Professor Mohammad Omar Memon passed away

 1. अरबी आणि उर्दू भाषांचे जाणकार आणि इस्लामी धर्मसाहित्याचे आणि त्यासोबत सूफी संतविचारांचे अभ्यासक प्राध्यापक मोहम्मद उमर मेमन यांचे वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले.
 2. भारतीय उपखंडातील एका भाषेवर निस्सीम प्रेम करणारे एक अमेरिकी प्राध्यापक अशी त्यांची ओळख होती.
 3. दिवंगत प्राध्यापक मोहम्मद उमर मेमन हे भारतीय म्हणून जन्मले. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील इस्लामी धर्मसाहित्याचे जाणकार प्राध्यापक अब्दुल अजीज मेमन हे त्यांचे वडील.
 4. १९५४साली हे कुटुंब अलिगढहून कराचीस गेले. त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण कराचीतच झाले. अमेरिकेतील शिष्यवृत्ती मिळाल्याने हार्वर्ड आणि कॅलिफोर्निया विद्यापीठात इस्लामी धर्मसाहित्याचा अभ्यास केला.
 5. ते विविध विद्यापीठांत अभ्यागत म्हणून शिकवू लागले. मॅडिसन शहरातील विस्कॉन्सिन विद्यापीठात १९८०पासून त्यांना प्राध्यापकपद मिळाले.
 6. फाळणीच्या व्यथा सांगणारा ‘अ‍ॅन एपिक अन-रिटन’ हा कथासंग्रह तसेच १९४७ नंतरच्या कथांचा ‘द कलर ऑफ नथिंगनेस’ हा संग्रह यांचे ते संपादक व अनुवादक होते.
 7. ‘डोमेन्स ऑफ फीअर अ‍ॅण्ड डिझायर’ तसेच ‘द ग्रेटेस्ट उर्दू शॉर्ट स्टोरीज एव्हर टोल्ड’ यांचे अनुवाद-संपादनही त्यांनीच केले.
 8. वयाच्या पन्नाशीपर्यंत ते स्वत:देखील कथा लिहीत होते. त्या कथांचा ‘तारीक गली’ हा संग्रह प्रसिद्ध आहे.
 9. उर्दूच्या विद्यापीठीय अभ्यासाला वाहिलेली एकमेव इंग्रजी संशोधनपत्रिका त्यांनी सुरू केली.
 10. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस या संस्थेसाठी पाकिस्तानी कथासाहित्याचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले होते.


 India will impose a total of $ 240 million on US items

 1. अमेरिकेकडून पोलाद आणि अॅल्युमिनियम उत्पादनांच्या आयात शुल्कामध्ये एकतर्फी वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताकडून प्रतिसादात्मक कारवाई म्हणून भारत सरकारने अमेरिकेमध्ये उत्पादित वस्तूंवर अधिकाचा आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. अमेरिकेच्या एकतर्फी निर्णयामुळे भारताचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुधारित सूचीनुसार, अमेरिकेमधून आयात केल्या जाणार्‍या 30 प्रकारच्या वस्तूंवर पुढील आठवड्यात एकूण $240 दशलक्षचा प्रतिशुल्क लादला जाण्याची शक्यता आहे.
 3. वस्तूंची यादी :-
  1. बदाम, सफरचंद, फॉस्फोरिक अॅसिड आणि 800 सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या (हार्ले-डेव्हिडसनसह) मोटारसायकल.
 4. यापूर्वी, 18 मे 2018 रोजी भारताने जागतिक व्यापार संघटनेपुढे एकूण $ 166 दशलक्षचा अतिरिक्त आयात शुल्क समाविष्ट असलेल्या 20 वस्तूंची यादी दिली होती, ज्यामधून दर वाढवण्याचा प्रस्ताव मांडला गेला होता.
 5. तथापि, सुधारित यादीमध्ये, भारताने प्रस्तावित कमाल अतिरिक्त शुल्क 100% (अक्रोडावर) वरून 50% (हार्ले-डेव्हिडसनवर) पर्यंत खाली आणले आहेत.
 6. भारताने अमेरिकेच्या सरकारला त्यांच्या निर्णयामधून वगळावे अशी विनंती केली होती. मात्र, अमेरिकेने भारतीय विनंती फेटाळली. शिवाय याबाबत अमेरिकेच्या निर्णयाविरोधात भारताने WTO मधील तंटा निवारण यंत्रणेकडे धाव घेतलेली आहे.


