Finland is the happiest country in the world

 1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार 156 देशांच्या यादीत फिनलंड देश अग्रेसर ठरला आहे.  
 2. फिनलंडनंतर नॉर्व, डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलंड, कॅनडा, न्यूझीलंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया या देशांचा टॉप 10 मध्ये समावेश होतो. 
 3. अमेरिका या यादीत अठराव्या, तर इंग्लंड एकोणीसाव्या स्थानावर आहे.
 4. आफ्रिकेतील बुरुंडी हा देश समाधानी देशांच्या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे.
 5. भारत या यादीमध्ये 133 व्या क्रमांकावर तर पाकिस्तान 75 व्या स्थानावर आहे.
 6. चीन (86), भूतान (97), नेपाळ (101), बांगलादेश (115), श्रीलंका (116) भारतापेक्षा सरस ठरले आहेत.
 7. आनंदी देशाची व्याख्या ठरवताना काही महत्वाचे निकष लावले जातात.
 8. प्रत्येक देशातील नागरिकांचे स्वातंत्र्य, सामाजिक समर्थन, विश्वास, आरोग्य आणि उत्पन्न या गोष्टी पाहिल्या जातात.


Famous scientist Stephen Hawking passes away

 1. विज्ञानाच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारे आणि विश्वाचे कोडे सोप्या भाषेत समजावून सांगणारे ख्यातनाम ब्रिटिश शास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 व्या वर्षी केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झाले.
 2. विश्व उत्पत्ती आणि कृष्णविवर यांच्या सदर्भात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. 
 3. हॉकिंग यांनी लिहलेल्या जगप्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘द ग्रँड डिझाईन’, ‘युनिव्हर्स इन नटशेल’, ‘माय ब्रीफ हिस्ट्री’, ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
 4. त्यांचे विश्वाच्या उत्पत्तीच्या रहस्यांवर आधारित 'ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम' हे पुस्तक खूप गाजले.

हॉकिंग यांचे जीवन

 1. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे 8 जानेवारी 1942 रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक आणि आई इझाबेल ऑक्सफर्डच्या पदवीधर होत्या.
 2. हॉकिंग यांना विद्यार्थीदशेपासूनच संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती. विज्ञान विषयात त्यांना रस होता. 1959 साली त्यांनी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती.
 3. त्यांनी 1962 साली ऑक्सफर्डमधून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. याच विद्यापीठात त्यांनी 30 वर्षे गणिताचे अध्यापन केले.
 4. वयाच्या अवघ्या 21 वर्षी जडलेल्या दुर्धर ‘मोटार न्यूरॉन डिसीज’ नामक आजारामुळे त्यांचे संपूर्ण शरीर अधू असूनही त्यांनी जिद्दीने आपला प्रवास केला.
 5. हॉकिंग यांची अल्बर्ट आइनस्टाइन आणि सर आयझॅक न्यूटन यांच्याशी तुलना केली जाते.
 6. विश्वशास्त्र (cosmology) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे योगदान मोठे होते. 2009 साली त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले होते.
 7. शिवाय त्यांना कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर ही पदवी बहाल केली होती.


Physicists developed a new stage of the substance called "Reedberg Polarons"

 1. भौतिकशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय चमूने यशस्वीरित्या एक "विशाल अणू" तयार केला, जो सामान्य अणूंसह भरलेला आहे.
 2. “रिडबर्ग पोलरॉन्स” हे अणू एका कमकुवत बंधाने एकत्र येतात आणि ते अतिशय थंड तापमानात तयार केले आहेत.
 3. ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठातले सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ जोचिम बर्गडॉर्फर यांच्यासमवेत संशोधकांच्या चमूने लावलेल्या या नव्या शोधामुळे अल्ट्राकोल्ड (अतिशय थंड) अणूसंबंधी भौतिकशास्त्राचे सिद्धांत तपासण्यात नवी कलाटणी मिळणार आहे.

“रिडबर्ग पोलरॉन्स” बाबत

 1. हा नवीन अणू तयार करण्यासाठी केलेला प्रयोग, गेल्या दोन दशकांमध्ये प्राप्त झालेल्या अनेक प्रगतीवर आधारित आहे. यामध्ये दोन भिन्न क्षेत्रांमधील कल्पनांचा वापर आहे, ते म्हणजे – बोस-आइनस्टाइन कंडेन्सेशन आणि रिडबर्ग एटम्स.
 2. बोस-आइनस्टाइन कंडेन्सेशन (BEC) ही द्रवपदार्थासारखी अवस्था असते जी खूप कमी तापमानावर प्राप्त होते. प्रयोगात ‘स्ट्रॉन्टीयम’ अणूंचे BEC वापरले आहे.
 3. अणूमधील इलेक्ट्रॉन न्यूक्लियस (केंद्र) भोवतालच्या परीभ्रमण कक्षेत हलतात.
 4. 'रिडबर्ग अणू' हा एक अणू आहे, ज्यामध्ये एक इलेक्ट्रॉन बाहेरच्या एका मोठ्या परिभ्रमण कक्षेकडे ढकलल्या जातो. हा एक मनोरंजक गुणधर्म आहे आणि याबाबत बर्‍याच काळापासून अभ्यास सुरू आहे.


