Commonwealth Games 2018: PV Sindhu will lead Indian team

 1. ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल या कालावधीत आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पथकाचे नेतृत्व बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूकडे देण्यात आले आहे.
 2. राष्ट्रकुलच्या उद्घाटन सोहळ्यात होणाऱ्या पथसंचलनात सिंधू भारतीय पथकाची ध्वजवाहक असेल.
 3. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूकडून राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सिंधूने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते.
 4. २०१४च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत पिस्तूल नेमबाज विजय कुमार तर २०१०च्या नवी दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाज अभिनव बिंद्रा भारतीय पथकाचा ध्वजवाहक होता.
 5. वर्षभरातील सिंधूची विश्व बॅडमिंटनमधील कामगिरी पाहता ऑलिम्पिक संघटनेने सायना नेहवाल आणि मेरी कोम या सिनियर खेळाडूंना वगळून सिंधूला हा बहुमान दिला.
 6. सायना नेहवाल आणि मेरी कोम यांची ही दुसरी राष्ट्रकुल स्पर्धा असणार आहे.
 7. मात्र या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याचा मान मिळालेला नाही.


 Declaration of Central Government's 'draft of production protection policy'

 1. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने देशाच्या ‘संरक्षण उत्पादन धोरण 2018’ (DProP 2018) याचा मसुदा जाहीर  केला आहे. जगातील अव्वल पाच संरक्षण उत्पादकांच्या यादीत सामील होण्याचा महत्वाकांक्षी दृष्टीकोण भारताने ठेवलेला आहे.
 2. 2025 सालापर्यंत भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या धोरणात 13 क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे - लढाऊ विमान, मध्यम श्रेणीतले भार उचलणारे आणि उपयुक्तता हेलिकॉप्टर, युद्धनौका, जमिनीवरील लढाऊ वाहने, स्वायत्त शस्त्र प्रणाली, क्षेपणास्त्र प्रणाली, बंदूक प्रणाली, लहान शस्त्रे, दारुगोळा व स्फोटक द्रव्ये, पाळतीसाठी यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक युद्ध (EW) प्रणाली, दळणवळण यंत्रणा आणि रात्री लढवण्यास समर्थ करणारे साहित्य यांची निर्मिती.
 3. देशाच्या संरक्षण आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आयातीमध्ये घट आणण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आले आहे.
 4. भारताच्या संरक्षण उत्पादन 2013-14 सालच्या 437.46 अब्ज रुपयांवरून केवळ 2016-17 साली 558.94 अब्ज रुपयांपर्यंत वाढले होते.
 5. या धोरणामधून 2025 सालापर्यंत संरक्षण वस्तू आणि सेवा क्षेत्रात 1,700 अब्ज रुपयांची उलाढाल साध्य करण्याचा हेतू आहे.
 6. त्यामुळे सुमारे 700 अब्ज रुपयांच्या अतिरिक्त गुंतवणूकीमधून सुमारे 2 ते 3 दशलक्ष लोकांना रोजगार मिळणार आहे.
‘संरक्षण उत्पादन धोरण 2018’
 1. धोरणासंबंधी ठळक बाबी:-
  1. संरक्षण उत्पादन क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक (FDI) याला चालना देण्यासाठी 74% FDI याला परवानगी देण्याचा प्रस्ताव आहे.
  2. धोरणात तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात दोन संरक्षण उद्योग मार्गिका/वसाहत तयार करण्याचा प्रस्ताव आहे.
  3. प्रत्येक मार्गिकेत एक स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) संरक्षण प्रकल्पासाठी वातावरण विकसित करणार, ज्यामध्ये चाचणी आणि प्रमाणिकरण सुविधा, निर्यात सुविधा केंद्र आणि तंत्रज्ञान हस्तांतरण सुविधा मिळणार आहे.
  4. त्यासाठी केंद्र सरकार 30 अब्ज रुपयांच्या मर्यादेपर्यंत संपूर्ण खर्चाच्या 50% खर्चाचे वहन करणार आहे.
  5. याव्यतिरिक्त,  एरोस्पेस डिझाइन आणि उत्पादनात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमे; ‘हॅकथॉन’ चे आयोजन करणे, ज्यासाठी 2018-2022 या काळात  10 अब्ज रुपयांची तरतूद ठेवण्यात येणार आहे; स्टार्टअपसाठी ‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ यांची उभारणी; आणि संरक्षण उत्पादनात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांना आणणे, अश्या तरतुदी आहेत.
  6. सायबर क्षेत्रात आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या माहिती तंत्रज्ञान ताकदीचे  भांडवलीकरन करण्याच्या हेतूने आहे.
  7. नवीन धोरण स्वदेशीकरणाच्या दृष्टीने पुढील सात वर्षांत 80-100 आसनी नागरी विमान तयार करण्याच्या मागे आहे.


