1. भारताच्या दक्षिण किनारपट्टीला ओखी या चक्रीवादळाचा तडाखा बसला असून या वादळात तामिळनाडू आणि केरळमध्ये एकूण ९ जणांना जीव गमवावा लागला आहे.
  2. पुढील २४ तासांत ओखी चक्रीवादळ लक्षद्वीपच्या दिशेने सरकणार आहे. या पार्श्वभूमीवर केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप बेटावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
  3. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे रुपांतर या चक्रीवादळात झाले आहे. बांगलादेशने या वादळाला ‘ओखी’ असे नाव दिले आहे.
  4. या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे सध्या ७० ते ८० किमी प्रति तास या वेगाने वारे वाहत असून वाऱ्याचा वेग १०० किमी प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे.


  1. २०१६ मध्ये देशातील सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंद उत्तर प्रदेशात झाली, पण गुन्ह्य़ांचे सर्वाधिक कमी प्रमाणही उत्तर प्रदेशाने नोंदविले. तसेच त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळमध्ये गुन्ह्य़ांची नोंद झाल्याची माहिती देणारा सर्वंकष अहवाल राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी ) ३० नोव्हेंबर रोजी प्रकाशित केला.
  2. महिलांवरील अत्याचारांच्या आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदविलेल्या गुन्ह्य़ांच्या संख्येतही किंचित वाढ झाल्याचे अहवाल सांगतो.
  3. २०१६ मधील एकूण गुन्ह्य़ांची संख्या ४८ लाख ३१ हजार ५१५ इतकी आहे. २०१५ मध्ये हीच संख्या ४७ लाख १० हजार ६७६ इतकी होती. गुन्ह्य़ांमध्ये २.६ टक्क्यांनी वाढ झाली. त्यापैकी उत्तर प्रदेशात २ लाख ८ २ हजार गुन्ह्य़ांची नोंद आहे.
  4. राष्ट्रीय गुन्हेगारी नोंद विभाग (National Crime Records Bureau -NCRB) चा 'भारतात गुन्हेगारी (Crime in India) - २०१६' वार्षिक अहवाल जाहीर करण्यात आला. हा वर्ष २०१६ मध्ये नोंद केल्या गेलेल्या पोलीस नोंदीनुसार फौजदारी खटल्यांचा अहवाल आहे.
  5. भारतात १९ मोठ्या शहरांपैकी दिल्लीत बलात्काराच्या घटना सर्वाधिक (४०%) नोंदवल्या गेल्या आहेत. याशिवाय हत्या, अपहरण, गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये दिल्ली सर्वात पुढे आहे.
  6. महिलांविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक ३३% प्रकरणे तसेच कौटुंबिक हिंसा आणि हुंडाबळीची २९% प्रकरणे दिल्लीत नोंदवली गेली आहेत. दिल्लीनंतर मुंबईमध्ये गुन्हेगारीचा आकडा १२.३% वर पोहचलेला आहे.
  7. NCRB ची स्थापना गृह मंत्रालयाकडून ११ मार्च १९८६ ला करण्यात आली. या विभागाचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. हे विभाग देशभरात नोंद केल्या गेलेल्या खटल्यांचे विश्लेषन करून 'भारतात गुन्हेगारी' नावाचा अहवाल दरवर्षी प्रकाशित करते. 'भारतात गुन्हेगारी' ची पहिली आवृत्ती सन १९५३ मध्ये प्रकाशित केली गेली होती.


Top

Whoops, looks like something went wrong.