गेल्या.

पाणबुडीसंबंधी इतिहास:-

 1. पहिली कलवरी पाणबुडी 8 डिसेंबर 1967 रोजी नौदलात सामील केले गेली होती. ही भारतीय नौदलाची पहिली पाणबुडी होती.
 2. जवळपास तीन दशक भारतीय नौदलात सेवा दिल्यानंतर 31 मे 1996 रोजी याचे कार्य बंद करण्यात आले होते.
 3. नव्या डीजल-इलेक्ट्रॉनिक स्कॉर्पियन पाणबुड्यांचे नाव 10 साला आधीच्या फॉक्सट्रॉट श्रेणीतील पाणबुड्यांच्या अनुसार ठेवण्यात आले आहे.
 4. फॉक्सट्रॉट श्रेणीतील पाणबुड्या भारतीय नौदलाची पहिल्या पाणबुड्या होत्या.
 5. भारताला 7500 किलोमीटरहून अधिकाची सागरी तट लाभलेला आहे. याशिवाय भारतीय परिसरात जवळजवळ 1300 छोटे-मोठे बेटे आणि सुमारे 25 लाख चौ. किलोमीटरचा विशिष्ट आर्थिक क्षेत्र आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.