
1859 27-Apr-2018, Fri
- 25 एप्रिल 2018 रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नवी दिल्लीत ‘उन्नत भारत अभियान 2.0’ या कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
- मंत्रालयाच्या उन्नत भारत अभियानाची ही दुसरी आवृत्ती आहे.
- या चळवळी अंतर्गत 45,000 गावांचा समावेश करण्यात येणार आहे.
- IIT दिल्ली या संस्थेची राष्ट्रीय समन्वय संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- या कार्यक्रमामधून देशभरातील 750 उच्च शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना गावोगावी आणि तेथील लोकांच्या जीवनशैलीची ओळख करून घेण्यासाठी आणि त्यांच्यासमोर येणार्या अडचणी जाणून घेण्यासाठी भेट दिली जाईल.