 'TB India 2018' report is publish

 1. 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिनानिमित्त, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘टीबी इंडिया 2018’ अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, देशभरात 2.8 दशलक्ष लोकांना क्षयरोगाचा संसर्ग आहे. भारतात सर्वात जास्त क्षयरोगी आढळतात. जवळपास 25% क्षयरोगाचा संसर्ग झालेले भारतात आढळतात.
 2. भारत सरकारने क्षयरोग निर्मूलनासंबंधी वैश्विक मर्यादेच्या (2030) पाच वर्षाआधीच म्हणजेच सन 2025 पर्यंत देशातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.
 3. परंतु औषधी-रोधी क्षयरोगामुळे एक मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे. 2018-19 सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात उपचारादरम्यान रोगीला मासिक 500 रुपये भत्ता देण्याची घोषणा केली आहे.
 4. क्षयरोग निर्मूलनासाठीच्या योजनेखाली पुढीलप्रमाणे लक्ष्य निश्चित केले गेले आहे:-
  1. क्षयरोगाच्या प्रकरणात 80% घट आणणे. म्हणजेच प्रत्येक 1 लक्ष लोकांमधील 211 क्षयरोगी हे प्रमाण 43 वर आणणे.
  2. क्षयरोगामुळे असलेल्या मृत्युदरात 90% घट आणणे. म्हणजेच प्रत्येक 1 लक्ष लोकांमधील 32 क्षयरोगी हे प्रमाण 3 वर आणणे.
  3. क्षयरोगामुळे होणार्‍या खर्चाला रोगीसाठी 0% वर आणणे.
 5. क्षयरोगाचे जागतिक स्वरूप:-
  1. जगभरात मृत्युसाठी कारक ठरणार्‍या 10 कारकांमध्ये क्षयरोगामुळे होणार्‍या मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे.
  2. जगभरातील क्षयरोगींमधील 64% लोकसंख्या केवळ 7 देशांमध्ये आढळते, ते आहेत - भारत (सर्वाधिक), इंडोनेशिया, चीन, फिलीपींस, पाकिस्तान, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका.
  3. HIV ने जगणार्‍या लोकांमध्ये क्षयरोगामुळे सर्वाधिक मृत्यू झालेत. जागतिक पातळीवर क्षयरोगींची लोकसंख्येमध्ये होणार्‍या कमतरतेत हा दर वार्षिक 2% एवढा आहे.
‘टीबी इंडिया 2018’
 1. ठळक बाबी:-
  1. औषध-रोधी क्षयरोगींच्या बाबतीत जागतिक स्तरावर कोणत्याही इतर देशापेक्षा भारतात दरवर्षी नवीन क्षयरोगाचे अधिक नवीन रुग्ण आहेत, ज्याचे प्रमाण जागतिक क्षयरोगच्या भाराच्या 27% आहे आणि दरवर्षी त्यात सुमारे 2.79 दशलक्ष क्षयरोगी जोडले जातात. एक चतुर्थांशपेक्षा अधिक भारतातील रूग्णांमध्ये  एक किंवा अधिक औषधांना औषध-रोधी क्षयरोग (MDR-TB) आहे.
  2. भारतात MDR-TB यांची अंदाजे संख्या 147,000 एवढी आहे, जो जगातला चौथा भाग आहे. भारतातील रूग्णांमध्ये उपचाराचा यश दर 46% (जागतिक 52%) आणि मृत्युदर 20% (जागतिक 17%) कायम आहे.
  3. MDR-TB लोकसंख्येत तीव्र औषधी-रोधी क्षयरोग (XDR-TB) असणार्‍यांचे प्रमाण जगभरात 6.2% आहे.
  4. भारत सरकारने प्रायोजित केलेल्या राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाद्वारे ‘युनिव्हर्सल ड्रग सस्सेप्टीबिलिटी टेस्टिंग’च्या धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे, ज्यामध्ये क्षयरोगाचे निदान झालेल्या सर्वांना कमीतकमी रिफाम्पिसिन आणि आयसोनाएझिड रेझीस्टंट टेस्टिंग उपचार सेवा मिळणार आहे.

