1. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी भारतीय रेल्वेच्या परिवर्तनासाठी महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे. मंत्रालयाने निर्णय पुढील मुद्द्यांना अनुसरून घेतलेले आहेत –
  1. प्रवाश्यांच्या सुरक्षेला सर्वोच्‍च प्राथमिकता
  2. तंत्रज्ञानाद्वारा परिवर्तन
  3. ऊर्जा कार्यक्षमता
  4. स्थानकांचा जलद गतीने पुनर्विकास
  5. बहूपयोगी केंद्र म्हणून रेल्वे स्थानकांचा विकास  
  6. आरोग्य आणि शिक्षण सुविधांचे आधुनिकीकरण
  7. मनुष्यबळाचा विकास
  8. बाहेर परिसरात कार्य करणार्‍या कर्मचार्‍यांच्या कल्यानार्थ प्रयत्नांवर भर
  9. मालमत्तेचा वापर करून रेल्वेचा महसूल वाढवणे
 2.  

  प्रवाश्यांची सुरक्षा  – रेल्वे रुळासंदर्भात आधुनिक उपकरणे व साहित्य बसविणे, क्षेत्रीय निरीक्षणावर आणि देखभालीवर भर देणे, उर्वरित 5,000 मानव रहित लेवल क्रॉंसिंगला वेळबद्ध रीतीने हटविणे, नवे LHB डब्बे, CCTV कॅमेरे, इलेक्‍ट्रॉनिक सिग्‍नल इंटरलॉकिंग प्रणाली, आधुनिक संपर्क व चेतावनी प्रणाली यांचा वापर.

 3. तंत्रज्ञानाचा वापर - निगरानी व प्रवाश्यांच्या सेवेसाठी मोबाइल अॅपचा वापर, सर्व स्थानकांवर व रेलगाडीमध्ये हाई स्‍पीड वाय-फाय, 1 नोव्हेंबर 2017 पासून जवळपास 700 रेलगाड्यांची गती वाढविणे, GPS तंत्रज्ञान तसेच ISRO च्या उपग्रहांद्वारे देखरेख.
 4. ऊर्जा कार्यक्षमता – पुढील 4- 5 वर्षांमध्ये विद्युतीकरणाचे कार्य पूर्ण करणे, रेलगाडी व संपूर्ण परिसरात 100% LED आणि ऊर्जा कार्यक्षन उपकरणांचा वापर.
 5. स्थानकांचा पुनर्विकास – डिसेंबर 2018 पर्यंत जवळपास 20 स्थानकांचे आधुनिकी‍करण पूर्ण होणार, ज्यामध्ये परिपूर्ण पायाभूत सुविधा असतील आणि व्यवसायाभिमुख स्थानके तयार करणे.
 6. दिवसभरात जेथे कमी ट्रेन येतात अश्या अनेक स्थानकांचा वापर योगा केंद्र, कौशल्य प्रशिक्षण, शैक्षणिक यासारख्या उद्देशाने चालणार्‍या प्रयत्नांसाठी  बहुपयोगी केंद्रांच्या रूपात करणे.
 7. भारतीय रेल्वेद्वारा संचालित  विद्या लये आणि  रुग्णालये यामध्ये  पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे.
 8.  तक्रार  निवारण शिबीरे नियमित रूपात आयोजित केली जाणार. कर्मचार्‍यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी क्षेत्रीय/प्रभागीय मुख्‍यालयात तक्रार निवारण केंद्रे उभारली जाणार. प्रभागीय क्रियाकलाप मजबूत करण्यासाठी अतिरिक्‍त ADRM पदांची नियुक्ती केली जाईल. 
 9.  ’ श्रेणीतील कर्मचार्‍यांच्या कामकाजाची स्थिती सुधारणे आणि त्यांचे निवासी क्‍वार्टर (गॅंग हट) यांनाही सुधारणे.
 10. रेल्वेच्या मालमत्तेचा वापर करून रेल्वेचा  मह सूल वाढवणे आणि त्यामधून स्थानकांमध्ये होणारा खर्च काढणे.

 