 RBI's stay on LoC and LoC facility for business loan

 1. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने व्‍यापार कर्जासाठी बँकेकडून दिल्या जाणार्‍या लेटर ऑफ अंडरटेकिंग (हमी पत्र/LoU) आणि लेटर ऑफ कम्‍फर्ट (LoC) प्रदान करण्याच्या सुविधेवर तत्काळ प्रभावाने स्थगिती आणली आहे.
 2. अलीकडेच चर्चेत असलेल्या नीरव मोदीने बनावट हमीपत्रांच्या माध्यमातून भारतीय बँकांच्या परदेशी शाखांकडून कोट्यवधी रुपये प्राप्त केलेत.
 3. हे निष्पन्न झाल्यानंतर RBI ने AD श्रेणी-I द्वारे भारतात आयातीसाठी व्‍यापार कर्जासाठी LoUs/LoCs देण्याचे तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला.
 4. लेटर ऑफ अंडरटेकिंग (LoU) आणि लेटर ऑफ कम्‍फर्ट (LoC) हे कर्ज पत्र आहेत, ज्यांच्या माध्यमातून एखादी बँक दुसर्‍या भारतीय बँकेच्या परदेशी शाखेच्या ग्राहकातर्फे जबाबदारी घेण्याचे आश्‍वासन देते.
 5. व्यापारी याचा वापर परदेशांमधून सामान आयात करण्यासाठी करतात.
 6. जर खातेदार डिफॉल्ट म्हणून घोषित झाला, तर LoU प्रदाता बँकेला ती रक्कम भरून देणे आवश्यक होते.


International pi Day - March 14

 1. जगभरात 14 मार्च (3/14) रोजी आंतरराष्ट्रीय पाय दिन साजरा केला जातो.
 2. पाय (Pi) (ग्रीक अक्षर "π") हे गणितामध्ये एक अचल संख्या दर्शवण्यासाठी वापरलेले प्रतीक आहे.
 3. वर्तुळाचा परिघ आणि त्याचा व्यास यांचे गुणोत्तर म्हणजे पाय होय, जो साधारणपणे 3.14159 आहे.
 4. पाय दशांश बिंदूपासून एक लाख कोटीपेक्षा जास्त अंकांनी मोजला गेला आहे.
 5. एक परिमेय संख्या म्हणून ते कोणत्याही पुनरावृत्ती किंवा निश्चित संरचनेशिवाय अमर्यादपणे गणली गेली आहे. याचा आजवर कधीही पूर्ण भागाकार झालेला नाही.
 6. गणितामधील ही एक मजेशीर आणि तशीच आव्हानात्मक बाब आहे.
 7. 1988 साली सॅन फ्रान्सिस्को एक्सप्लोरेटोरियम येथे लॅरी शॉ यांनी पाय दिनाची अधिकृत सुरुवात केली होती. या ठिकाणी शॉ भौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम करीत होते.


India tops the list of the most imported countries of arms

 1. भारताला शस्त्रास्त्रनिर्मितीत ‘मेक इन इंडिया’ मोहीमेअंतर्गत अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.
 2. शस्त्रास्त्रांसाठी अजूनही दुसऱ्यां देशांवर भारताला अवलंबून राहावे लागत आहे.
 3. भारत 2013 ते 2017 या कालावधीत शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांच्या यादीत अव्वलस्थानी आहे. एकटा भारत जगातील शस्त्रास्त्रांच्या एकूण आयातीपैकी 12 टक्के आयात करतो.
 4. 12 मार्च 2018 रोजी जगभरातील देशांकडून होणाऱ्या शस्त्रास्त्र खरेदीचा अहवाल इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (आयपीआरआय) या संस्थेने प्रसिद्ध केला आहे.
 5. या अहवालात भारताच्या शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये 2008 ते 2012 च्या तुलनेत 2013 ते 2017 या कालावधीत लक्षणीय वाढ झाली आहे.
 6. जगभरात शस्त्रास्त्रांची आयात करणाऱ्या देशांमध्ये भारत अव्वल स्थानी आहे.
क्रमवारी
 1. भारत
 2. सौदी अरेबिया
 3. इजिप्त
 4. संयुक्त अरब अमिरात
 5. चीन
 6. ऑस्ट्रेलिया
 7. अल्जेरिया
 8. इराक
 9. पाकिस्तान


The Importance of Today's Day in History 15 march

 1. महत्वाच्या घटना:-
 2. १४९३: भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
 3. १८३१: मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीला सुरु झाले.
 4. १८७७: इंग्लंड व ऑस्ट्रेलियात जगातील पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.

जन्म:-

जन्म
 1. १७६७: अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १८४५)
 2. १८६०: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे रशियन सूक्ष्मजीवशास्त्र डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९३०)
 3. १८६६: पेपर क्लिप चे शोधक जॉन वालेर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९१०)
 4. १९०१: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम उर्फ गुरु हनुमान यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९९)

 

मृत्यू:-

मृत्यू
 1. १९३७: रंगभूमीवरील अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८९२)
 2. १९९२: हिंदी आणि उर्दू कवी डॉ. राही मासूम रझा यांचे निधन.
 3. २०००: विचारवंत आणि कलासमीक्षक लेडी राणी मुखर्जी यांचे निधन.
 4. २००२: इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामुभाई जव्हेरी यांचे निधन.
 5. २०१५: भारतीय लेखक नारायण देसाई यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४)


Top

Whoops, looks like something went wrong.