1. कायद-ए-आझम आणि पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांच्या एकुलत्या एक कन्या दिना वाडिया यांचे २ नोव्हेंबर रोजी न्युयॉर्क येथे निधन झाले, त्या ९८ वर्षांच्या होत्या.
  2. दिना यांचा जन्म १४ ऑगस्ट १९१९ रोजी मध्यरात्री झाला होता. दिना या १७व्या वर्षी पारशी व्यावसायिक नेविल वाडिया यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर दिना मुंबईत राहिल्या त्यांना दोन मुले झाली त्यानंतर ते वाडियांपासून विभक्त झाले.
  3. त्यानंतर त्या युकेमध्ये स्थायिक झाल्या. जीना यांच्या मृत्यूनंतर त्यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. त्यानंतर पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल मुशर्रफ यांच्या कार्यकाळात २००४ मध्ये त्यांनी पाकिस्तानला शेवटची भेट दिली.


  1. भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते २ नोव्हेंबर २०१७ रोजी नवी दिल्लीत २१ व्या 'जागतिक मानसिक आरोग्य परिषद' चा शुभारंभ करण्यात आला आहे.
  2. केयरिंग फाउंडेशन व अन्य संस्थांच्या सहकार्याने वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ या संघटनेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतात पहिल्यांदाच जागतिक मानसिक आरोग्य परिषद भरविण्यात आली आहे.
  3. याशिवाय राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमामधून भारतात २२ उत्कृष्टता केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे.
  4. वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ (WFMH) ही एक आंतरराष्ट्रीय, बहु-व्यावसायिक गैर-सरकारी संस्था आहे, ज्यामध्ये नागरी स्वयंसेवक आणि माजी रुग्णांचा समावेश आहे. १९४८ साली या संघटनेची स्थापना करण्यात आली.


  1. फोर्ब्स नियतकालिकेने प्रसिद्ध केलेल्या जगातील १०० सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत यावेळी पाच भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे.
  2. ICICI बॅंकेच्या अध्यक्ष चंदा कोचर (३२), HCL कॉर्पोरेशनच्या CEO रोशनी नादर मल्होत्रा (५७), बायोकॉनच्या संस्थापक आणि अध्यक्ष किरण मजूमदार-शॉ (७१), अभिनेत्री प्रियांका चोप्रा (९७), HT मीडियाच्या अध्यक्षा शोभना भारतिया (९८) या पाच भारतीय महिलांचा यादीत समावेश आहे.
  3. भारतीय वंशाच्या परदेशी महिलांमध्ये पेप्सीकोच्या CEO इंदिरा नूयी (११) आणि निक्की हॅले (४३) यांचा समावेश आहे.
  4. यादीत जर्मनीच्या चॅन्सलर एंजेला मर्केल यांनी प्रथम स्थान प्राप्त केले आहे. एंजेला मर्केल या फोर्ब्सच्या यादीत शीर्ष स्थानी सलग सातव्यांदा आणि एकूणच १२ वेळा राहिलेल्या आहेत.


Top

Whoops, looks like something went wrong.