 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत BRICS आंतरबँक सहकार्य प्रणाली अंतर्गत भारतीय निर्यात-आयात बँक (EXIM बॅंक) द्वारा -
  1. आंतरबँक स्थानिक चलन पत मर्यादा करार आणि
  2.  पत मानांकनाशी संबंधित सामंजस्य
  • या करारांवर स्वाक्षरी करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
 2. हे दोन्ही करार एकछत्री करार असल्यामुळे त्यांचे स्वरूप बंधनकारक नाही. EXIM बँकेच्या संचालक मंडळाला त्यांच्या कार्यकक्षेत वैयक्तिक करार आणि कटिबध्दतेशी संबंधीत वाटाघाटी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
 3. आंतरबँक स्थानिक चलन पत मर्यादा करार - BRICS आंतरबँक सहकार्य प्रणाली अंतर्गत स्थानिक चलनामध्ये कर्ज सुविधा प्रदान करण्यासंबंधी प्रारंभिक मूळ कराराची वैधता पाच वर्षांसाठी होती, जी  मार्च 2011 मध्ये संपली. त्यामुळे प्रणाली अंतर्गत प्राप्त होणार्‍या सुविधांना भविष्याच्या दृष्टीकोनाने पुढे चालू ठेवण्यासाठी हा करार केला जात आहे.
 4. पत मानांकनाशी संबंधित सामंजस्य – हे इतर बँकांकडून प्राप्‍त विनंतीच्या आधारावर BRICS सदस्‍य बँका दरम्यान  पत मानांकनाना (credit ratings) सामायिक करण्यास सक्षम बनविणार. सीमेपलीकडील वित्‍त पोषण संबंधी जोडलेल्या कर्ज जोखि‍मांचे निवारण करण्यासाठी ही एक आदर्श प्रणाली असणार.
 5. करारामुळे परस्पर हिताच्या बहुपक्षीय संवादाला प्रोत्साहन मिळणार, ज्यामुळे BRICS देशांबरोबर राजकीय आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होतील.
 6. करारामुळे EXIM बँकेला CDS, VEB आणि BNDES यासारख्या मोठ्या वित्त संस्थांबरोबर आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होईल. EXIM बँक योग्य वेळी या करारांचा वापर करून आपल्या व्यवसायासाठी निधी उभारण्यासाठी या सदस्य संस्थांसोबत द्विपक्षीय करार करू शकणार. यामुळे दोन संस्थांद्वारा एकल चलनामध्ये सह-वित्‍त पोषण संभव होईल.
 7. भारतीय निर्यात-आयात बँक (EXIM  बँ ) ही भारतातली प्रमुख निर्यात वित्त संस्था आहे, जी 1982 साली EXIM बँक अधिनियम 1981 अंतर्गत स्थापन केली गेली होती. ही आंतरदेशीय व्यवहार आणि गुंतवणूक यांना प्रोत्साहन देण्यामध्ये मुख्य भूमिका वठवते. याचे मुख्यालय मुंबई ( महाराष्ट्र, भारत) येथे आहे.


 1. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते टॉम अल्टर यांचे निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. 
 2. टॉम अल्टर यांनी 1976 मध्ये धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या   रस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 
 3. शतरंज के खिलाडी, गांधी, क्रांती, बोस:द अनफरगॉटन हिरो आणि वीर झारा यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली. 
 4. मात्र जबान संभालके (1993-1997) या शो (सिटकॉम) नंतर ते बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी  300हून अधिक चित्रपटामध्ये अभिनय केला. 
 5. 1980 ते 90 च्या कालावधीत टॉम अल्टर यांनी  क्रीडा पत्रकार म्हणूनही काम केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्हीसाठी त्याची मुलाखत घेणारे टॉम अल्टर पहिले पत्रकार होते. 
 6. टॉम अल्टर यांनी  तीन पुस्तकेही लिहिली आहेत. तसेच, चित्रपट आणि कलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल 2008 मध्ये भारत सरकारकडून त्यांना  पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 


 1. नॉर्वे-भारत भागीदारी उपक्रमाअंतर्गत भारत आणि नॉर्वे या दोन देशांमध्ये आरोग्य क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारताचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि नॉर्वेचे परराष्ट्र मंत्रालय यांनी एका उद्देशपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या.
 2. करारानुसार विस्तारीत सहाय्य  सन 2018 पासून सुरू होऊन ते तीन वर्षाच्या कालावधीसाठी असेल.
 3.  प्र जनन, मातृत्व, नवजात, बालके, किशोरवयीन आरोग्य आणि आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण या संबंधित क्षेत्रात भागीदारी राहील. तर नॉर्वे-भारत भागीदारी उपक्रमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या अनुभवांचा आधारही यासाठी घेण्यात येणार.
 4. बालकांचा मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने 2006 साली आरोग्य क्षेत्रात नॉर्वे-भारत भागीदारी उपक्रम सुरू करण्यात आला.  राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत चार राज्यांना लक्ष्य केले गेले होते, ते आहेत – बिहार, ओडीशा, मध्यप्रदेश आणि राजस्थान.
 5. तेथे बालके व मातृत्व संबंधी आरोग्य सुविधांची गुणवत्ता जलद गतीने वाढवण्यासाठी कार्य केले गेले. याचा पहिला टप्पा सन  2006-2012 दरम्यान तर दुसरा टप्पा सन  2013-2017 दरम्यान नियोजित होता. नव्या करारामधून हे कार्य पुढे चालू ठेवले जाणार आहे. नॉर्वे हा उत्तर-पश्चिम युरोपच्या द्वीपकल्पामधील एक देश आहे. या देशाची राजधानी ओस्लो शहर असून नॉर्वेजियन क्रोन हे देशाचे चलन आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.