 World Day to fight desertification and drought: June 17

 1. जगभरात 17 जून या तारखेला ‘वाळवंटीकरण व दुष्काळाशी लढण्यासाठी जागतिक दिवस’ पाळण्यात येतो. यावर्षी हा दिवस ‘लँड हॅज ट्रू वॅल्यू – इन्वेस्ट इन इट’ या संकल्पनेखाली पळण्यात आला. 
 2. जमिनींचे वाळवंटीकरण होण्याच्या प्रक्रियेत मातीची धूप, वनस्पतींचा ऱ्हास, जमिनी क्षारपड होणे आदी विविध बाबींचा समावेश असतो.
 3. भारतीय भौगोलिक स्थिती:-
  1. निसर्गाचे मोठे वरदान लाभलेल्या भारत देशाला विविध समृद्ध नैसर्गिक स्रोत लाभले आहेत. मात्र जमिनीच्या वाळवंटीकरणातून एक गंभीर समस्या प्रकर्षाने पुढे आली आहे.
  2. जगातील एकूण भौगोलिक क्षेत्रामध्ये भारताचा वाटा केवळ 2.4% आहे, तरीही जगातील लोकसंख्येच्या 16.7% लोकसंख्येला त्याचा आधार आहे.
  3. तर, जगातील एकूण कुरणांखालील क्षेत्रापैकी देशातील क्षेत्र केवळ 0.5% आहे, तरीही जगात जनावरांची जी काही एकूण संख्या आहे, त्यापैकी 18% संख्येला हे क्षेत्र आधारभूत आहे. त्यामुळे त्याचा ताण नैसर्गिक स्रोतांवर मोठ्या प्रमाणात पडत आहे.
  4. देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 15.8% म्हणजेच सुमारे 50.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्र शुष्क आहे, तर 37.6% म्हणजे 123.4 दशलक्ष हेक्टर क्षेत्र अर्धशुष्क आहे.
  5. तर 54.1 दशलक्ष हेक्टर (16.5%) क्षेत्र कोरडवाहू व अर्धआर्द्रतायुक्त श्रेणीत येते. म्हणजेच सुमारे 228 दशलक्ष हेक्टर (69%) भौगोलिक क्षेत्र हे कोरडवाहू प्रकारात येते.
 4. भारतातील वाळवंटीकरण समस्या:-
  1. भारतातील जमिनींचे मोठ्या प्रमाणावर वाळवंटीकरण होत चालल्याची गंभीर बाब भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (ISRO) शास्त्रज्ञांनी पुढे आणली आहे.
  2. देशातील 105.48 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील जमिनींची प्रत निकृष्ट होत चालली असून, 81.45 दशलक्ष हेक्टर क्षेत्र वाळवंटीकरणाच्या प्रक्रियेखाली असल्याचा अभ्यासपूर्ण निष्कर्ष समोर आला आहे.
  3. तसेच वनांखालील घटलेले क्षेत्र 26.21 दशलक्ष हेक्टर आणि वारंवार धुक्याच्या परिणामामुळे ऱ्हास झालेले क्षेत्र 9.47 दशलक्ष हेक्टर एवढे आहे.
  4. राज्यांमध्ये, राजस्थान, जम्मू व काश्मीर, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांमध्ये जमिनी खराब होण्याच्या प्रक्रियेखालील क्षेत्राचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त आहे.
  5. यात सर्वाधिक प्रमाण देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी राजस्थानात 21.77% आहे. त्यापाठोपाठ जम्मू-काश्मीर (12.79%) आणि महाराष्ट्र (12.66%) ही राज्ये आहेत.
 5. जमिनींचे वाळवंटीकरण का होते?
  1. जमिनींचे वाळवंटीकरण यामागील कारणे म्हणजे हवामानाच्या विविध घटकांमध्ये सातत्याने फरक किंवा बदल पाहण्यास मिळताहेत. तसेच निसर्ग, शेती, पर्यावरणात मानवी हस्तक्षेप हे देखील त्यामागील कारण आहे. एकूण पर्जन्यमानाचे प्रमाण बदलले आहे.
  2. शेती लागवडीच्या काही चुकीच्या पद्धतीही याला कारणीभूत आहेत. नैसर्गिक स्रोतांचा वापरही प्रमाणापेक्षा अधिक झाला आहे.
  3. रसायनांचा अति वापर झाला आहे. जनावरांनीही कुरणे अधिक प्रमाणात चरून संपविली आहेत.
 6. भारतीय पुढाकार:-
  1. या समस्येला संबोधित करण्यासाठी भारताने बराच दीर्घ प्रवास केला आहे आणि काही उल्लेखनीय यश देखील नोंदवले आहेत.
  2. पहिली पंचवार्षिक योजना (1951-1956) यामध्ये एक भाग म्हणून 'भूमीचे पुनर्वसन' ही बाब समाविष्ट करण्यात आली होती.
  3. ग्रामीण विकास मंत्रालय, भूमि संसाधन विभाग, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, कृषी मंत्रालय, जलस्रोत मंत्रालय, आदिवासी कल्याण मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, अंतराळ विभाग यांच्या विविध योजना आणि कार्यक्रमांनी या आव्हानांना कमी करण्याकरिता महत्त्वपूर्ण भूमिका वठवलेली आहे.
  4. जरी भारताकडे वाळवंटीकरणाचा सामना करण्यासाठी विशिष्ट धोरण किंवा कायदेशीर आराखडा नसला तरी, जमिनीची पत आणि वाळवंटीकरण प्रक्रिया सकारात्मक पद्धतीने उलट करण्याची प्रबळ चिंता आपल्या अनेक राष्ट्रीय धोरणांमधून दिसून येते.
  5. उदाहरणार्थ, राष्ट्रीय जल धोरण 2012; राष्ट्रीय वन धोरण 1988; राष्ट्रीय कृषी धोरण 2006; वन (संवर्धन) कायदा 1980; पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986; राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006; शेतकर्‍यांसाठी राष्ट्रीय धोरण 2007; राष्ट्रीय पर्जन्य-अवलंबित क्षेत्र प्राधिकरण (NRAA)-2007, ज्यांनी या समस्या सोडवण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत.


