1. फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सुशोभीकरण व प्रसिद्धीसाठीची बहुतांश सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत
 2. नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी  5 ऑक्टोबरला स्मार्ट सिटी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. 
 3. दरम्यान, पालिकेच्या यशवंतराव चव्हाण मैदानावर न्यूझिलंडच्या संघाने दोन तास सराव केला. महापालिकेने तयार केलेल्या मैदानाचेही कौतुक केले.
 4. फिफा 17 वर्षांखालील जागतिक फुटबॉल स्पर्धा 6 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत नवी मुंबईत संपन्न होत आहे. यजमान शहरम्हणून नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. 
 5. महाराष्ट्र शासनाच्या शालेय व शिक्षण क्रीडा विभागाच्या वतीने महाराष्ट्र फुटबॉल मिशन  1 मिलियन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 
 6. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी मनपा आयुक्त रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली गठीत पर्यवेक्षण व सहनियंत्रण समितीची बैठक मनपा मुख्यालयात घेण्यात आली होती. 
 7. तसेच या बैठकीमध्ये स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठीच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था, वाहन व्यवस्थेच्या अनुषंगिक बाबींचा आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला. 
 8.  जागतिक स्तरावरील ही फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात देश-परदेशातून प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत.


 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2017 रोजी हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) उभारण्यासाठी कोणशीला स्थापित केली.
 2. याशिवाय, उना शहरात  भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) आणि कंद्रोरी येथे  भारतीय पोलाद प्राधिकरण (SAIL) च्या पोलाद प्रक्रिया प्रकल्पासाठी देखील कोणशीला स्थापित करण्यात आली.  
 3. बिलासपूरच्या AIIMS रुग्णालयात  750 खाटांची सोय असणार आणि बांधकामासाठी अंदाजे  1,350 कोटी रुपये खर्च केले जाणार असून आरोग्यसेवा व्यतिरिक्त तेतेथे वैद्यकीय शिक्षणही दिले जाणार.


 1. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथे कृष्णा नदीच्या मुक्त्याला ते विजयवाडा (राष्ट्रीय जलमार्ग-4).
 2. या नदीच्या पात्राच्या विकासासाठी कोणशीला ठेवली. आंध्रप्रदेशामध्ये NW-4 तीन टप्प्यांत विकसित केला जाणार आहे
  1. टप्पा-1: मुक्त्याला ते विजयवाडा (कृष्णा नदी) (82 किलोमीटर)
  2. टप्पा-II: विजयवाडा ते काकीनाडा (एलुरू कालवा आणि काकीनाडा कालवा) आणि गोदावरी नदीचे राजमुंद्री ते पोलावरम पात्र (233 किलोमीटर)
  3. टप्पा-III: कॉमामूर कालवा, बकिंगहॅम कालवा आणि कृष्णा व गोदावरी नद्यांचे उर्वरित पात्र (573 किलोमीटर)


 1. इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसींमधील उपवर्गांच्या तपासणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी नव्या समितीची स्थापना केली. ओबीसींना मिळणाऱ्या सवलतींचा समान फायदा या उपवर्गांना व्हावा यासाठी ही समिती पाहणी करणार आहे. माजी न्यायाधीश जी. रोहिणी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अनेक महत्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे.
 2. ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने या समितीच्या स्थापनेची घोषणा केली होती. त्यानुसार, राष्ट्रपतींनी स्थापन केलेल्या या समितीला पुढील  १२ आठवड्यात आपला अहवाल द्यावा लागणार आहे. या समितीकडे ओबीसी कोट्यातील आरक्षणाचे फायदे या कोट्यातील सर्व जाती आणि समाजाला सारख्या प्रमाणात मिळतात की नाही याची तपासणी करायची आहे. त्याचबरोबर ओबीसींत सध्या समाविष्ट असणाऱ्या जातींची ओळख पटवण्याचेही काम असणार आहे.
 3. आगामी काळात   गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडून होत असलेल्या ओबीसींच्या या वर्गीय तपासणीवर राजकीय प्रभाव असल्याचे बोलले जात आहे.
 4. मोदी सरकारने २०१५ मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोग मोडीत काढून त्याऐवजी ओबीसींसाठी तीन विभाग नेमण्यात आले होते. यामध्ये उच्च मागासवर्गीय, अति मागासवर्गीय आणि मागासवर्गीय या विभागांचा समावेश आहे. त्यामुळे ओबीसींना देण्यात येणाऱ्या  २७ टक्के आरक्षणाचा लाभ आता ओबीसींची लोकसंख्या आणि मागासवर्गाचा प्रकार यानुसार घेता येणार आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.