 


 Vidyadevi Bhandari becomes second President of Nepal

 1. नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची या पदावर फेरनिवड झाली आहे.
 2. भंडारी यांनी नेपाळी काँग्रेसचे उमेदवार कुमार लक्ष्मी राय यांना पराभूत केले.
 3. भंडारी यांना दोन-तृतीयांश पेक्षा जास्त मते मिळाली.
 4. विद्या देवी भंडारी यांना सत्तारूढ़ सीपीएन-यूएमएल आणि सीपीएन (माओवादी) यांच्याव्यतिरिक्त वाम आघाडी, संघीय समाजवादी फोरम-नेपाल तसेच अन्य छोट्या पक्षांकडून समर्थन मिळाले.
 5. विद्यादेवी २०१५मध्ये नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या होत्या.
 6. तसेच १९९४ व १९९९च्या संसदीय निवडणुकीतही त्या निवडून आल्या होत्या.
 7. संसद सदस्य झाल्यानंतर ३ वर्षांनंतर विद्यादेवी यांना पर्यावरण मंत्रिपद देण्यात आले.
 8. मात्र, केवळ महिला मंत्री असल्याने त्यांना इतरांकडून सहकार्य मिळत नव्हते.
 9. विद्यादेवी या दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदावर विराजमान हो णे भारतासाठी अधिक समाधानकारक आहे. कारण त्यांच्या काळातच भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंधांना गती मिळाली आहे.


 Miss India's Kanchi Advani, honor of Miss India

 1. महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने ११व्या मि. इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेच्या महिला शरीरसौष्ठव स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकून मिस इंडियाचा बहुमान पटकावला.
 2. नऊ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या कांचीने ऐतिहासिक कामगिरी करीत महिला शरीरसौष्ठवात मणिपूरच्या वर्चस्वाला धक्का दिला.
 3. मणिपूरच्या ममता देवी यमनमवर मात करीत कांचीने या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. हरयाणाची गीता सैनी या स्पर्धेत तिसरी आली.
 4. महिलांच्या स्पोर्टस् मॉडेल प्रकारात उत्तर प्रदेशची संजू विजेती ठरली. पश्चिम बंगालच्या सोनिया मित्राने रूपेरी कामगिरी करण्यात यश मिळविले.
 5. पुरुषांच्या स्पर्धेत महाराष्ट्राचा ‘होल्ड मॅन’ आणि मि. वर्ल्ड नितीन म्हात्रे याने ६० किलो वजनी गटात जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले.
 6. नितीनच्या सुवर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्राने ११व्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत आपले पहिले सुवर्ण पदक पटकावले.


 A. Bahinabai Choudhary of Maharashtra University named after

 1. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.
 2. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केलेली ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा केली. 
 3. १५ ऑगस्ट १९९० रोजी जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापनाकरण्यात आली होती.
 4. यात जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता.
 5. बऱ्याच वर्षांपासून विद्यापीठाला खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी सर्वपक्षीय संघटना तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केली जात होती.


Top