 Organized 106th Indian Science Council in Jalandhar next year

 1. पंजाबच्या जलंधर शहरात लवली प्रोफेशनल युनिवर्सिटी (LPU) 3 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत ‘106 वी भारतीय विज्ञान परिषद (Indian Science Congress -ISC)’ आयोजित करणार आहे.
 2. या कार्यक्रमात जगभरातील 300 वैज्ञानिक आणि नोबेल विजेते सहभागी होणार आहेत.
 3. "फ्यूचर इंडिया: सायन्स अॅंड टेक्नॉलॉजी" या विषयावर आधारित या पाच दिवसीय कार्यक्रमात 18 पूर्ण सत्रे भरवली जातील.
 4. ज्यामध्ये वैद्यकीय, रासायनिक, पर्यावरण आणि इतर विज्ञानविषयक क्षेत्रांचा समावेश असेल.
 5. भारतीय विज्ञान परिषद मंडळ (ISCA) ही कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे मुख्यालय असलेली भारतातली एक प्रमुख वैज्ञानिक संघटना आहे.
 6. याची 1914 साली स्थापना करण्यात आली आणि ते दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटतात.
 7. यामध्ये 30,000 हून अधिक वैज्ञानिक सदस्य म्हणून आहेत.
 8. 15-17 जानेवारी 1914 या काळात ISCA ची पहिली बैठक एशियाटिक सोसायटी (कलकत्ता) येथील परिसरात झाली.
 9. ISCA च्या नेतृत्वात आयोजित भारतीय विज्ञान परिषद (ISC) हा विज्ञान क्षेत्रातला जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे.


 IRDAI has constituted a review committee in relation to the rules of veterinary insurance marketing firms

 1. भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) ने विमा विपणन संस्थांचे (Insurance Marketing Firms -IMF) नियमन करणाऱ्या नियमांचा आढावा घेण्यासाठी सुरेश माथुर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.
 2. तीन वर्षांपूर्वी घोषित केलेल्या नियमांनुसार विमाधारकांसाठी विमा वितरणासाठी मार्ग म्हणून काम करणाऱ्या अशा कंपन्या संचालित होतात.
 3. या क्षेत्राच्या बळकटीसाठी 10 सदस्यांची ही समिती ‘IRDAI (विमा विपणन संस्थांची नोंदणी) विनियम-2015’ मधील बाबींचा आढावा घेणार आहे.
 4. भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) ही एक स्वायत्त, वैधानिक संस्था आहे जी भारतातील विमा आणि पुनर्विमा उद्योगांचे विनियमन करते व प्रोत्साहन देते.
 5. हे ‘विमा विनियमन व विकास प्राधिकरण अधिनियम-1999’ अन्वये स्थापन करण्यात आले.
 6. याचे मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा येथे आहे.
 7. IRDAI च्या संरचनेत एक अध्यक्ष, पाच पूर्णवेळ आणि चार अंशकालिक सदस्य असतात जे भारत सरकारकडून नियुक्त केले जातात.


Top