1. जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट म्हणून सिंगापूरच्या पासपोर्टला पसंती देण्यात आली आहे. असे ग्लोबल पासपोर्ट इंडेक्सच्या माहितीतून उघड झाले आहे.
 2. तसेच जर्मनी दुसऱ्या स्थानी असून, स्वीडन आणि दक्षिण कोरिया अनुक्रमे तिसऱ्या स्थानावर झेपावले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेत जर्मनी सातत्याने पहिला क्रमांक राखून होती, परंतु यंदा त्या देशाला दुस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
 3. जागतिक स्तरावरच्या या स्पर्धेत १९३ देशांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये भारताचा क्रमांकात सुधारणा झाली असून, ७८ वरून तो ७५ क्रमांकावर झेप घेतली आहे.
 4. यादीतील पहिल्या १० क्रमांकावर युरोपियन देशांचेच प्रभुत्व असायचे. परंतु यंदा पहिल्यांदाच आशियाई देशांनी या यादीत स्थान मिळवले आहे.
 5. सिंगापूरमधील नागरिकांना १५९ देशांचा व्हिसा सहजरीत्या (व्हिसा फ्री) मिळू शकतो. त्यानंतर जर्मनीतल्या नागरिकांना १५८ देशांचा व्हिसा उपलब्ध होतात. स्वीडन आणि दक्षिण कोरियामधील नागरिकांना १५७ देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात. भारतातील नागरिकांना ५१ देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात.


 1. २६ ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्लीत 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स इंडिया फोरम' ची तिसरी बैठक यशस्वीरीत्या पार पडली.
 2. हा कार्यक्रम 'आयडियेट, इनोव्हेट, इंप्लीमेंट अँड इन्व्हेस्ट इन इंडिया' या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आला होता.
 3. १९२० साली स्थापित असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया (ASSOCHAM) कडून 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स इंडिया फोरम' हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि यात मंत्रालये, अधिकारी वर्ग तसेच जागतिक उद्योग संघटनांचा सहभाग होता.


 1. अमेरि‍केला मागे सारत भारत आता स्मार्टफोनसाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ बनली आहे. अजूनही चीन याबाबतीत अव्वल आहे.
 2. कॅनालि‍स अॅनालि‍स्‍ट या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, देशातील बदलत्या वातावरणामुळे हँडसेट आणि 4G मुळे मोबाइल बाजारात वृद्धी झालेली आहे. तसेच या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत ४ कोटी हँडसेटचा व्यवहार झाला.
 3. वर्तमानात भारतामध्ये जवळपास १०० मोबाइल ब्रॅंड आपला व्यवसाय करीत आहे. भारतीय मोबाइल बाजारात टॉप ५ कंपन्यांचा ७५% वाटा आहे, ज्यामध्ये सॅमसंग, झा‍योमी, वीवो, ओप्‍पो आणि लिनोवो या कंपन्यांचा समावेश आहे.
 4. बाजारात पहिल्या क्रमांकावर सॅमसंग तर दुसर्‍या क्रमांकावर झा‍योमी आहे, ज्यांचा देशातील बाजारात ५०% वाटा आहे.


 1. आशियातील अब्जाधीशांची संख्या यंदा प्रथमच अमेरिकेपेक्षा जास्त झाली आहे. अब्जाधीशांकडील सर्वाधिक संपत्तीच्या बाबतीत मात्र अजूनही अमेरिकाच सर्वोच्च स्थानी आहे.
 2. आशियात चीनमध्ये सर्वाधिक अब्जाधीश आहेत. चीनमध्ये सरासरी दर तीन आठवड्यांत एक अब्जाधीश तयार होतो.
 3. सध्याची गती पाहता येत्या चार वर्षांत अमेरिकेला मागे टाकून आशियामध्ये जगातील सर्वाधिक संपत्ती असेल. यूबीएस आणि प्राईस वॉटरहाऊस कूपर्स या संस्थांनी एका अहवालाद्वारे ही माहिती जारी केली आहे


Top

Whoops, looks like something went wrong.